ETV Bharat / entertainment

Preity Zinta with twins : जुळ्या मुलांसोबत प्रिटी झिंटाची 'जादुई' बीच डेट, पाहा फोटो - प्रिती झिंटाची जादुई बीच डेट

Preity Zinta with twins : अभिनेत्री प्रिटी झिंटानं आपल्या जुळ्या मुलांसोबत समुद्रावर फिरतानाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. यात तिची गोड मुले वाळूत बागडताना आनंदी दिसताहेत.

Preity Zinta with twins
प्रिती झिंटाची 'जादुई' बीच डेट
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 30, 2023, 12:48 PM IST

Updated : Sep 30, 2023, 2:48 PM IST

लॉस एंजेलिस - Preity Zinta with twins : अभिनेत्री प्रिटी झिंटा सध्या रुपेरी पडद्यापसून दूर असली तरी ती आपल्या चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असते. सोशल मीडियाच्या माध्यमातून ती आपल्या खासगी आयुष्यातील अपडेटस् शेअर करते. चाहतेही तिच्या पोस्टवर व्यक्त होतात आणि आपल्या मनापासूनच्या प्रतिक्रिया देत असतात. अलीकडेच प्रिटीने पोस्ट केलेले फोटो चाहत्यांचं लक्ष वेधणारे आहे. ती आपली मुले जय आणि जियासह बीचवर आनंद घेत असताना या फोटोत खूप सुंदर दिसत आहे. या फोटोत तिची मुलं वाळूत खेळताना दिसताहेत.

आणखी एका फोटोत प्रिटी झिंटा जियाला आपल्या जवळ धरून तिचं छान स्मितहास्य कॅमेऱ्याला दाखवतेय. 'बीच डेज' असं कॅप्शन तिनं या पोस्टला दिलंय. हे फोटो पोस्ट केल्यानंतर नेहमीप्रमाणे चाहत्यांनी तिच्यावर प्रेमाच्या संदेशांसह शुभेच्छांची उधळण केली. चाहते तिच्या मुलांचं कौतुक करताना स्तुतीसुमनांची अक्षरशः उधळण करताहेत.

जीन गुडइनफबरोबर लग्न झाल्यापासून प्रिटी लॉस एंजेलिसमध्ये राहते. या जोडप्याने 29 फेब्रुवारी 2016 रोजी लॉस एंजेलिसमध्ये लग्न केलं होतं. 2021 मध्ये त्यांच्या संसारवेलीवर जुळ्या फुलांचा बहर आला. त्यांना जय हा मुलगा आणि जिया ही मुलगी आहे. ही जुळी भावंडं खूप गोड दिसतात.

एएनआयशी अलीकडेच बातचीत करताना प्रिटीनं पालक म्हणून तिच्या जीवनप्रवासाकडं डोकावून पाहिलं. मुलांना झोप यावी यासाठी ती 'कोई... मिल गया' हे शीर्षक गीत ऐकवत असल्याचं तिनं यावेळी उघड केलं. हे गीत ऐकल्याशिवाय मुलांना झोप येत नसल्याचं तिनं सांगितलं. या गाण्याचं संगीत ऐकत मुलं निद्रेच्या अधीन होतात. ही मुलं म्हणजे तिच्यासाठी जादू असल्याचंही सांगायला ती विसरली नाही. 'कोई मिल गया' चित्रपटाला 20 वर्ष पूर्ण होताना आपल्या मुलांच्या झोपी जाण्याच्या सवयीबद्दलचा किस्सा सांगितला होता. प्रिटीने हृतिक रोशनच्या प्रेयसीची भूमिका साकारलेल्या या चित्रपटाला 8 ऑगस्ट रोजी 20 वर्षे पूर्ण झाली.

'कोई मिल गया' च्या सेटवरील आठवणींना उजाळा देताना प्रिटी झिंटानं हृतिकवर भडकल्याचा एक मजेशीर किस्सा सांगितला. ती म्हणाली, 'मला शूटिंगचा पहिला दिवस आठवतो, हृतिकला उशीर झाल्यामुळे मी चिडले होते आणि अचानक माझ्या खांद्यावर कोणीतरी टपली मारली, मी वळले आणि तो रोहितच्या लूकमधील हृतिक होता. तो अजिबात ओळखू येत नव्हता. मी त्याला पाहून आश्चर्यचकित झाले. मग मला धक्का बसला की हृतिक तर सेटवरच होता पण मी त्याला ओळखले नव्हते.'

तिनं पुढं सांगितलं की, 'कोई... मिल गया' हा चित्रपट माझ्यासाठी नेहमीच माझ्यासाठी एक मैत्रीचा उत्सव असल्यासारखं होता. मित्र हृतिक, आणि राकेश जी, रेखा मॅडम सारखे सर्व अद्भुत लोक आणि सर्व सुंदर मुलं यांची धमाल होती. शूटिंग दरम्यान मला खूप मजा आली आणि हा एक चित्रपट असा आहे जो नेहमी माझ्या हृदयाच्या जवळ राहील.'

हेही वाचा -

1. Aishwarya And Aaradhya Spotted : ऐश्वर्या आणि आराध्या बच्चन 'मायलेकी' अज्ञात स्थळी रवाना, विमानतळावर झाल्या स्पॉट

2. Jackie Shroff Felt Proud : 'गणपथ'चा टीझर पाहून जॅकी श्रॉफला वाटला मुलाचा अभिमान, लिहिली हृदयस्पर्शी चिठ्ठी

3. Mission Raniganj : कोळशाच्या खाणीत अडकलेल्या 57 कामगारांच्या सुटकेचा थरारक अनुभव

Last Updated : Sep 30, 2023, 2:48 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.