हैदराबाद - ज्युनियर एनटीआरच्या ( Jr NTR Birthday )वाढदिवसाच्या काही तास अगोदर, त्याच्या आगामी चित्रपटाच्या निर्मात्यांनी एक मनोरंजक लॉन्च केले. एनटीआर ३० (NTR 30 तात्पुरते शीर्षक) या आगामी चित्रपटाबद्दलची अपडेट देऊन दिग्दर्शक कोराटला शिवा ( Koratala Siva ) यांनी ज्यु. एनटीआरच्या चाहत्यांची उत्सुकता वाढवली आहे. ज्युनियर एनटीआर 20 मे रोजी त्याचा 39 वा वाढदिवस साजरा करत आहे.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
निर्मात्यांनी पोस्टर शेअर करताना ट्विटरवर मनोरंजक अपडेट शेअर केले आहे. यामध्ये आज संध्याकाळी एनटीआर ३० चे साडे सात वाजता अपडेट पाहण्यासाठी सज्ज रहा असेही म्हटले आहे. एनटीआर ३०च्या निर्मात्यांनी एक पोस्टर रिलीज केले आहे. आगामी मोठ्या सरप्राईजसाठी हे मोशन पोस्टर उत्कंठा वाढवत असून एनटीआरचे चाहते पोस्टरवर प्रचंड खूश आहेत.
पॅन इंडिया आरआरआर चित्रपटाला जबरदस्त हिट मिळाल्यानंतर, ज्युनियर एनटीआरचे आता देशभर फॅन्स तयार झाले आहेत. एनटीआर ३० या आगामी चित्रपटाची प्रतीक्षा आता संपूर्ण भारत करेल अशीच आजची स्तिती आहे. हे मोशन पोस्टर लॉन्च करुन एनटीआर ३०च्या निर्मात्यांनी ज्यु. एनटीआरला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
हेही वाचा - Jr Ntr Birthday: 'यंग टायगर' ज्यु. एनटीआरबद्दलच्या काही रंजक गोष्टी जाणून घ्या..