ETV Bharat / entertainment

ऑस्कर विजेती गुनीत मोंगाने पती सनी कपूरसोबत साजरा केला लग्नाचा पहिला वाढदिवस - Sunny Kapoor latest news

Guneet Monga and Sunny wedding anniversary : 'द एलिफंट व्हिस्परर्स' या गाजलेल्या माहितीपटासाठी ऑस्कर पुरस्कार मिळवणाऱ्या निर्माती गुनित मोंगाने आपल्या लग्नाचा पहिला वाढदिवस साजरा केला. यासाठी तिनं पती सनी कपूरसोबतचे पूर्वी प्रसिद्ध न झालेले लग्नातील काही फोटो शेअर केले आहेत. तिनं पतीसाठी एक सुंदर चिठ्ठीही लिहिली आहे.

Guneet Monga and Sunny wedding anniversary
गुनीत मोंगा आणि सनी कपूर लग्नाचा पहिला वाढदिवस
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 13, 2023, 10:15 AM IST

मुंबई - Guneet Monga and Sunny wedding anniversary : ऑस्कर पुरस्कार विजेती चित्रपट निर्माती गुनीत मोंगा आणि तिचा पती सनी कपूर यांनी मंगळवारी त्यांच्या लग्नाचा पहिला वाढदिवस साजरा केला. या खास प्रसंगी तिनं इंस्टाग्रामवर एक सुंदर चिठ्ठी लिहिली आहे.

तिच्या लग्नातील काही प्रसिद्ध न झालेल्या फोटोंची स्ट्रिंग तिनं शेअर केली. याच्या कॅप्शनमध्ये तिनं पतीसाठी एक सुंदर पोस्ट लिहिली आहे. वर्षभर त्याच्या कुटुंबात राहून मिळालेलं प्रेम, हसण्याचे क्षण यामुळे ती या कुटुंबाला प्रेमानं कुरवाळत आहे. या काळात समृद्ध केलेल्या प्रत्येक क्षणांची तिनं आठवण काढली. ही एकटीची शर्यत नाही, असं तिनं पुढे म्हटलंय. आपण सहा जण असल्यामुळे आपला अर्धा तणाव तर तिथंच संपला, त्यामुळे प्रत्येक ठिकाणी ती पूर्ण जोशात जाऊ शकते, असं म्हणत आपल्याला तिनं लग्नाच्या वाढदिवसाबद्दल सदिच्छा दिल्या आहेत.

तिने पती सनी आणि तिच्या आईसोबतची स्वतःची एक क्लिप देखील टाकली. व्हिडिओमध्ये ती तिच्या आईला विचारताना दिसत आहे, "मम्मा, हम कहाँ जा रहे है? क्यूँ जा रहे है?" ज्याला आई गोड उत्तर देते की, "आपकी शादी करने" यावर गुनीत म्हणते, "फिरसे. समझो ना?" आणि तिची आई तिला उत्तर देते, "हाँ फिरसे. कोर्ट मी." तिच्या आईला एक चुंबन देऊन निर्माती गुनित म्हणते, "उद्या आमचे कोर्ट वेडिंग आहे."

तिने व्हिडिओला कॅप्शन दिले, "आम्ही लग्न केल्याच्या एक वर्षापासून, अखेर आमचे कोर्ट मॅरेज होईल हे योग्य वाटले. मला एवढेच हवे आहे. माझ्या आयुष्यातील साउंडट्रॅक म्हणून सनी आणि अनेक लोकांनी मला खूप प्रेम दिले आहे. अनेक आशीर्वादांनी वर्ष पूर्ण करत आहे. शुक्राना."

गुनीत मोंगा हिने गेल्या वर्षी फॅशन उद्योजक सनी कपूरसोबत विवाह केला होता. मुंबईतील ४ बंगला गुरुद्वारामध्ये एका सुंदर शीख समारंभात त्यांनी लग्नगाठ बांधली होती.

'द एलिफंट व्हिस्परर्स' या गाजलेल्या माहितीपटाची निर्मिती गुनित मोंगाने केली होती. याचं नॉमिनेशन ऑस्करसाठी झाले होते. श्रेणीतील चार स्पर्धकांना मागे टाकत या माहितीपटाला सर्वोत्कृष्ट माहितीपटासाठी ऑस्कर पुरस्कार मिळाला होता. त्यामुळे ऑस्कर पुरस्कार जिंकणारा हा पहिला भारतीय माहितीपट ठरला होता.

गुनीत मोंगाने 'गँग्स ऑफ वासेपूर', 'द लंचबॉक्स', 'मसान', 'जुबान' आणि 'पग्ग्लाइट' सारख्या अनेक गाजलेल्या आणि आशयघन बॉलिवूड चित्रपटांची निर्मिती केली आहे.

हेही वाचा -

1. चरित्र अभिनेते रवींद्र बेर्डे काळाच्या पडद्याआड, विनोदी खलनायकाच्या भूमिकांनी गाजविली मराठी चित्रपटसृष्टी

2. Today Market Rate : काय आहेत आजचे पेट्रोल, डिझेल, सोनं-चांदीचे दर ? वाचा

3. खुशी कपूरला मिळाली करण जोहरच्या चित्रपटात एंट्री, 'या' किडसोबत करणार स्क्रिन शेअर

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.