मुंबई - अक्षय कुमारच्या ( Akshay Kumar ) आगामी 'पृथ्वीराज' ( Prithviraj ) चित्रपटाच्या निर्मात्यांनी सोमवारी ऐतिहासिक चित्रपटाच्या ट्रेलरचे अनावरण केले. हा चित्रपट पृथ्वीराज चौहान ( Samrat Prithviraj Chauhan ) यांच्या अतुलनीय शौर्य आणि धैर्याला आदरांजली असल्याचे म्हटले जाते. ट्रेलरमध्ये पृथ्वीराज चौहान यांनी लढलेल्या महाकाय युद्धांची आणि त्यांनी दाखवलेल्या धैर्याची झलक दिसते. यात अभिनेता संजय दत्त आणि सोनू सूद ( Sanjay Dutt and Sonu Sood ) यांनी साकारलेल्या ऐतिहासिक व्यक्तीरेखांचीही झलक यात पाहायला मिळते.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">
पृथ्वीराज हा चित्रपट सम्राट पृथ्वीराज चौहान यांच्या जीवनावर आणि शौर्यावर आधारित आहे. घोरच्या निर्दयी आक्रमणकर्त्या मुहम्मदविरुद्ध पराक्रमाने लढणाऱ्या योद्ध्याची भूमिका अक्षय साकारत आहे. मानुषी छिल्लर ( Manushi Chhillar ) तिच्या प्रिय संयोगिताची भूमिका साकारत आहे आणि तिचा हा बॉलिवूड पदार्पणाचा चित्रपट आहे.
डॉ चंद्रप्रकाश द्विवेदी दिग्दर्शित पृथ्वीराज हा चित्रपट 3 जून 2022 रोजी जगभरात प्रदर्शित होणार आहे.
हेही वाचा - कॅटरिना कैफ आणि विकी कौशलने शेअर केले न्यूयॉर्कमधील सुट्टीचे फोटो