ETV Bharat / entertainment

Pathaan Box Office Collection Day 5 : शाहरुख खानच्या 'पठाण'ने केली 500 कोटींपेक्षा अधिकची कमाई

'पठाण'ने वर्ल्डवाइड बॉक्स ऑफिसवर पाच दिवसांत 500 कोटी रुपयांपेक्षा जास्त कमाई करून बाॅलिवूडला पुन्हा एकदा मोठी संजीवनी दिली आहे. आतापर्यंत शांत असलेली बाॅलिवूड चित्रपटसृष्टी यामुळे खडबडून जागी झाली आहे. 'पठाण जगभरातून सर्वात मोठी ओपनिंग करणारा पहिला हिंदी चित्रपट ठरला आहे.

author img

By

Published : Jan 30, 2023, 1:51 PM IST

Pathaan Box Office Collection Day 5, Shah Rukh Khan collects over 500 crore worldwide
बॉलीवूड किंग खानच्या 'पठाण'ची 500 करोडपेक्षा अधिकची कमाई

मुंबई : बॉक्स ऑफिसवर बक्कळ कमाई करणाऱ्या 'पठाण' या चित्रपटाने शाहरुख खानने आपले स्टारडम अजूनही जिवंत असल्याचे सिद्ध केले आहे. 25 जानेवारीला रिलीज झालेल्या पठाण या चित्रपटाने 5 दिवसांत जगभरात 500 कोटींचा आकडा सहज पार केला आहे. देशभरातील आणि जगभरातील चित्रपटगृहे प्रेक्षकांच्या गर्दीने खचाखच भरलेली असतात. 'पठाण'ने बॉक्स ऑफिसवर कमाईची सुनामी आणली आहे. थिएटरमध्ये 'पठाण'च्या आसपास एकही चित्रपट टिकत नाही.

  • #Pathaan Day 5 All-India Nett early estimates is a whopping ₹ 70 Crs.. 🔥

    — Ramesh Bala (@rameshlaus) January 30, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

पाचव्या दिवशीही अद्भूत कलेक्शन : बॉक्स ऑफिसवर 55 कोटींची ओपनिंग केलेल्या 'पठाण' चित्रपटाने अवघ्या पाच दिवसांत जगभरात 550 कोटींचा व्यवसाय केला आहे. या चित्रपटाने यापूर्वी 4 दिवसांत 400 कोटींची कमाई केली होती. चित्रपट विश्लेषक तरण आदर्श यांच्या म्हणण्यानुसार, चित्रपटाने पाचव्या दिवशी 65 कोटींचा करिश्माई कलेक्शन केला आहे.

5 दिवस चढत्या क्रमाने कमाई : 'पठाण'ने पहिल्या दिवशी 55 कोटी, दुसऱ्या दिवशी 70 कोटी, तिसऱ्या दिवशी 38 कोटी, चौथ्या दिवशी 51.4 कोटी आणि पाचव्या दिवशी 65 कोटींचा गल्ला जमवून थिएटर्सना आग लावली आहे. थिएटर्स मालक अत्यंत खूश असल्याचे पाहायला मिळाले आहे. यामध्ये त्यांनी मोठा आनंद व्यक्त केला आहे.

सर्वात जलद 250 कोटी कमावणारा चित्रपट : 'पठाण' हा देशांतर्गत बॉक्स ऑफिसवर सर्वात जलद 250 कोटींची कमाई करणारा चित्रपट ठरला आहे. शाहरुख खानच्या 'पठाण' चित्रपटाने अवघ्या 5 दिवसांत 277 कोटींची कमाई करून इतिहास रचला आहे. या शर्यतीत 'पठाण'ने KGF-2 (7 दिवस), बाहुबली-2 (8 दिवस), दंगल (10 दिवस), संजू (10 दिवस), टायगर जिंदा है (10 दिवस) यांना मागे टाकले आहे. आता 'पठाण' देशांतर्गत बॉक्स ऑफिसवर 300 कोटींच्या जवळ आहे.

किंग खानचे जोरदार आगमन : पठाण'ने जगभरात बॉक्स ऑफिसवर 106 कोटींचे ओपनिंग कलेक्शन केले होते. पठाणने देशांतर्गत बॉक्स ऑफिसवर 57 कोटी रुपयांचे खाते उघडले. 'पठाण' हा हिंदी चित्रपटसृष्टीतील आतापर्यंतचा सर्वात मोठा ओपनिंग करणारा चित्रपट ठरला आहे. चित्रपटाच्या दुस-या दिवशी भारतात 60 ते 65 कोटींचे कलेक्शन अपेक्षित होते, पण 'पठाण'ने या अपेक्षेपेक्षाही पुढे जाऊन 70 कोटींची कमाई केली.

'पठाण'ने या चित्रपटांचे रेकॉर्ड तोडले : शुक्रवारी (सार्वजनिक सुटी नसताना) 'पठाण' पुन्हा एकदा निस्तेज दिसला. 'पठाण'च्या तुलनेत इतर हिंदी-दक्षिण चित्रपटांच्या तिसऱ्या दिवसांच्या कमाईबद्दल बोलायचे, तर रणबीर कपूर स्टारर 'संजू' (46.71 कोटी) , बाहुबली-2 (46.5 कोटी), KGF-2 (42.09 कोटी), सलमान खानचा चित्रपट 'टायगर जिंदा है' (45.53) आणि आमिर खानचा चित्रपट 'दंगल'ने 41.34 कोटींची कमाई केली.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.