ETV Bharat / entertainment

'सालार' पाहिल्यानंतर पृथ्वीराज सुकुमारनने दिली 'गॅरंटी', अपेक्षेपेक्षाही असेल जास्त भव्य - सालार jfnrp lejrK

Prithviraj Sukumaran guaranteed Salar success : प्रशांत नील दिग्दर्शित 'सालार' मोठ्या पडद्यावर प्रदर्शनासाठी सज्ज झाला आहे. प्रभासच्या चाहत्यांना या चित्रपटाकडून खूप आशा आहेत कारण प्रभासला अलीकडच्या काळातील हिट चित्रपटांपेक्षा जास्त चित्रपट फेल गेले होते. 'सालार' मात्र अपेक्षेपेक्षा जास्त भव्य असेल, असे पृथ्वीराज सुकुमारन यांनी एसएस राजामौली यांच्या मुलाखतीत सांगितले.

Prithviraj Sukumaran guaranteed Salar success
पृथ्वीराज सुकुमारनने दिली सालारच्या यशाची गॅरंटी
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 20, 2023, 12:52 PM IST

मुंबई - Prithviraj Sukumaran guaranteed Salar success : प्रभासची मुख्य भूमिका असलेला बहुप्रतिक्षित 'सालार' हा चित्रपट 22 डिसेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. चित्रपटाची घोषणा झाल्यापासून या चित्रपटाबद्दलची मोठी क्रेझ निर्माण झाली आहे. या चित्रपटाच्या प्रमोशन साहित्यानं मोठी उत्कंठा निर्माण करण्यात यश मिळवलंय. रिलीजपूर्वी निर्मात्यांनी प्रभास, प्रशांत नील आणि एसएस राजामौली यांच्या मुलाखतीचे प्रसारण केले. यामध्ये 'सालार' च्या निर्मितीबद्दलचा त्यांचा दृष्टीकोन आणि संस्मरणीय क्षण याबद्दल अनेक गोष्टी सांगितल्या. याशिवाय अभिनेता पृथ्वीराज सुकुमारन यांनी प्रभासच्या चाहत्यांना आश्वासन दिले की 'सालार' चित्रपट त्यांच्या सर्व अपेक्षांपेक्षा जास्त भव्य असेल.

  • " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">

'सालार' बद्दल बोलताना, पृथ्वीराज सुकुमारनने आकर्षक चित्रपट तयार करण्याच्या प्रशांत नीलच्या दिग्दर्शनाच्या कामगिरीचे कौतुक केले. खानसारच्या कथेला जीवंत करण्यासाठी प्रशांत नीलने केलेल्या सूक्ष्म नियोजनाचे आणि फ्रेमवर्कचे खूप कौतुक केले.

राजमौली यांनी 'सालार' चित्रपटाच्या दोन भागाबद्दल चौकशी केली असता पृथ्वीराजने या चित्रपटाची तुलना 'गेम ऑफ थ्रोन्स'शी केली. यातील असंख्य पात्रांची गुंतागुंत, कथानकाचे क्लिष्ट मुद्दे आणि वेगवान पात्रांचे नाते त्यांनी अधोरेखित करून कथा दोन भागांत कशी उलगडेल याबद्दलचा खुलासा केला. चित्रपटाचे वर्णन करताना पृथ्वीराजने प्रभासचा कोणताही चाहता निराश होऊन थिएटर सोडणार नाही, असे त्याने आत्मविश्वासाने सांगितले.

अलीकडेच, निर्मात्यांनी 'सालार' रिलीझ ट्रेलरचे लॉन्चिंग केले. खानसार जगाची झलक आणि प्रभास आणि पृथ्वीराज सुकुमारन यांच्या पात्रांमधील विकसित मैत्रीचे चित्रण यामध्ये पाहायला मिळाले. ट्रेलरमध्ये पात्रांमधील अविभाज्य बंधाचे रूपांतर एका जीवघेण्या संघर्षात होण्याचे संकेत ट्रेलरने दिले आहेत.

या चित्रपटाची निर्मिती 'केजीएफ'चे दोन भाग आणि 'कांतारा'सारखे यशस्वी चित्रपट बनवणाऱ्या 'होंबाळे फिल्म्स'ने केली आहे. दिग्दर्शक प्रशांत नील आगामी चित्रपटात ज्युनियर एनटीआरसोबत काम करत आहेत.

हेही वाचा -

1. दुबईत 'डंकी'चं जोरदार प्रमोशन, ड्रोन शोमध्ये साकारली किंग खानची सिग्नेचर पोज

2. 2023 मध्ये चंदेरी दुनियेत पदार्पण करणाऱ्या स्टार किड्स विषयी जाणून घ्या

3. किंग खानची पत्नी गौरीला ईडीची नोटीस; 'या' प्रकरणी होणार चौकशी

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.