ETV Bharat / entertainment

Prime Minister Narendra Modi Birthday: बॉलिवूड सेलेब्रिटींनी दिल्या नरेंद्र मोदींना शुभेच्छा - Narendra Modi Birthday

PM Modi Birthday: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७२ व्या वाढदिवसाच्या निमित्ताने अनुपम खेर ते कंगना रणौत यांच्यासह अनेक सेलिब्रिटींनी मोदींना शुभेच्छा दिल्या आहेत.

बॉलिवूड सेलेब्रिटींनी दिल्या नरेंद्र मोदींना शुभेच्छा

author img

By

Published : Sep 17, 2022, 1:04 PM IST

Updated : Sep 17, 2022, 2:37 PM IST

मुंबई - पंतप्रधान नरेंद्र मोदी 17 सप्टेंबर रोजी त्यांचा 72 वा वाढदिवस साजरा करत आहेत. यानिमित्ताने त्याचे चाहते त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहेत. बॉलिवूड सेलिब्रिटींनीही सोशल मीडियावर शुभेच्छा दिल्या आहेत. अनुपम खेर ते कंगना रणौत यांच्यासह अनेक सेलिब्रिटींनी पंतप्रधान मोदींना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

मोदी यांचे अभिनंदन करताना अनुपम खेर यांनी लिहिले, ''आदरणीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी! तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आणि अभिनंदन! परमेश्वर तुम्हाला उदंड आणि निरोगी आयुष्य देवो! तुम्ही तुमच्या शपथेनुसार घेतलेली प्रत्येक जबाबदारी पार पाडण्यासाठी झटत आहात आणि पुढील अनेक वर्षे करत राहाल! तुमच्या नेतृत्वाबद्दल धन्यवाद!''

कंगना रणौतने तिच्या इंस्टाग्राम पोस्टमध्ये पंतप्रधान मोदींना वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना लिहिले आहे की, "लहानपणी चहा विकल्यापासून आणि पृथ्वीवरील एक शक्तिशाली माणूस बनण्यापर्यंत, तुमचा किती अतुलनीय प्रवास आहे, तुम्हाला दीर्घायुष्य लाभो, अशी प्रार्थना मी करते. "

कंगना रणौतने मोदींना दिल्या शुभेच्छा
कंगना रणौतने मोदींना दिल्या शुभेच्छा

कंगनाने पुढे लिहिले की, 'राम, कृष्ण आणि गांधींप्रमाणे तुम्ही देशासाठी अजरामर आहात, आता तुम्ही या राष्ट्राच्या आणि त्याही पुढे या देशाच्या चेतनेमध्ये कायमचे कोरलेले आहात, तुम्ही नेहमीच असाल, तुमची महानता कोणीही पुसून टाकू शकणार नाही. यामुळेच मी तुम्हाला अवतार म्हणते. तुमच्यासारखा नेता मिळ्यामुळे मी स्वतःला धन्य समजते.''

नरेंद्र दामोदरदास मोदी यांचा जन्म 17 सप्टेंबर 1950 रोजी गुजरातमधील वडनगर येथे झाला होता. नरेंद्र मोदी हे देशाचे ४१ वे पंतप्रधान आहेत. त्यांचा पहिला पंतप्रधानपदाचा कार्यकाळ 2014-2019 या वर्षात होता. 2019 मध्ये ते दुसऱ्यांदा देशाचे 14 वे पंतप्रधान बनले.

हेही वाचा - देशाचे मजबूत आधारस्तंभ म्हणत, करण जोहरने दिल्या पंतप्रधानांना शुभेच्छा

Last Updated : Sep 17, 2022, 2:37 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.