मुंबई - Parineeti Chopra Raghav Reception : राघव चढ्ढा आणि परिणीती चोप्रा हे 24 सप्टेंबर रोजी लग्नाच्या बेडीत अडकले. उदयपूरच्या 'द लीला पॅलेस'मध्ये दोघांनी मोठ्या थाटामाटात लग्न केल्यानंतर त्यांचे अनेक व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. अनेकजण त्यांना लग्नाच्या शुभेच्छा देत आहेत. या लग्नात अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. दरम्यान आता लग्नानंतर हे जोडपे त्यांच्या जवळच्या लोकांसाठी रिसेप्शन पार्टी आयोजित करणार आहेत. दरम्यान आता सध्या त्यांच्या रिसेप्शन पार्टीची निमंत्रण पत्रिका सोशल मीडियावर लीक झाली आहे.
रिसेप्शन पार्टीची निमंत्रण पत्रिका लीक : राघव चढ्ढा आणि परिणीती यांच्या रिसेप्शन पार्टीची निमंत्रण पत्रिका सोशल मीडियावर प्रचंड प्रमाणात व्हायरल होत आहे. या कार्डनुसार राघव आणि परिणीतीची रिसेप्शन पार्टी 30 सप्टेंबरला चंदीगडच्या ताज हॉटेलमध्ये आयोजित केली जाणार आहे. यानंतर हे कपल दिल्ली आणि मुंबईत रिसेप्शनही देणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार दिल्लीतील रिसेप्शनला राजकीय जगतातील अनेक दिग्गज नेते हजेरी लावणार आहेत, तर मुंबईतील पार्टीत बॉलिवूड स्टार्सचा मेळा पाहायला मिळणार आहे. लग्नानंतर परिणीती ही दिल्लीत तिच्या सासरच्या घरी पोहोचली आहे.
राघव चढ्ढा आणि परिणीतीचा व्हिडिओ झाला व्हायरल : आता सध्या राघव चढ्ढा आणि परिणीतीचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर समोर येत आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये ती आपल्या पतीसह दिसत आहे. या व्हिडिओमध्ये ती पतीसोबत हसत आहे. परिणीतीनं गळ्यात मंगळसूत्र घातलेले आहे. याशिवाय तिनं सिंदूर देखील आपल्या मांगमध्ये भरले आहे. या लूकमध्ये ती खूप सुंदर दिसत आहे. अनेक सेलिब्रिटींनी या जोडप्याचे अभिनंदन केले आहेत. परिणीतीची चुलत बहीण प्रियांका चोप्रा ही व्यस्त असल्यामुळं या लग्नात येऊ शकली नाही, मात्र तिनं सोशल मीडियावर कमेंट करून तिला शुभेच्छा दिल्या आहेत. त्यानंतर समांथा रुथ प्रभू, क्रिती सेनॉन, कियारा अडवाणी, आलिया भट्ट, काजोल, वरुण धवन, सिद्धार्थ मल्होत्रा, नीना गुप्ता आणि भूमी पेडणेकर आणि करीना कपूर या सर्वांनी परिणीती आणि राघवला त्यांच्या लग्नासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
हेही वाचा :