ETV Bharat / entertainment

Happy Birthday Preity Zinta : बॉलीवूडच्या डिंपल गर्लचा वाढदिवस, जाणून घ्या प्रीतीबद्दल 'या' रंजक गोष्टी - अभिनेत्री प्रीती झिंटा

आज बॉलीवूडची डिंपल गर्ल आणि पंजाब किंग्सच्या मालकीणीचा म्हणजेच प्रीती झिंटाचा वाढदिवस आहे. आज प्रीती तिचा 48 वा वाढदिवस साजरा करत आहे. आजवर प्रीतीने अनेक हिट चित्रपट प्रेक्षकांना दिले आहेत. आज तिच्या वाढदिवसानिमित्त जाणून घेऊया तिच्या आयुष्यातील काही रंजक गोष्टी.

Happy Birthday Preity Zinta
प्रीती झिंटाचा वाढदिवस
author img

By

Published : Jan 31, 2023, 2:05 PM IST

हैदराबाद : अभिनेत्री प्रीती झिंटाने गेल्या अनेक वर्षापासून चित्रपटसृष्टीतून ब्रेक घेतला आहे. मात्र आजवर प्रीतीने अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केले आहे. प्रीतीचा जन्म हिमाचल प्रदेश येथे 31 जानेवारी 1975 रोजी झाला. प्रीती 13 वर्षाची असताना तिच्या आई-वडिलांचा अपघात झाला आणि या अपघातात तिच्या वडिलांचा मृत्यू झाला. या अपघातात तिची आई गंभीर जखमी झाली होती. प्रीतीच्या पर्सनल लाइफबद्दल बोलायचे झाले तर तिने फेब्रुवारी 2019 मध्ये बॉयफ्रेंड जीन गुडएनफशी लग्न केले. त्यांचा हा विवाहसोहळा लॉस एंजेलिसमध्ये अत्यंत खासगी स्वरुपात पार पडला होता.

हिट चित्रपटांत काम : प्रीतीने अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केले आहे. 1998 मध्ये प्रिती झिंटाने 'दिल से..' चित्रपटातून पदार्पण केले. ती पदार्पणापासूनच आपल्या अभिनयाने चाहत्यांचे मन जिंकत आली आहे. तिच्या डिंपलमुळे चाहते तिच्यावर फिदा आहेत. ती डिंपलमुळे नेहमी खुलून दिसते. आज प्रितीचा 48 वा वाढदिवस आहे. तिने सलाम नमस्ते, वीर जारा, कल हो ना हो, कोई मिल गया, कभी अलविदा ना कहना आणि सोल्जर यासारख्या हिट चित्रपटांमध्ये काम केले. या चित्रपटांमधील प्रीतीच्या अभिनयाला प्रेक्षकांची पसंती मिळाली.

प्रीतीच्या अफेअर्सची चर्चा : अनेकवेळा डिंपल गर्लचे नाव स्टार क्रिकेटर्स आणि बिझनेसमॅनसोबत जोडले गेले. प्रीतीने अनेक चित्रपटांमध्ये काम केले. त्यादरम्यान चित्रपटातील अभिनेत्यासोबत अफेअर्स आहे, अशी चर्चा सुरु झाली. तसेच प्रीतीचे नाव क्रिकेटर ब्रेट ली, अभिनेता-मॉडल मार्क रॉबिन्सन आणि बिझनेसमॅन नेस वाडिया यांच्यासोबत देखील जोडण्यात आले. प्रीतीने 2016 मध्ये प्रितीने जीन गुडइनफसोबत लग्नगाठ बांधली. प्रीती झिंटाचे एका ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेटपटूबरोबर अफेअर असल्याचे म्हटले जात होते. हे दोघे बऱ्याचदा डेटिंग करताना पकडले गेले होते. त्यानंतर या दोघांना या अफेअरबाबत विचारणा करण्यात आली होती. पण प्रीतीने या नात्याबद्दल बोलणे टाळले होते.

दोन जुळ्या मुलांना जन्म : प्रितीला एकच डिंपल आहे हे अनेकांना माहीत नाही. 2015 मध्ये, प्रितीने खुलासा केला की, माझ्याकडे फक्त 1 डिंपल आहे आणि तो एक स्नायू दोष आहे. जेव्हा ती हसते तेव्हा ती मोहक दिसते. 2021 मध्ये प्रीतीने दोन जुळ्या मुलांना जन्म दिला. प्रीती सरोगसीच्या माध्यमातून 46 व्या वर्षी आई झाली. ही आनंदाची बातमी प्रीतीने सोशल मीडियावर फोटो शेअर केली होती. जय झिंटा गुडइनफ आणि जिया झिंटा गुडइनफ अशी या जुळ्या मुलांची नावे आहेत. प्रीती ही तिच्या मुलांचे फोटोज नेहमी सोशल मीडियावर शेअर करत असते.

हेही वाचा : प्रियांकाने अखेरीस एका समारंभात मुलगी मालतीचा चेहरा केला उघड, मालती मेरी दिसते खुपच क्यूट

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.