ETV Bharat / entertainment

Adipurush pre-release even : प्रभासच्या चाहत्यांनो, 'आदिपुरुष' चित्रपटाच्या भव्य प्री-रिलीझसाठी व्हा सज्ज

'आदिपुरुष' या चित्रपटाच्या निर्मात्यांनी त्यांच्या सोशल मीडिया हँडलवर चित्रपटासाठी एक भव्य प्री-रिलीज कार्यक्रम जाहीर केला, जो 6 जून रोजी तिरुपती येथे होणार आहे.

Prabhas
प्रभास
author img

By

Published : May 24, 2023, 4:08 PM IST

मुंबई : अभिनेता प्रभास आणि अभिनेत्री क्रिती सॅनन सध्याला हे त्याच्या आगामी चित्रपट 'आदिपुरुष' यामुळे चर्चेत आहे. या चित्रपटाचे भारतीय महाकाव्य 'रामायण'ची पुनरावृत्तीचा यशस्वीपणे ट्रेलर लॉन्च झाल्यानंतर प्रभासचे चाहते या चित्रपटाच्या प्रदर्शनाचे फार आतुरतेने वाट पाहत आहेत. तसेच नुकत्याच एका अपडेटमध्ये, चित्रपटाच्या निर्मात्यांनी त्यांच्या सोशल मीडिया हँडलवर चित्रपटासाठी एक भव्य प्री-रिलीज कार्यक्रम जाहीर केला, जो 6 जून रोजी तिरुपती येथे होणार आहे. कार्यक्रमाचे पोस्टर शेअर करताना, निर्मात्यांनी लिहिले ' सिनेमॅटिक तीर्थयात्रेसाठी तयार व्हा. 6 जून ही तारीख तुमच्या कॅलेंडर नोट करून घ्या 'आदिपुरुष' एका महाकाव्यासाठी तिरुपतीच्या पवित्र मैदानावर अवतरत आहेत.

आदिपुरुष चित्रपट : 'प्री-रिलीझ कार्यक्रम' सिनेमॅटिक अविस्मरणीय प्रवासाची तयारी राहा '. असे पोस्टद्वारे त्यांनी शेअर केले आहे. सात महिन्यांपूर्वी टीझरला मिळालेल्या अतुलनीय प्रतिसादानंतर, निर्मात्यांनी आदिपुरुषचे रिलीज जानेवारी 2023 ते जून 2023 पर्यंत पुढे ढकलले आणि चित्रपटासाठी 'व्हीएफएक्स' चांगल्या दर्जाचे आहे की नाही प्रेक्षकांना सिनेमाचा साक्षीदार मिळेल याची खात्री करण्यासाठी त्यांनी अतिरिक्त बजेट चित्रपटाला लावला. हा चित्रपट 15 जून रोजी ट्रायबेका फिल्म फेस्टिव्हलमध्ये प्रथम प्रदर्शित केला जाईल. तसेच यूएसमध्ये या चित्रपटाची आगामी बुकिंग आधीच सुरू होणार आहे.

लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आदिपुरुष : आदिपुरुषचे दिग्दर्शन 'तानाजी - द अनटोल्ड स्टोरी' फेमचे ओम राऊत यांनी केले आहे आणि यात राघवच्या भूमिकेत प्रभास, जानकीच्या भूमिकेत क्रिती सॅनन, लंकेशच्या भूमिकेत सैफ अली खान, बजरंगच्या भूमिकेत देवदत्त नागे आणि लक्ष्मणाच्या भूमिकेत सनी सिंग आहेत. या चित्रपटाचे संगीत अजय-अतुल यांनी दिले आहे. तर या चित्रपटातील, गाणे हे मनोज मुंतशिर शुक्ला यांनी लिहिली आहेत. आदिपुरुषची निर्मिती ओम राऊत, भूषण कुमार, राजेश मोहनन, कृष्ण कुमार आणि प्रसाद सुतार यांनी केली आहे. हा सिनेमा 16 जूनला रिलीज होणार आहे.या चित्रपटाचे बजट हा 700 कोटीचा आहे. त्यामुळे प्रेक्षकांना हा चित्रपट किती भावणार हे येणाऱ्या काळातच समजेल.

हेही वाचा : Rajesh Roshan Birthday : चार दशके रसिकांना मंत्रमुग्ध करणारे संगीतकार राजेश रोशन

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.