ETV Bharat / entertainment

Jee Le Zaraa: फरहान अख्तर दिग्दर्शित 'जी ले जरा'ला 'या' कारणामुळे दिला प्रियांका चोप्रानं नकार.... - Priyanka dont like the script

Jee Le Zaraa: अभिनेता-दिग्दर्शक फरहान अख्तरचा बहुप्रतिक्षित 'जी ले जरा' हा चित्रपट तारखेच्या मुद्द्यांमुळे पुढे ढकलण्यात आला. दरम्यान आता या चित्रपटाच्यासंबंधीत एक बातमी समोर येत आहे. प्रियांका चोप्राला फरहानच्या चित्रपटाची स्क्रिप्ट आवडत नाही, त्यामुळे तिनं या चित्रपटाला नकार दिला आहे.

Jee Le Zaraa
जी ले जरा
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 1, 2023, 5:26 PM IST

मुंबई - Jee Le Zaraa: फरहान अख्तरच्या दिग्दर्शित 'जी ले जरा' मोस्ट अवेटेड चित्रपट आहे. चाहते या चित्रपटाच्या प्रत्येक अपडेटसाठी आतुर होते. 'जी ले जरा' चित्रपटाबाबत एक बातमी समोर आली आहे. मिळलेल्या माहितीनुसार तारखेच्या मुद्द्यांमुळे चित्रपट तारीख पुढे ढकलण्यात आला आहे. फरहान अख्तरनं देखील याबाबत आता सांगितलं आहे. फरहान अख्तरनं एका मुलाखतीत खुलासा केला होता की, प्रियांका चोप्रासोबत डेटची समस्या असल्यानं 'जी ले जरा' हा चित्रपट पुढे ढकण्यात आला होता, मात्र आता असं देखील म्हटलं जात आहे की, 'जी ले जरा' या चित्रपटात प्रियांका नसेल.

प्रियंका चोप्रानं 'जी ले जरा' करायला का दिला नकार ? : मिळालेल्या माहितीनुसार चित्रपट पुढे ढकलण्याचं कारण प्रियांका चोप्रा आहे. तिला 'जी ले जरा'ची स्क्रिप्ट आवडली नाही, त्यामुळे तिनं चित्रपट करण्यास नकार दिला. प्रियांका तिची बहीण परिणीती चोप्राच्या लग्नासाठी भारतात येणार होती आणि त्यानंतर ती हा चित्रपटही साइन करणार होती, परंतु काही मतभेदांमुळे तिनं या चित्रपटासाठी नकार दिला आहे. प्रियांकानं नकार दिल्यानंतर फरहान अख्तरला हा चित्रपट बनवण्यासाठी आणखी वेळ लागणार असल्याचं बोललं जात आहे. या चित्रपटाची कहाणी तो नव्या पद्धतीनं सादर करणार आहे. या चित्रपटाची कहाणी थोडी जुनी झाली आहे, त्यामुळे चित्रपटाची कहाणी रंजक बनवण्याचे काम निर्माते करत आहेत. हा चित्रपट फ्लोरवर येण्यासाठी आणखी दोन वर्षे लागू शकतात.

फरहान अख्तरनं केला खुलासा : 'जी ले जरा' या चित्रपटाची घोषणा 2021 मध्ये झाली होती. याशिवाय फरहान अख्तरनं चित्रपटाशी संबंधित खुलेपणानं बोलताना सांगितलं होतं की, तारखांच्या संदर्भात काही समस्या आहेत. आम्हाला फक्त तारखांची अडचण आहे, अमेरिकेत सुरू असलेल्या लेखकांच्या संपामुळे प्रियांकाच्या तारखांवर खूप परिणाम झाला, म्हणूनच मी याबद्दल जास्त विचार करणं सोडून दिलं आहे. या चित्रपटामध्ये आलिया भट्ट आणि कतरिना कैफ दिसणार आहे. 'जी ले जरा' या चित्रपटावर फरहान अख्तर खूप मेहनत घेत आहे.

हेही वाचा :

  1. Parineeti Chopra Choora Ceremony : प्रियांका चोप्राची आई मधू यांनी परिणीतीच्या चुडा सेरेमनीचे फोटो केले शेअर
  2. Latest 3 flims BO collection : 'फुक्रे 3', 'द वॅक्सीन वॉर' आणि 'चंद्रमुखी 2' रिलीजच्या चौथ्या दिवशी किती कमाई करणार?.
  3. Sushant Singh News :'एमएस धोनी: द अनटोल्ड स्टोरी'ला सात वर्षे पूर्ण, दिशा पटानी सुशांतची आठवण काढत केली पोस्ट

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.