ETV Bharat / entertainment

Rajinikanth Temple : चाहत्यांनं बांधलं रजनीकांतचं मंदिर, 'थलैयवा'च्या मूर्तीची होते देवासारखी पूजा

Rajinikanth Temple: रजनीकांतचे जगभर अमाप चाहते आहेत, जे त्याच्यावर अफाट प्रेम करतात. त्याला देवाहूनही श्रेष्ठ मानणारे काहीजण आहेत. दरम्यान तमिळनाडूतून असंच एक प्रकरण समोर आलं आहे, जिथे एका चाहत्यानं रजनीकांतचे मंदिर बांधले आहे.

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 1, 2023, 5:05 PM IST

Rajinikanth fan
रजनीकांतचे चाहता

चैन्नई (तामिळनाडू) Rajinikanth : साउथ अभिनेता रजनीकांतचे जगभरात करोडो चाहते आहेत. रजनीकांतचा चित्रपट जेव्हाही प्रदर्शित होते, तेव्हा हे तमाम चाहते त्याच्या चित्रपटाचे स्वागत मोठ्या जल्लोषानं करतात. रजनीकांतची प्रत्येक चित्रपटातील स्टाईल, त्याचा वेगळा अंदाज प्रेक्षकांना भारावून सोडतो. रजनीकांतसाठी काहीपण करण्यासाठी त्याचे चाहते एका पावलावर सज्ज असतात. दरम्यान रजनीकांतच्या एका मोठ्या चाहत्यानं तमिळनाडूतील मदुराई येथे थलायवाला समर्पित एक मंदिर बांधलं आहे. स्वतःला रजनीकांतचा चाहता म्हणणाऱ्या कार्तिकनं आपल्या घराचा काही भाग मंदिरात बदलवला आहे. या मंदिरात त्यानं रजनीकांतची मूर्ती बसवली आहे.

Rajinikanth fan
रजनीकांतचा चाहता कार्तिक

रजनीकांतचं मंदिर : कार्तिकच्या मते, रजनीकांतच्या मूर्तीचे वजन 250 किलो आहे. मीडियासोबत बोलताना त्यानं म्हटलं, 'आमच्यासाठी रजनीकांत हेच देव आहेत. त्यांच्यासाठी आदराचे प्रतीक म्हणून मी मंदिर बांधलं आहे'. त्यानंतर कार्तिकची मुलगी अनुशिया हिनेही रजनीकांतचे कौतुक केलं. तिनं सांगितले की, 'आम्ही रजनीकांतच्या मूर्तीची पूजा मंदिरातील देवाप्रमाणे करतो.' रजनीकांतचे जगभरातील चाहते त्याच्या प्रत्येक चित्रपटाची वाट खूप आतुरतेनं वाट पाहत असतात. याशिवाय काही चाहते, तर पदेशातून फस्ट डे फस्ट शो पाहायला भारतात येतात. रजनीकांत अनेकदा त्याचे फोटो सोशल मीडियावर चाहत्यांसोबत शेअर करत असतो. त्याच्या फोटोवर चाहते भरभरून प्रेमाचा वर्षाव करत असतात.

रजनीकांत आणि अमिताभ बच्चन दिसणार एकत्र : रजनीकांत 'थलायवर 170'मध्ये दिसणार आहे. या चित्रपटाद्वारे 33 वर्षानंतर अमिताभ बच्चन आणि तो एकत्र दिसणार आहेत. टी.जे. ज्ञानवेल यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केले आहे. बिग बी आणि रजनीकांत यांनी शेवटी 1991 मध्ये मुकुल आनंद दिग्दर्शित 'हम' चित्रपटात दिसले होते. दरम्यान, रजनीकांत 'जेलर'च्या यशाचा आनंद घेत आहे. 'जेलर'मध्ये त्यानं रिटायर पोलिस अधिकाऱ्याची भूमिका साकारली होती. या चित्रपटामध्ये तो आपल्या पोलीस मुलाच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी टोकाच्या थरावर जाताना दाखवला गेला आहे. जेलर' चित्रपटामध्ये मोहनलाल, शिवराजकुमार आणि जॅकी श्रॉफ महत्त्वपूर्ण कॅमिओमध्ये दिसले आहेत.

हेही वाचा :

  1. Thangalaan Teaser : विक्रम स्टारर 'थंगालन'चा टीझर प्रदर्शित; पहा व्हिडिओ
  2. Saba Azad birthday : गर्लफ्रेंड सबा आझादसोबतचे साधे क्षणही हृतिक रोशनला वाटतात जादुई
  3. Aishwarya Rai Birthday special: 'देवदास'पासून 'PS-I' पर्यंत, ऐश्वर्या रायच्या काही सर्वोत्तम कामगिरीवर एक नजर

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.