मुंबई : शाहरुख खानच्या 'पठाण' चित्रपटाचा बॉक्स ऑफिसवर दबदबा कायम आहे. शाहरुख खान, दीपिका पदुकोण आणि जॉन इब्राहिम स्टारर चित्रपट पठाण घरगुती बॉक्स ऑफिसवर सर्वाधिक कमाई करणारा हिंदी ब्लॉकबस्टर चित्रपट ठरला आहे. बॉक्स ऑफिसवर पुन्हा इतिहास रचणारा पठाण अखेर आमिर खानच्या दंगल कलेक्शनला मागे टाकणार आहे. बॉलिवूड हंगामाच्या रिपोर्टनुसार, शनिवारी पठाण चित्रपटाने 398 कोटींचा व्यवसाय करून 387 कोटींचा विक्रम मोडला.
सर्वाधिक व्यवसाय करण्याचा विक्रम : पठाण येत्या 5 दिवसात KGF 2 च्या विक्रमाला स्पर्श करू शकतो. यासोबतच 11 दिवसात भारतीय चित्रपट उद्योगात सर्वाधिक व्यवसाय करण्याचा विक्रमही पठाणच्या नावावर आहे. आता ब्लॉकबस्टर चित्रपट पठाणची नजर सर्वाधिक कमाई करणार्या केजीएफ २ आणि बाहुबली २ या बॉलिवूड चित्रपटांवर आहे. चित्रपटसृष्टीतील तज्ज्ञांच्या मते, पठाण येत्या ५ दिवसांत KGF 2 चा रेकॉर्ड मोडेल. पठाण KGF 2 चा विक्रम मोडण्यात यशस्वी ठरला तर, त्याच्यासाठी पुढचा थांबा बाहुबली 2 चित्रपटाच्या 511 कोटी रुपयांच्या विक्रमाला स्पर्श करणे असेल. पठाणने हा विक्रम गाठला तर तो बॉलिवूडमधील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरेल.
बॉलिवूडसाठी आशेचा नवा किरण : शाहरुख खानने शेवटच्या वेळी 2013 मध्ये चेन्नई एक्सप्रेस हा मोठा हिट चित्रपट दिला होता. आता 'पठाण' स्पाय थ्रिलर असलेल्या या चित्रपटाने जागतिक स्तरावर ७२५ कोटींचा आकडा पार केला आहे. चित्रपटसृष्टीतील तज्ज्ञांचे असे मत आहे की, हिंदी चित्रपटसृष्टी दीर्घकाळापासून फ्लॉप चित्रपट आणि बहिष्काराच्या मोहिमेमुळे अडचणीत आली होती. अशा स्थितीत पठाणचे यश बॉलिवूडसाठी आशेचा नवा किरण बनण्यात यशस्वी होताना दिसत आहे.
शारुखचे जबरा फॅन : शाहरुखच्या एका जबरा फॅनने पठाण पाहण्यासाठी संपूर्ण थिएटरचं बुक केलं होतं. अमरावतीमधील एसआरके फॅनक्लबने पूर्ण थिएटरचे बुकींग केले होते. या फॅन क्बलचा फाऊंडर चांदूर रेल्वे शहरातील आशिष उके हा आहे. अमरावतीमधील तापडिया सिटी सेंटरमधील मिराज मल्टिप्लेक्स सिनेमा याठिकाणी सकाळी ९ ते १२ वाजताचा शो बुक करण्यात आला होता. यामध्ये उके यांनी 270 तिकीट विकत घेतले होते.
शाहरुख खान गेल्या 30 वर्षांपासून भारतीय चित्रपटसृष्टीवर राज्य करत आहे. या संदर्भात देशात आणि जगात त्याच्या फॅन फॉलोइंगची यादी खूप मोठी आहे. शाहरुखचे चाहते त्याच्या चित्रपटांची आतुरतेने वाट पाहत असतात. मग हे चाहते देशातील असोत की परदेशातील. शाहरुख आणि त्याचे चित्रपट जगभर लोकप्रिय आहेत. सध्या शाहरुख खान त्याच्या पठाण या ब्लॉकबस्टर चित्रपटामुळे चर्चेत आहे. आता पठाणबाबत असे बोलले जात आहे की, पाकिस्तान या शेजारील देशात बेकायदेशीरपणे हा चित्रपट दाखवला जात आहे. विशेष म्हणजे, पुलवामा हल्ल्यानंतर (2019), भारताने पाकिस्तानच्या कलाकारांवर आणि चित्रपटांवर बंदी घातली होती, जी अद्यापही सुरू आहे.