ETV Bharat / entertainment

Priyanka Chopra : इटलीतील व्हेनिसमध्ये बल्गेरी कार्यक्रमात सहभागी झाली ग्लोबल स्टार प्रियांका चोप्रा - प्रियांका चोप्रा

प्रियांका चोप्रा सध्या सतत चर्चेत असते. नुकतीच ती व्हेनिसमध्ये एका कार्यक्रमात सहभागी झाली होती. त्याच्यासोबत अ‍ॅनी हॅथवे, झेंडाया आणि 'ब्लॅकपिंक'ची के-पॉप गायिका लिसाही यावेळी उपस्थित होत्या. या चौघींचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे.

Priyanka Chopra
प्रियांका चोप्रा
author img

By

Published : May 17, 2023, 5:51 PM IST

मुंबई : ग्लोबल स्टार प्रियांका चोप्रा, अ‍ॅनी हॅथवे, झेंडया आणि 'ब्लॅकपिंक' ची के-पॉप गायिका लिसा यांनी 17 मे रोजी इटलीतील व्हेनिस येथे बल्गेरी या कार्यक्रमात एकत्र सहभाग घेतला. या कार्यक्रमातील चौघींचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. त्यांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताच अनेकांनी त्याच्या फोटोवर कमेंट केल्या आहे. त्यांना जागतिक मंचावर एकत्र पाहून चाहते खुश झाले आहे. या कार्यक्रमासाठी प्रियांका चोप्राने गुलाबी रंगाचा ऑफ-शोल्डर फुल स्लीव्हज ब्लाउज आणि हाफ साडी परिधान केली होती. झेंडयाने ऑफ शोल्डर सॅटिन ब्लॅक ड्रेस घातला होता. शिवाय लिसाने सुंदर नेकपीससह ऑफ-शोल्डर सॅटिनचा पोशाख परिधान केला होता, तर अ‍ॅनीने स्टायलिश नेकपीस आणि पेंडेंटसह गोल्ड-सिल्व्हर गाउन परिधान केला होता.

इटलीतील व्हेनिस येथे बल्गेरी या कार्यक्रमात प्रियंका : या कार्यक्रमात चौघीही एकत्र बसलेल्या होत्या. त्यानंतर रेड कार्पेटवर त्यांनी सर्वांनी एकत्र पोज दिली. मिळालेल्या माहितीनुसार, प्रियांका, अ‍ॅनी, झेंडया आणि लिसा या इटालियन ज्वेलरी ब्रँडच्या ग्लोबल ब्रान्ड अ‍ॅम्बेसेडर आहेत. याआधी प्रियंका ही चुलत बहीण परिणीती चोप्राच्या साखरपुड्यात सहभागी होण्यासाठी दिल्लीत आली होती. 15 मे रोजी कपूरथला हाऊसमध्ये 'आम आदमी पार्टी'चे नेते राघव चढ्ढासोबत परिणीतीचा साखरपुडा संपन्न झाली.

कान्स फिल्म फेस्टिव्हलम 2023 : प्रियांका ही कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्येही सहभागी होणार असल्याचं सांगण्यात येत आहे. सारा अली खान, उर्वशी रौतेला, ईशा गुप्ता आणि माजी मिस वर्ल्ड मानुषी छिल्लर यांनी या कार्यक्रमात धुमाकूळ घातला होता. याशिवाय ऐश्वर्या राय बच्चन, मृणाल ठाकूर, दीपिका पदुकोण, आदिती राव हैदरी यांचाही समावेश या कार्यक्रमात आहे. प्रियांका चोप्राच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, प्रियांका चोप्राची वेब सीरीज 'सिटाडेल' ऍमेझॉन प्राइम व्हिडिओ वर रिलीज झाली आहे. या वेब सिरीजचा नवीन भाग दर शुक्रवारी प्रदर्शित होतो. तसेच तिचा 'लव्ह अगेन' हा चित्रपट देखील प्रदर्शित झाला आहे. प्रियंका ही फरहान अख्तर दिग्दर्शित 'जी ले जरा' या चित्रपटात

हेही वाचा : Cannes 2023: ऐश्वर्या राय मुलगी आराध्या बच्चनसह कान्स फिल्म फेस्टिव्हलला रवाना

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.