ETV Bharat / entertainment

प्रभास आणि टेड सारंडोसची ग्रेट भेट, राणा दग्गुबतीच्या घरी सेलेब्रिटींसह नेटफ्लिक्सच्या सीईओची पार्टी - नेटफ्लिक्सच्या सीईओची पार्टी

Prabhas pose with Ted Sarandos : नेटफ्लिक्सचे सीईओ टेड सारंडोस सध्या हैदराबादमध्ये आहेत. त्यांनी शनिवारी बाहुबली स्टार प्रभास आणि टीम कल्की 2898 एडी यांची भेट घेतली. राणा दग्गुबती, एसएस राजामौली आणि दुल्कर सलमान यांनीही नेटफ्लिक्स हेड होन्चोसोबत शुक्रवारी 'मजेदार संध्याकाळ' घालवली.

Prabhas pose with Ted Sarandos
प्रभास आणि टेड सारंडोसची ग्रेट भेट
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 9, 2023, 4:26 PM IST

हैदराबाद - Prabhas pose with Ted Sarandos : नेटफ्लिक्सचे सीईओ टेड सारंडोस सध्या भारताच्या दौऱ्यावर आहेत. साऊथ स्टार राम चरण आणि चिरंजीवी यांसारख्या स्टार्सकडून हैदराबादमध्ये त्यांचे जोरदार स्वागत झाले. हैदराबादच्या भेटीदरम्यान, टेडने ज्युनियर एनटीआर, महेश बाबू यांचीही भेट घेतली.

प्रभास आणि 'कल्की 2898 एडी'च्या टीमशी टेड सारंडोस यांनी भेट घेतली याची चर्चा सध्या सोशल मीडियावर जोरात आहे. शुक्रवारी साऊथ स्टार राणा दग्गुबतीनं टेडला डिनरसाठी आमंत्रण दिलं होतं. या पार्टीत दुल्कर सलमान, एसएस राजामौली आणि इतरही सेलेब्रिटी सामील झाले होते.

व्हायरल ग्रुप सेल्फीमध्ये टेड प्रभास आणि 'कल्की 2898 एडी' दिग्दर्शक नाग अश्विन यांच्यासोबत फोटो क्लिक करताना दिसत आहेत. फोटोत 'वैजयंती फिल्म्स'च्या निर्मात्या स्वप्ना आणि प्रियंका दत्त, नेटफ्लिक्स इंडियाच्या कंटेंटच्या उपाध्यक्षा मोनिका शेरगिल आणि इतरही सेलेब्रिटी यावेळी उपस्थित होते.

प्रभास, पांढर्‍या टी-शर्ट आणि काळ्या पँटसह काळ्या पुलओव्हरसह, व्हायरल फोटोत आकर्षक दिसत होता. यामध्ये प्रभासची दाढी वाढलेली दिसते. चाहत्यांना त्याचा हा लूक आवडला आहे. प्रभास आगामी संदीप रेड्डी वंगाच्या 'स्पिरीट' या चित्रपटात दिसणार असल्यामुळे त्यानं हाच लूक धारण करावा अशी काही चाहत्यांनी अपेक्षा व्यक्त केली आहे.

दरम्यान, शुक्रवारी त्याच्या घरी डिनरवर भेट झाल्यानंतर राणा दग्गुबतीने देखील सोशल मीडियावर टेड आणि काही जवळच्या मित्रांसोबतचे फोटो शेअर केले. आरआरआरचे दिग्दर्शक एसएस राजामौली, व्यंकटेश दग्गुबती, दुल्कर सलमान आणि इतरांनी एकत्र मजेत संध्याकाळ घालवताना फोटोसाठी पोज दिल्या आहेत.

यापूर्वी, टेडने तेलुगू सुपरस्टार महेश बाबू याचीही भेट घेतली होती आणि नंतर त्यांचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले. ब्लॉकबस्टर आरआरआर मधील ज्युनियर एनटीआरने टेड आणि त्याच्या टीमला शुक्रवारी दुपारच्या जेवणासाठी आमंत्रित केले होते. त्याच्या सोशल मीडियावर त्यानं या मीटिंगची झलक शेअर केली. हैदराबादमध्ये टेडच्या सुरुवातीच्या भेटीमध्ये मेगास्टार चिरंजीवी आणि त्यांचा मुलगा राम चरण यांच्या भेटींचा समावेश होता.

हेही वाचा -

1. मानसी स्कॉट आणि मेटास्टार मीडिया देणार संगीताची अनोखी अनुभूती

2. न भेटताही विकी कौशलच्या प्रेमात पडली होती कतरिना कैफ, अशी सुरू झाली 'लव्ह स्टोरी'

3. ज्युनियर एनटीआरनं नेटफ्लिक्सचे सीईओ टेड सारंडोसला जेवणासाठी केले आमंत्रित

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.