मुंबई: अभिनेता आर माधवन हा गुरुवारी 53 वर्षाचा झाला. या दिवशी देखील तो फार व्यस्त आहे. कारण तो सध्या चेन्नईमध्ये त्याच्या आगामी प्रोजेक्ट 'द टेस्ट'च्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे, ज्यामध्ये तो नयनतारा आणि सिद्धार्थ या अभिनेत्यांसोबत दिसणार आहे. अयुथा एझुथु आणि रंग दे बसंती या चित्रपटांमध्ये एकत्र काम केलेले माधवन आणि सिद्धार्थ, हे पुन्हा एकदा कसोटी क्रिकेट सामन्यावर आधारित असलेल्या चित्रपटात एकत्र येत आहेत. माधवनने बोलताना सांगितले की, वाढदिवस हा खास असतो, यात काही शंका नाही, पण माझ्यासाठी माझे कामही तितकेच महत्त्वाचे आहे. मला जे आवडते ते करताना मी भाग्यवान समजतो आणि हीच वाढदिवसाची सर्वोत्तम भेट आहे.'माधवनला 'रॉकेट्री द नंबी इफेक्ट' या चित्रपटासाठी नुकताच आयफा अवार्ड 2023 मध्ये सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार मिळाला आहे.
रॉकेट्री द नंबी इफेक्ट : हा चित्रपट भारतीय अंतराळ संशोधन संस्थेतील नंबी नारायणन यांच्या जीवनावर आधारित आहे. या चित्रपटाद्वारे माधवनने दिग्दर्शनात पदार्पण केले. तसेच चित्रपटाचे लेखण, निर्मित देखील त्याने केली आहे. 'रॉकेट्री द नंबी इफेक्ट' हा चित्रपट हिंदी, इंग्रजी, तमिळ, तेलुगू, मल्याळम आणि कन्नड या सहा भाषांमध्ये जगभरात प्रदर्शित झाला होता. चित्रपटाचे शूटिंग भारत, फ्रान्स, कॅनडा, जॉर्जिया आणि सर्बिया येथे झाले होते. या चित्रपटात शाहरुख खान आणि सुरिया यांनी कॅमिओद्वारे झळकले होते. हा चित्रपट प्रेक्षकांना फार पसंतीला पडला होता. कारण सोशल मीडियावर या चित्रपटाबद्दल फार चर्चा होत होती. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर फार कमाई केली. चित्रपटामध्ये माधवनचा अभिनय फार उत्कृष्ट होता. त्यामुळे त्यांचे कलाविश्वात फार कौतुक झाले.
वर्कफ्रंट : माधवन हा अजय देवगण आणि ज्योतिका यांच्यासोबत आगामी अद्याप नाव नसलेल्या सुपरनॅचरल थ्रिलर चित्रपटात दिसणार आहे. अजय देवगण आणि आर माधवन पहिल्यांदाच एकत्र स्क्रीन शेअर करताना दिसणार आहेत. विकास बहल दिग्दर्शित हा चित्रपट जून 2023मध्ये फ्लोरवर जाईल. तसेच मुंबई, मसुरी आणि लंडनमध्ये या चित्रपटाची शुटिंग करण्यात येणार आहे.
हेही वाचा :