ETV Bharat / entertainment

ओरिजनल 'जर्सी' स्टार नानीने केले शाहिद कपूर आणि टीमचे कौतूक - नानीने केले शाहिद कपूर आणि टीमचे कौतूक

अभिनेता नानीने शाहिद कपूर आणि त्याच्या जर्सी चित्रपटाच्या हिंदी रिमेकच्या संपूर्ण टीमचे कौतुक केले आहे. चित्रपट पाहून प्रभावित झालेल्याअभिनेता नानी याने प्रमुख कलाकार आणि दिग्दर्शक गौतम तिन्ननुरी यांची प्रशंसा केली आहे. गौतम तिन्ननुरी यांनी मूळ तेलुगू भाषेत बनलेल्या मूळ जर्सी चित्रपटाचे दिग्दर्शनही केले होते.

नानीने केले शाहिद कपूर आणि टीमचे कौतूक
नानीने केले शाहिद कपूर आणि टीमचे कौतूक
author img

By

Published : Apr 22, 2022, 10:29 AM IST

मुंबई - शाहिद कपूरचा क्रिकेट ड्रामा 'जर्सी' हा चित्रपट अखेर रिलीज झाला आहे आणि त्याच नावाच्या हिट तेलुगू चित्रपटाचा रीमेक करण्याची परीक्षा निर्मात्यांनी उत्तीर्ण केल्याचे दिसते. मूळ चित्रपटात क्रिकेटरची मुख्य भूमिका साकारलेल्या अभिनेता नानी याने ट्विटरवर रिमेक पाहिल्यानंतर शाहिद आणि संपूर्ण टीमचे कौतुक केले.

त्याने लिहिले, "#जर्सी पाहिला आणि आमचा गौतम पुन्हा पार्कच्या बाहेर हिट झाला. काय परफॉर्मन्स आणि अगदी मनापासून. शाहिद कपूर, मृणाल आणि पंकज कपूर सर आणि माझा मुलगा रोनित. हा खरा चांगला सिनेमा आहे. अभिनंदन." मूळ जर्सी स्टारकडून मिळालेले हे कौतुकाचे शब्द शाहिदसाठी सर्वोत्तम कौतुक आहे.

गौतम तिन्नानुरी द्वारे दिग्दर्शित 'जर्सी' चित्रपटाची कथा अर्जुनभोवती फिरते (शाहिदने साकारलेली भूमिका). एक अयशस्वी क्रिकेटर जो आपल्या मुलासाठी टीम इंडियाचे प्रतिनिधित्व करण्याचे स्वप्न पूर्ण करण्याचा निर्णय घेतो. मृणाल ठाकूर आणि पंकज कपूर देखील या चित्रपटाचा एक भाग आहेत. 2019 च्या ब्लॉकबस्टर चित्रपट 'कबीर सिंग' नंतर 'जर्सी' हा शाहिदचा पहिला रिलीज आहे. 'जर्सी'प्रमाणेच कबीर सिंग हा देखील तेलुगु हिट अर्जुन रेड्डीचा हिंदी रिमेक होता.

हेही वाचा - जाणून घ्या, तंबाखूच्या जाहिरातीच्या वादावर अजय देवगण काय म्हणाला?

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.