ETV Bharat / entertainment

प्रभासच्या 'सालार भाग 1 : सीझफायर'ला सेन्सॉर बोर्डाकडून मिळालं 'ए' प्रमाणपत्र - प्रशांत नील दिग्दर्शित सालार 1 ला ए प्रमाणपत्र

'बाहुबली' स्टार प्रभास केजीएफ फेम दिग्दर्शक प्रशांत नील यांच्यासोबत 'सालार: भाग 1 - सीझफायर' या चित्रपटासाठी पहिल्यांदाच काम करतोय. या चित्रपटाचं प्रदर्शन 22 डिसेंबरला होणार आहे. दरम्यान सेन्सॉर बोर्डानं याला 'ए' प्रमाणपत्र दिलं आहे.

Salaar Part 1 has received an A certificate
सालार भाग 1 : सीझफायर
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 11, 2023, 3:02 PM IST

Updated : Dec 11, 2023, 3:11 PM IST

मुंबई - 'सालार भाग 1 : सीझफायर' हा चित्रपट यावर्षीचा सर्वाधिक प्रतीक्षेत असलेला चित्रपट आहे. सुपरस्टार प्रभासची मुख्य भूमिका असलेल्या प्रशांत नील दिग्दर्शित या चित्रपटाची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे. 22 डिसेंबरला हा अ‍ॅक्शन-थ्रिलर हिंदी, तमिळ, तेलुगु, कन्नड आणि मल्याळम भाषेत प्रदर्शित होणार आहे.

चित्रपट थिएटरमध्ये रिलीज होण्यासाठी अवघे काही दिवस शिल्लक असताना, सेन्सॉर बोर्डाने या चित्रपटाचा रनटाईम दोन तास आणि 55 मिनिटांचा असल्याचं सांगितलं आहे. विशेष म्हणजे या चित्रपटाला 'ए' प्रमाणपत्र देण्यात आलंय. त्यामुळे हा चित्रपट 18 वर्षावरील प्रोढ प्रेक्षकचं पाहू शकणार आहेत. या चित्रपटात जास्त हिंसा असल्याचं कारण यामागं असल्याचं समजतंय.

जेव्हा चित्रपट 'ए' प्रमाणपत्रासह प्रदर्शित होतो तेव्हा कुटुंबासह पाहिला जात नाही. त्यामुळे बॉक्स ऑफिसवर त्याचा परिणाम होतो. 'सालार' चित्रपटाची बॉक्स ऑफिसवर शाहरुख खानच्या 'डंकी'शी टक्कर होणार आहे. त्यामुळे या स्पर्धेत पुढे जाण्यासाठी चित्रपटाला मिळालेलं प्रमाणपत्र अडथळा ठरु शकत. मात्र प्रौढांसाठी रिलीज झालेल्या चित्रपटांनाही भरपूर प्रतिसाद मिळू शकतो हे रणबीर कपूरच्या 'अ‍ॅनिमिल'नं नुकतंच सिद्ध करुन दाखवलंय. त्यामुळे 'सालार'च्या निर्मात्यांनी रिलीज तारीख निश्चित करताना ही रिस्क घेण्याचा निर्णय घेतला असावा.

'सालार' चित्रपटाच्या ट्रेलरला प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे. शिवाय 'केजीएफ'सारखा चित्रपट बनवणाऱ्या टीमसोबत प्रभास पहिल्यांदाच एका मोठ्या प्रोजेक्टवर काम करतोय. अलिकडे काही वर्षात प्रभासनं मोठं यश अनुभवलेलं नाही. त्यात त्याचा महात्त्वकांक्षी 'आदिपुरुष' चित्रपट फ्लॉप ठरला होता. त्यामुळे 'सालार भाग 1 : सीझफायर' चित्रपट हिट ठरणे त्याचा कारकिर्दीसाठीही महत्त्वाचं ठरणार आहे. अर्थात यासाठी प्रभासचे तमाम चाहते सज्ज झाले आहेत.

हेही वाचा -

1. अनन्या पांडे आणि सिद्धांत चतुर्वेदी स्टारर 'खो गए हम कहाँ'चं ट्रेलर रिलीज

2. सलमान खाननं वाचवलं होतं अनुष्का-विराटचं नातं ; जाणून घ्या या मागची कहाणी

3. सबा आझादचा 'आय वान्ना सी यू डान्स'वर परफॉर्मन्स, हृतिक रोशननं केलं कौतुक

Last Updated : Dec 11, 2023, 3:11 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.