ETV Bharat / entertainment

Parineet and Raghav wedding : परिणीती चोप्रा आणि राघव चढ्ढा या ठिकाणी करणार आहे लग्न जाणून घ्या... - परिणीती चोप्राचे लग्न

परिणीती चोप्रा आणि राघव चढ्ढा, दोघेही राजस्थानमध्ये उदयपूरमधील राजवाड्यात लग्न करू शकतात. त्यांनी उदयपूरजवळ एक सुंदर पॅलेस शोधले आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, परिणीती आणि राघव वर्षाच्या अखेरीस लग्न करू शकतात.

Parineet and Raghav wedding
परिणीती चोप्रा आणि राघव चढ्ढाचे लग्न
author img

By

Published : Jun 9, 2023, 8:03 PM IST

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा सध्या तिच्या लव्ह लाईफमुळे चर्चेत आहे. राघव चड्ढासोबतच्या साखरपुड्यानंतर तिचे नाव रोजच चर्चेत असते. कधी हे दोघे डिनर डेटवर स्पॉट होतात तर कधी एकत्र जेवण करताना दिसतात. त्याचबरोबर आता मीडियाच्याही नजरा या जोडप्यावर खिळल्या आहेत. तर दुसरीकडे, आता दोघेही त्यांच्या लग्नाच्या तयारीत व्यस्त आहेत. आता त्यांच्या लग्नाबाबत अनेक मोठे अपडेट्स समोर येत आहेत. राघव आणि परिणीतीनेही इतर स्टार्सप्रमाणे डेस्टिनेशन वेडिंग करण्याचा निर्णय घेतला आहे. इतकेच नाही तर या दोघांनीही त्यांच्या या खास दिवसासाठी राजस्थानची निवड केली आहे. मीडिया रिपोर्ट्सवर , दोघेही उदयपूरमधील राजवाड्यात लग्न करू शकतात असे समजले आहे.

परिणीती चोप्राचे लग्न : परिणीती चोप्राच्या चुलत बहीणने म्हणजेच प्रियांका चोप्रानेही उदयपूरच्या राजवाड्यात लग्न केले होते. आता असे माहित होत आहे की, परिणीती आणि राघव यांना देखील लग्नासाठी उदयपूरचा 'द ओबेरॉय उदयविलास' आवडला आहे. हा वाडा पिचोला तलावाच्या काठावर आहे आणि येथे तुम्ही सुंदर तलाव आणि भव्य उद्यान देखील आहे. आता असे समजल्या जात आहे की, राघव आणि परिणिती दोघे हे ठिकाण वेडिंग डेस्टिनेशन बनवू शकतात. मीडिया रिपोर्ट्नुसार राघव आणि परिणीतीला त्यांचे लग्न खूप पारंपारिक ठेवायचे आहे. दोघांच्या कुटुंबीयांसाठी त्यांच्या प्रथा खूप महत्त्वाच्या आहेत आणि हे त्यांच्या साखरपुड्या मध्येही दिसून आले होते. परिणीती आणि राघव यांनी 13 मे रोजी नवी दिल्लीतील कपूरथला हाऊस येथे कुटुंबातील सदस्य आणि राजकीय दिग्गजांच्या उपस्थितीत साखरपुडा केला होता. या सोहळ्याला प्रियांका चोप्रा, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान आणि पी चिदंबरम उपस्थित होते.

लग्नासाठी राजस्थान सर्व सेलिब्रिटींचे आवडते स्पॉट : सध्या बॉलिवूडमध्ये डेस्टिनेशन वेडिंगचा ट्रेंड सुरू आहे. राजस्थान हे सर्व सेलिब्रिटींचे डेस्टिनेशन वेडिंगचे आवडते ठिकाण बनले आहे. अलीकडे राजस्थानमध्ये अनेक जोडप्यांचे लग्न केले आहे. त्यात सिद्धार्थ मल्होत्रा ​​आणि कियारा अडवाणी यांच्याप्रमाणेच कतरिना कैफ आणि विक्की कौशल यांचेही राजस्थानमध्ये लग्न झाले आहे. रिपोर्ट्सनुसार, परिणीती आणि राघव वर्षाच्या अखेरीस लग्न करू शकतात. त्यामुळे लवकरच आपल्याला त्यांच्या लग्नाचा स्पॉट कुठला असणार हे समजेल.

हेही वाचा :

  1. Bigg Boss OTT 2 : बिग बॉस ओटीटी 2चे गाणे रिलीज, रफ्तारसोबत थिरकला सलमान
  2. SRKs Pathaan : शाहरुखचा पठाण रशियासह CIS मध्ये ३००० स्क्रिन्सवर झळकणार
  3. Vignesh Shivan : विघ्नेश शिवनने लग्नाच्या पहिल्या वाढदिवसानिमित्त सोशल मीडियावर शेअर केले फोटो

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.