ETV Bharat / entertainment

पुष्पा फेम जगदीश प्रताप भंडारीला अटक, तरुणीच्या आत्महत्येप्रकरणी गुन्हा केला कबूल - पुष्पा फेम जगदीश प्रताप भंडारी

Pushpa Movie : तेलुगू अभिनेता जगदीश प्रताप भंडारीवर महिला कलाकाराला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी अटक करण्यात आली. दरम्यान त्यानं याप्रकरणी आपला गुन्हा कबूल केल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे.

Pushpa Movie
पुष्पा चित्रपट
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 17, 2023, 1:31 PM IST

हैदराबाद -Pushpa Movie : तेलुगू अभिनेता जगदीश प्रताप भंडारीला एका महिला कलाकाराला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी बुधवारी हैदराबादमध्ये अटक करण्यात आली होती. जगदीश प्रताप बंडारीवर एका महिलेचे पुरुषासोबत फोटो काढून धमकावण्याचा आणि ब्लॅकमेल केल्याचा आरोप आहे. जगदीशनं अल्लू अर्जुनचा सुपरहिट चित्रपट 'पुष्पा' मध्ये काम केलं आहे. दरम्यान या प्रकरणाचा तपास करणाऱ्या पोलिसांना काही पुरावे मिळाले आहेत. त्यानंतर आता त्याच्यावर कारवाई करण्यात आली आहे.

  • पोलीस तपासात समोर आलं की, पूर्वी त्याच्या जवळ असलेल्या या महिलेला तो दुसऱ्या पुरुषाच्या जवळ जाताना बघू शकत नव्हता. म्हणून त्यानं तिला तिचे नग्न फोटो व्हायरल करण्याची धमकी दिली. अलीकडेच पुंजागुट्टा पोलिसांनी मुलीच्या आत्महत्येला कारणीभूत असलेल्या जगदीशला दोन दिवस चौकशीसाठी ताब्यात घेतलं होतं.

जगदीश प्रताप बंडारीवर गुन्हा दाखल : पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चित्रपटाच्या निमित्तानं हैदराबाद शहरात पोहोचलेल्या जगदीश प्रताप बंडारी याची पाच वर्षांपूर्वी या मुलीशी ओळख झाली. काही काळानंतर दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले. दरम्यान, 'पुष्पा'मध्ये साकारलेल्या व्यक्तिरेखेमुळे जगदीश प्रसिद्ध झाला. या चित्रपटानंतर त्याला चित्रपटांचे ऑफर्स येऊ लागले. त्यामुळे त्याच्या वागण्यात बदल झाला. मुलीला त्याचा हा बदल आवडला नाही. तिनं दुसऱ्या तरुणासोबत रिलेशनशिपमध्ये राहण्यास सुरुवात केली. हे कळाल्यानंतर जगदीश हा संतप्त झाला. जगदीशला त्याच्या एक्स गर्लफ्रेंडला त्याच्या आयुष्यात परत आणयाचं होतं. तो नोव्हेंबर 27 तारखेला पंजागुट्टा येथील मुलीच्या घरी गेला होता. त्यावेळी त्यानं तिला दुसऱ्या पुरुषाशी जवळीक साधताना पाहिलं होतं. त्यानं तो क्षण आपल्या फोनवर कैद केला.

जगदीश प्रताप बंडारीला मिळाली पोलीस कोठडी : जगदीशनं त्यानंतर तिचा हा व्हिडिओ तिला फोनवर पाठवला. त्यानंतर त्यानं त्याच्या एक्स गर्लफ्रेंडला धमकी दिली की, जर त्याचं काही ऐकलं नाही तर तो सोशल मीडियावर तिचा हा व्हिडिओ पोस्ट करेल. हा अपमान तिला सहन झाला नाही. या मुलीनं नोव्हेंबर 29 तारखेला आत्महत्या केली. तिच्या वडिलांनी पंजागुट्टा पोलिसांत तक्रार केली होती. डिसेंबर 6ला पोलिसांनी जगदीशला अटक करून रिमांडवर पाठवलं होतं. कोठडीत चौकशी केली असता, आरोपीनं गुन्ह्याची कबुली दिली. दोन दिवसांच्या कोठडीनंतर त्याला पुन्हा एकदा कोठडीत पाठवण्यात आलं आहे.

हेही वाचा :

  1. रामोजी फिल्म सिटीमध्ये हिवाळी उत्सव जोरात सुरू, पर्यटकांसाठी खास पॅकेजेस
  2. मुंबई विमानतळावर शाहरुख खान, अनुष्का शर्मा झाले स्पॉट, पाहा व्हिडिओ
  3. जॅकी श्रॉफ स्टारर 'हिरो' चित्रपटाला 40 वर्षे पूर्ण, कर्णमधुर बासरीच्या तालावर 'एक पिढी' आजही खुलते

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.