ETV Bharat / entertainment

Pippa screening: ईशान खट्टर स्टारर 'पिप्पा'च्या स्क्रिनिंगला मीरा राजपूतनं लावली हजेरी - पिप्पा कधी होणार रिलीज

Pippa screening : ईशान खट्टरची मुख्य भूमिका असलेल्या 'पिप्पा' या आगामी चित्रपटाचं बुधवारी रात्री स्पेशल स्क्रिनिंग आयोजित करण्यात आलं होतं. या कार्यक्रमात ईशानची वहिणी मीरा राजपूत देखील उपस्थित होती.

Pippa screening
पिप्पा स्क्रीनिंग
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 9, 2023, 3:12 PM IST

मुंबई - Pippa screening : 'पिप्पा' चित्रपटाच्या निर्मात्यांनी 8 नोव्हेंबर रोजी चित्रपटाचे स्पेशल स्क्रीनिंग आयोजित केलं होतं. ईशान खट्टर आणि मृणाल ठाकूर यांचा हा चित्रपट दोन दिवसांत ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. रिलीजच्या आधी, स्क्रिनिंग इव्हेंटमध्ये विद्या बालन, महेश भट्ट, सोनी राजदान, कुणाल खेमू, आणि आदित्य रॉय कपूर यांसारख्या अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. या स्क्रीनिंगमध्ये ईशानची वहिनी मीरा राजपूतदेखील उपस्थित होती. इंस्टाग्रामवरील एका व्हिडिओमध्ये मीरा राजपूत तिचा दीर ईशान खट्टरसोबत पोझ देताना दिसतेय. शाहिद कपूरच्या पत्नीनं आकर्षक फिकट गुलाबी रंगाचा ड्रेस परिधान केला होता, तर ईशान खट्टरनं यावेळी सूट परिधान केला होता. या लूकमध्ये तो मोहक दिसत होता. दुसरीकडे मृणाल ठाकूरनं ब्राऊन गाऊन परिधान करून सर्वांचे लक्ष वेधून घेतलंय. आदित्य रॉय कपूर फॉर्मल पण क्लासी लूकमध्ये या कार्यक्रमाला आला होता. यासोबतच विद्या बालन काळ्या रंगाच्या साडीत खूप सुंदर दिसत होती. या तिघांनीही कॅमेऱ्यासमोर एकत्र पोझ दिली.

Pippa screening
पिप्पा स्क्रीनिंग

'पिप्पा' चित्रपटाबद्दल : 'पिप्पा' चित्रपट 1971च्या भारत-पाकिस्तान युद्धावर आधारित आहे. बांगलादेशच्या स्वातंत्र्यलढ्यातील हा मोठा क्षण होता. 'पिप्पा'ची निर्मिती आरएसव्हिपी (RSVP) आणि सिद्धार्थ रॉय कपूर यांच्या रॉय कपूर फिल्म्सच्या बॅनरखाली झाली आहे. राजा कृष्ण मेनन यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शित केलंय. एका मुलाखतीदरम्यान, ईशान खट्टरनं 'पिप्पा'च्या शेवटच्या शॉटदरम्यान स्फोट झालेल्याचा खुलासा केला होता. त्यानं सांगितलं होत की, 'मी तुम्हाला पीटी-76 बद्दल एक रंजक गोष्ट सांगतो. 'जेव्हा आम्ही शेवटचा शॉट शूट करत होतो, तेव्हा अचानक टाकीतून काळा धूर येऊ लागला. तरीही आम्ही तो शॉट पूर्ण शूट केला'.

  • " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">

'पिप्पा कधी होणार रिलीज : 'पिप्पा'मध्ये ईशान आणि मृणाल व्यतिरिक्त प्रियांशू पैन्युली आणि सोनी राजदान यांच्याही भूमिका आहेत. हा चित्रपट 10 नोव्हेंबर 2023 रोजी अ‍ॅमेझॉन प्राईम व्हिडिओवर (Amazon Prime Video) प्रसारित होणार आहे. या चित्रपटामध्ये ईशान पहिल्यांदा सैनिकाच्या भूमिकेत दिसणार आहे. 'पिप्पा' चित्रपटासाठी तो खूप उत्सुक आहे. त्याला या चित्रपटापासून खूप अपेक्षा आहेत.

Pippa screening
पिप्पा स्क्रीनिंग

हेही वाचा :

  1. The Archies trailer out: झोया अख्तर दिग्दर्शित 'द आर्चीज'चा कर्णमधुर, नेत्रसुखद ट्रेलर प्रदर्शित
  2. Elvish yadav : रेव्ह पार्टी आणि सापाचं विष पुरविल्या प्रकरणी एल्विश यादवची होणार पुन्हा चौकशी
  3. Bigg Boss 17 day 25 : ऐश्वर्या - अंकिताचं भांडण सुरूच, मन्नारा चोप्रानं घेतलं अभिषेक कुमारचं चुंबन

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.