ETV Bharat / entertainment

प्रतिक्षा संपली! जितेंद्र कुमारच्या 'पंचायत 3' वेब सीरीजचा फर्स्ट लुक केला प्रदर्शित - पंचायत 3

Panchayat 3 : 'पंचायत 3' चा फर्स्ट लुक रिलीज झाला आहे. यामध्ये अभिनेता जितेंद्र कुमार उर्फ ​​अभिषेक त्रिपाठी बाईकवर दिसत आहे.

Panchayat 3
पंचायत 3
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 10, 2023, 2:23 PM IST

मुंबई - Panchayat 3 : अभिनेता जितेंद्र कुमार आणि अभिनेत्री नीना गुप्ता स्टारर 'पंचायत 3'ची शूटिंग पूर्ण झाली आहे. या वेब सीरीजचा आता मोस्ट अवेटेड फर्स्ट लूक प्राइम व्हिडिओनं रिलीज केला. यामध्ये जितेंद्र कुमार बाईकवर स्वार आहे. याशिवाय दुसऱ्या एका फोटोमध्ये अशोक पाठक (बिनोद) आणि सीझन 2चे सह-कलाकार दुर्गेश कुमार आणि बुल्लू कुमारदेखील दिसत आहेत. यांचे फोटो शेअर करताना प्राइम व्हिडिओनं कॅप्शनमध्ये लिहिलं की, ''आम्हाला माहित आहे की प्रतीक्षा असह्य आहे. त्यासाठी आम्ही तुमच्यासाठी सेटवरून काहीतरी आणले आहे. प्राइम सीझन 3 वर पंचायत''. 'पंचायत'मध्ये मंजू देवीची भूमिका साकारणाऱ्या नीना गुप्तानं तिसऱ्या सीझनचे शूटिंग पूर्ण केलं.

'पंचायत 3' वेब सीरीज होणार प्राईम व्हिडिओवर रिलीज : 'पंचायत 3' ही वेब सीरीज लवकरच प्राइम व्हिडिओवर दिसेल. नीना गुप्तानं शूट पूर्ण केल्यानंतर एक व्हिडिओ शूटिंग सेटवरचा इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये या वेब सीरीजमधील कलाकार आणि क्रूसह नीना गुप्ता दिसत आहे. व्हिडिओमध्ये केक कटिंग समारंभ झाला. प्राईम व्हिडिओनं गोव्यातील 54 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (इफ्फी) 'पंचायत सीझन 2'नं प्रथम सर्वोत्कृष्ट वेब सीरीज ओटीटी पुरस्कार जिंकून इतिहास रचला. या यशानंतर आता 'पंचायत 3'पासून चाहते प्रतिक्षा करत आहेत. 'पंचायत 2' हे खूप लोकप्रिय झालं होतं. सोशल मीडियावर अनेक रिल्स आणि मीम्स या वेब सीरीजचे तयार करून पोस्ट करण्यात आले होते.

'पंचायत' वेब सीरीजची कहाणी : 'पंचायत'मधील पात्र खूप प्रसिद्ध झाले आहे. या वेब सीरीजची कहाणी उत्तर प्रदेशातील फुलेरा या दुर्गम काल्पनिक गावात नोकरीच्या चांगल्या पर्यायांच्या अभावी पंचायत सचिव म्हणून एक इंजिनिअर रुजू झालेल्या सरकारी अधिकाऱ्याची आहे. त्याला गावामध्ये त्याला कुठल्या अडचणीचा सामना करावा लागतो? ते या वेब सीरीजमध्ये दाखविण्यात आलं आहे. या वेब सीरीजचं शुटिंग मध्य प्रदेशच्या सीहोर जिल्ह्यातील महोदिया गावात असलेल्या पंचायत कार्यालयात झालं आहे.

हेही वाचा :

  1. रिलेशनशिपमध्ये असताना मुनावर फारुकीनं काय केलं? अभिनेत्री आयेशा खाननं 'हा' केला गंभीर आरोप
  2. अक्षय कुमार, शाहरुख खानसह अजय देवगण अडचणीत, 'या' प्रकरणात लखनौ उच्च न्यायालयानं बजावली नोटीस
  3. अश्वत्थामाची भूमिका साकारणार शाहिद कपूर, विकी कौशलचा पत्ता कट

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.