ETV Bharat / entertainment

AR Rahman faces backlash : एआर रहमानचं गाणं वादाच्या भोवऱ्यात, 'पिप्पा'च्या निर्मात्यांनी मागितली माफी

AR Rahman faces backlash : बंगाली कवी नजरुल इस्लाम यांच्या गाजलेल्या 'करार ओई लुहो कोपट' या बंगाली देशभक्तीपर गीताचं संगीतकार एआर रहमान यांनी रिक्रिएशन केलंय. 'पिप्पा' या अलिकडे ओटीटीवर रिलीज झालेल्या चित्रपटात हे गाणं वापरण्यात आलंय. या गीताची तुलना नेटिझन्सनी केली आणि नव्या गीतावर तुफान टीकास्त्र सोडले. अखेर चित्रपटाच्या निर्मात्यांनी माफी मागून यावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केलाय.

AR Rahman faces backlash
एआर रहमानचं गाणं वादाच्या भोवऱ्यात
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 14, 2023, 11:05 AM IST

मुंबई - AR Rahman faces backlash : ईशान खट्टरची प्रमुख भूमिका असलेला पिप्पा हा चित्रपट नुकताच ओटीटीवर रिलीज झाला. या चित्रपटात एआर रहमान यांनी संगीतबद्ध केलेलं 'करार ओई लुहो कोपट' हे देशभक्तीपर गाणं वादाच्या भोवऱ्यात सापडलंय. सोशल मीडियावर याबद्दल तीव्र प्रतिक्रिया उमटल्यानंतर निर्मात्यांनी माफी मागितली आहे. सोमवारी हाऊस रॉय कपूर फिल्म्स या प्रॉडक्शन हाऊसनं इन्स्टाग्रामवर निवेदन प्रसिद्ध करत बंगाली कवी नजरुल इस्लाम यांच्या या देशभक्तीपर गाण्याबद्दल मागितली आहे.

  • " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">

प्रॉडक्शन हाऊसनं निवेदनात म्हटलंय की," 'करार ओई लूहो कोपट' या गाण्याच्या भोवती सध्या सुरू असलेल्या चर्चे दरम्यान चित्रपटाचे निर्माते, दिग्दर्शक आणि संगीतकार हे स्पष्ट करु इच्छितात की, दिवंगत कवी काझी नजरुल इस्लाम यांच्याकडील या काव्याचं हक्क मिळवल्यानंतर या गाण्याचं आम्ही केलेलं सादरीकरण हा एक कलात्मक दृष्टीकोनातून केलेला प्रयत्न आहे."

"आम्हाला या गाण्याची मूळ रचना आणि दिवंगत कवी काझी नजरुल इस्लाम यांच्याबद्दल मनापासून आदर आहे. त्यांचं भारतीय उपखंडातील संगीत, राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील योगदान अतुलनीय आहे. बांगलादेशच्या मुक्तीसाठी आणि स्वातंत्र्य, शांतता आणि न्यायासाठी संघर्षाच्या भावना लक्षात घेऊन हा अल्बम त्यांचे जीवन समर्पित केलेल्या स्त्री-पुरुषांना श्रद्धांजली म्हणून तयार करण्यात आला आहे, " असे निवेदनात म्हटले आहे.

निवेदनात पुढे म्हटलंय की, "आम्ही दिवंगत कल्याणी काझी आणि अनिर्बन काझी यांच्याशी संपर्क करुन त्यांच्या परवानगीनं या गाण्याच्या निर्मितीपर्यंत पोहोचलो. करारामध्ये घालण्यात आलेल्या सर्व नियम अटींचं पालन करुनच गाण्याच्या सांस्कृतिक महत्त्वाला अभिवादन करण्याचा आमचा हेतू होता. यामुळे आम्हाला नवीन रचनासह गीत वापरण्याची परवानगी मिळाली. प्रेक्षकांना मूळ रचनेशी असलेली भावनिक जोड आमच्या लक्षात आली आहे. सर्व कला मूळतः व्यक्तिनिष्ठ असली तरी देखील जर आमच्या या रचनेनं कोणाच्या भावना दुखावल्या गेल्या असतील किंवा अनपेक्षित त्रास झाला असेल तर आम्ही मनापासून क्षमा मागतो," असे निवेदनात म्हटले आहे.

  • God of modern Indian music to many, A.R. Rahman, has successfully ruined Nazrul's Karar Oi Louho Kopat. Not only does his pathetic new composition fail to justify meaning and mood of song, but it also sounds very bad & unsynchronized. We will understand the impact of original!🤮 https://t.co/JtWJbIzFw4 pic.twitter.com/dMVvVhKnTj

    — horekrokom | হরেকরকম (@horek_rokom) November 9, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

एआर रहमान यांनी रिक्रिएट केलेलं 'करार ओई लूहो कोपट' गाणं रिलीज झाल्यानंतर त्याची तुलना मूळ गाण्याशी होऊ लागली. अनेक नेटीझन्सना नवं गाणं आवडलं नाही. त्यामुळे तीव्र स्वरुपाच्या प्रतिक्रिया उमटलेल्या पाहायला मिळाल्या. अशा प्रतिक्रियांवर एक नजर टाकली की आपल्या लक्षात येईल की नेटिझन्स का प्रतिक्रिया देत आहेत.

  • AR Rahman must apologize and take it down, it is distasteful, given the fact that this song has inspired Bengalis for many many decades

    — Samrat (@foodiesamrat) November 10, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

ब्रिगेडियर बलराम सिंग मेहता यांच्या 'द बर्निंग चाफीज' या पुस्तकावर आधारित 'पिप्पा' हा चित्रपट मेनन, तन्मय मोहन आणि रविंदर रंधावा यांनी लिहिला आहे. RSVP मुव्हीज आणि सिद्धार्थ रॉय कपूरच्या रॉय कपूर यांच्या फिल्म्सच्या बॅनरखाली पिप्पा हा चित्रपट तयार झालाय. रॉनी स्क्रूवाला निर्मित या चित्रपटाचं दिग्दर्शन राजा कृष्ण मेनन यांनी केलंय. या चित्रपटात ईशान खट्टर, मृणाल ठाकूर, प्रियांशू पैन्युली आणि सोनी राझदान यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

  • My thoughts exactly. First time I heard this, I was like - "what the hell is this?". I thought he'd re-arrange, not re-compose. I think the meaning got lost in translation. The words should make your blood boil, not lend itself to peppy and happy carnivalesque tunes.

    — Abhijit (@Avizeat) November 9, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

हेही वाचा -

1. Ranveer Singh : रणवीर सिंगनं मुंबईत खरेदी केले दोन लग्जरियस फ्लॅट्स, अधिक जाणून घेण्यासाठी वाचा

2. Sam Bahadur Sonng Release : 'सॅम बहादूर'मधील 'बढते चलो' या देशभक्तीपर गाण्याचं विकी कौशलनं केलं लॉन्चिंग

3. Aryan Khan Turns 26 : 'बिग ब्रदर आणि बेस्ट फ्रेंड' म्हणत आर्यन खानला सुहानानं दिल्या वाढदिवसाच्या सदिच्छा

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.