ETV Bharat / entertainment

Priyanka Chopra to skip wedding : 'रागनिती' विवाहाला प्रियांका चोप्राची दांडी, परिणीती राघवला इन्स्टावरुन दिल्या लग्नाच्या सदिच्छा - प्रियांका चोप्राची दांडी

Priyanka Chopra to skip wedding : अभिनेत्री प्रियांका चोप्राने शनिवारी इन्स्टाग्रामवर तिची चुलत बहीण परिणीती चोप्राला राघव चढ्ढासोबतच्या विवाहासाठी शुभेच्छा दिल्या. या विवाहासाठी प्रियांका हजर राहणार नाही असंंच सध्या तरी दिसतंय.

Priyanka Chopra to skip  wedding
प्रियांकाने परिणीती राघवला शुभेच्छा दिल्या
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 23, 2023, 10:38 AM IST

Updated : Sep 23, 2023, 10:46 AM IST

मुंबई - Priyanka Chopra to skip wedding : बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा आणि आम आदमी पार्टीचे राज्यसभा खासदार राघव चड्ढा 24 सप्टेंबर रोजी राजस्थानातील उदयपूर शहरात 'द लीला पॅलेस हॉटेल'मध्ये विवाहबंधनात अडकणार आहेत. लग्नाच्या तयारीत कुटुंबीय आणि मित्रमंडळी घाईत असताना वधूची चुलत बहीण प्रियांका चोप्रा उपस्थित राहणार की नाही यावर शंका उपस्थित केली जात आहे.

भारतात परिणीतीच्या लग्नाची मेहंदी लागली असताना प्रियांका अजूनही अमेरिकेतच आहे. तिने एक पोस्ट इन्स्टाग्रामवर शेअर करुन यावर शिक्कामोर्तब केले आहे. प्रियांकाने शनिवारी तिच्या इंस्टाग्राम हँडलवर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. या व्हिडिओत प्रियांका आपल्या आवडत्या फ्रँकलिन जोनास काकांसोबत त्यांच्या खेड्यातील शेतावर पाळीव प्राण्यांसोबत वेळ घालवताना दिसतेय. तिच्यासोबत लेक मालती मेरी देखील दिसत आहे. या फार्म हाऊसवर शेळ्या बकऱ्या, हरणे, श्वान, कोंबड्या, घोडी असे प्राणी दिसत आहेत. या भेटीमध्ये खूप मजा आल्याचं तिनं म्हटलंय. या पोस्टवरुन असं दिसतं की प्रियांका अद्यापही अमेरिकेतच आहे आणि परिणीतीच्या लग्नाला भारतात येण्याबद्दल तिनं काहीच सूचित केलेलं नाही.

दरम्यान तिने इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये परिणीती चोप्राचा आनंदी मुडमधील एक थ्रोबॅक फोटो पोस्ट केला आहे. त्यावर परीच्या लग्नापूर्वी तिच्यासाठी एक खास पोस्टही लिहिली आहे. 'मला खात्री आहे की तुमच्या लग्नाच्या या खास दिवशी तुम्ही खूप आनंदी आणि समाधानी असाल...तुम्हा प्रेमाच्या सैदव शुभेच्छा.', या शब्दांत तिने परिणीती आणि राघव चड्ढाला नव्या आयुष्याची सुरुवात करत असल्याबद्दल शुभेच्छा दिल्या आहेत.

परिणीती आणि राघव चड्ढाच्या उदयपूर येथील लग्नाला प्रियांका तिची मुलगी मालतीसोबत हजर राहणार असल्याची बातमी आली होती. मात्र प्रियांकाच्या वरील दोन पोस्ट पाहता तिचं चुलत बहिणीच्या लग्नाला येणं नक्की नसल्याचं दिसतंय.

दरम्यान, प्रियांकाची आई मधु चोप्राने बुधवारी परिणिती आणि राघवच्या सुफी संगीत कार्यक्रमाला हजेरी लावली होती. या सोहळ्यात तिचा मुलगा सिद्धार्थ चोप्रा तिच्याबरोबर होता. परिणीती चोप्राचे वडील पवन चोप्रा कार्यक्रमस्थळाच्या बाहेर फोटोसाठी पोज देताना दिसले. यावेळी पाहुण्यांच्या यादीत असलेला क्रिकेटपटू हरभजन सिंगही दिसला.

हेही वाचा -

१. film based on Adi Shankaracharya : आदि शंकराचार्यंवर बनणार भव्य चित्रपट, आशुतोष गोवारीकरची घोषणा

२. Ji Le Jara film delayed : प्रियांका चोप्राच्या तारखा रखडल्या, 'जी ले जरा' चित्रपटाचं शुटिंग लांबणीवर

३. SRK visit Lalbagcha Raja : लालबागच्या राजाच्या चरणी बॉलिवूडचा किंग नतमस्तक

Last Updated : Sep 23, 2023, 10:46 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.