मुंबई : राघव चढ्ढा आणि परिणीती चोप्रा हे जोडपे त्यांच्या एंगेजमेंटपासूनच खूप चर्चेत आहेत. आम आदमी पार्टीचे खास राघव चढ्ढा आणि बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा लवकरच लग्नबंधनात अडकणार आहेत. या दोघांच्या चाहत्यांमध्ये त्यांच्या लग्नाबद्दलची खूप उत्सुकता वाढली आहे. राघव चढ्ढा आणि परिणीतीने १३ मे २०२३ रोजी दिल्लीतील कपूरथला हाऊसमध्ये साखरपुडा केला होता. दरम्यान आता परिणीतीसोबत साखरपुडा केल्यानंतर राघव चढ्ढा यांच्या आयुष्यात मोठा बदल झाला आहे, असे त्यांनी एका मुलाखतीत सांगितले आहे.
राघव चढ्ढाची मुलाखत : नुकत्याच एका मुलाखतीत राघव चढ्ढा यांनी परिणीतीसोबत साखरपुडा केल्यानंतर त्यांच्या आयुष्यात झालेल्या बदलांबद्दल खुलेपणाने सांगितले आहे. या मुलाखतीत राघव चढ्ढा यांना अनेक प्रश्न विचारण्यात आले होते. त्यानंतर राघव यांनी एका प्रश्नावर उत्तर देत सांगितले की, मला माझे सहकारी आणि माझ्या पक्षातील नेते परीचे नाव घेऊन खूप चिडवायचे आणि आता परीसोबत एंगेजमेंट झाल्यानंतर मला आता कुणी चिडवत नाही. राघव चढ्ढा यांनी पुढे सांगितले, माझे मित्र माझ्यावर लवकरात लवकर लग्न करण्यासाठी दबाव आणत होते, पण जेव्हा माझी आणि परीची एंगेजमेंटन झाली, तेव्हा सर्वजण शांत झाले आहेत, आता मला माझे मित्र पुन्हा पुन्हा परीचे नाव घेऊन चिडवत नाहीत.
- परिणीती चोप्रा आणि राघव चढ्ढा यांचे नाते : राघव चढ्ढा आणि परिणीतीने कधीही त्यांच्या डेटिंगबद्दल जाहीरपणे सांगितले नाही. परंतु मे महिन्यात त्यांचे नाते अधिकृत होण्यापूर्वी ते एकमेकांना अनेक वर्षांपासून ओळखत होते. राघव चढ्ढा आणि परिणीतीचे अनेकदा फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर शेवटी दोघांनी साखरपुडा करण्याचा निर्णय केला.
- परिणीती चोप्रा आणि राघव चढ्ढा लग्न कधी करणार : राघव चढ्ढा आणि परिणीती चोप्रा या सुंदर जोडप्याचे लग्न यावर्षी हिवाळ्यात होणार आहे. या जोडप्याने लग्नासाठी उदयपूरमधील हॉटेल ओबेरॉय उदयविलासची निवड केली आहे. तसेच अनेकदा राघव चढ्ढा आणि परिणीती लग्नाची शॉपिंग करताना दिसतात. त्यामुळे लवकरच हे जोडपे विवाह बंधनात अडकणार आहे.
हेही वाचा :