ETV Bharat / entertainment

SAF AFTRA strike : ग्लोबल स्टार प्रियांका चोप्राने हॉलिवूड लेखकांच्या संपाचे केले समर्थन - हॉलिवूड लेखकांच्या संपाचे समर्थन

अभिनेत्री प्रियांका चोप्राने हॉलीवूडमध्ये लेखक आणि कलाकार यांच्या संपाला पाठिंबा दर्शवला आहे. तिच्या या निर्णयाची जगभर कौतुक होत आहे.

प्रियांका चोप्रा
Priyanka Chopra
author img

By

Published : Jul 15, 2023, 2:58 PM IST

मुंबई : गेल्या दोन महिन्यांपासून हॉलिवूडमध्ये लेखक संपावर आहेत. हॉलिवूडचे कलाकार हळूहळू या संपात सामील होत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. हॉलिवूडमधील काही अभिनेते आधीच या मोहिमेमध्ये सामील झाले होते. आता स्क्रीन अ‍ॅक्टर्स गिल्ड-अमेरिकन फेडरेशन ऑफ टेलिव्हिजन अँड रेडिओ आर्टिस्ट (SAG-AFTRA) ने या मोहिमेत ग्लोबल स्टार प्रियांका चोप्रासोबत हातमिळवणी केली आहे. लेखक-कलाकारांच्या या संपात प्रियांका चोप्राने एन्ट्री केली असून तिने लेखकांना पाठिंबा द्यायचे ठरवले आहे. ६३ वर्षात पहिल्यांदाच हॉलिवूडमध्ये लेखकांचा एवढा मोठा संप पाहायला मिळाल्याचे, बोलले जात आहे. चला जाणून घेऊया हॉलिवूडच्या संपामागील कारण काय?

प्रियांकाने हॉलिवूड लेखक आणि अभिनेत्यांना दिला पाठिंबा : प्रियांका चोप्राने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये प्रियांकाने हॉलिवूडच्या स्ट्राइकिंग लेखक आणि अभिनेत्यांना पाठिंबा देण्याचे आश्वासन दिले आहे. पोस्ट शेअर करत प्रियांकाने लिहिले की, 'मी माझ्या युनियन आणि लोकांसोबत उभी आहे, आम्ही एकजुटीने, चांगला उद्या तयार करू शकतो' असे तिने या पोस्टमध्ये सांगितले आहे. या संपामुळे हॉलिवूडच्या अनेक चित्रपट आणि वेब सीरिजच्या शूटिंगवर परिणाम झाला आहे.

का झाला हॉलिवूडमध्ये संप? : स्क्रीन अ‍ॅक्टर्स गिल्ड-अमेरिकन फेडरेशन ऑफ टेलिव्हिजन अँड रेडिओ आर्टिस्ट (साग-अफ्ट्रा) यांचा चित्रपट निर्मात्यांसोबतचा करार १२ जुलै रोजी संपला. त्यानंतर हा करार संपल्यावर अभिनेते आणि लेखक एकत्र संपावर गेले आहेत. हा करार पुन्हा न झाल्यास राइटर्स गिल्ड ऑफ अमेरिकासह कलाकारही संपात सामील होऊ शकतात, असे बोलले जात आहे. इथे अनेक कलाकारही या मोहिमेत सहभागी झाले आहेत. उल्लेखनीय म्हणजे २ मे रोजी राइटर्स आणि अलायन्स ऑफ मोशन पिक्चर अँड टेलिव्हिजन प्रोड्यूसर्स (AMPTP) यांच्यात समझोता न झाल्यामुळे संप सुरू झाला आहे.

हॉलिवूड चित्रपटांवर झाला परिणाम : दरम्यान प्रियांका चोप्रा सध्या तिच्या नवीन हॉलिवूड प्रोजेक्ट्स 'हेड्स ऑफ स्टेट'मुळे चर्चेत आहे. हॉलिवूडच्या संपामुळे प्रियांकाच्या या प्रोजेक्टवर परिणाम होत आहे. दरम्यान, सोशल मीडियावर हॉलिवूडच्या संपाचा मोठा गाजावाजा होत आहे. सोशल मीडियावर एका पेजवर असे लिहले आहे की, 'स्क्रीन अ‍ॅक्टर्स गिल्ड संपावर आहे, या संपामुळे हॉलिवूड लॉक होणार आहे, या संघटनेची सदस्य म्हणून प्रियांका चोप्रादेखील तिचा कोणताही प्रोजेक्ट सुरू करू शकणार नाही'. हॉलिवूडचा हा संप सप्टेंबरअखेरपर्यंत चालणार असल्याचे बोलले जात आहे.'

हेही वाचा :

  1. Vicky Kaushal and Katrina Kaif : वाढदिवस साजरा करण्यासाठी विक्की कौशल पत्नी कतरिना कैफसह निघाला परदेशी...
  2. Baipan bhari deva IMDB rating : 'बाईपण भारी देवा'च्या रेटिंगने 'पठाण'ला मागे टाकले, कमाईचे आकडे पाहून जग अचंबित
  3. Ravindra Mahajani Passed Away : 'झुंज' संपली, मराठी चित्रपटसृष्टीचा 'देवता' काळाच्या पडद्याआड; अभिनेते रवींद्र महाजनींचा बंद घरात आढळला मृतदेह

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.