ETV Bharat / entertainment

31 years of SRK in film industry completed : किंग खानने इंडस्ट्रीमध्ये ३१ वर्षे पूर्ण केल्यामुळे 'आस्क एसआरके'शो ट्विटरवर केला होस्ट - जवान टीझर

बॉलिवूड सुपरस्टार शाहरुख खानने चित्रपटसृष्टीत 31 वर्षे पूर्ण केल्यामुळे त्याने चाहत्यांशी संपर्क साधण्यासाठी सोशल मीडियावर एक शो घेतला. किंग खानच्या 31 मिनिटांच्या शोमध्ये जवान चित्रपटाचे टीझर रिलीज आणि नकारात्मकतेशी तो कसा सामना करतो त्याबद्दल त्याने प्रश्नांची उत्तरे दिली.

king khan
किंग खान
author img

By

Published : Jun 26, 2023, 11:01 AM IST

मुंबई : बॉलिवूड सुपरस्टार शाहरुख खानने आज चित्रपटसृष्टीत ३१ वर्षे पूर्ण केली. दिव्या भारती आणि ऋषी कपूर यांच्यासोबत दिवाना हा त्यांचा पहिला चित्रपट 25 जून 1992 रोजी थिएटरमध्ये दाखल झाला होता. चित्रपटसृष्टीतील 31 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्याने, किंग खानने त्याच्या चाहत्यांशी आयस्क एसआरके सत्राद्वारे संपर्क साधण्यासाठी ट्विटरवर एक शो घेतला होता. चाहत्यांसह ऑनलाइन चिट-चॅट शो दरम्यान, किंग खानला त्यांच्या नात्यापासून ते त्याच्या आगामी चित्रपटांच्या अपडेट्सपर्यंत प्रश्न विचारे होते. किंग खानने त्याच्या चाहत्यांना नम्रपणे या प्रश्नावर उत्तर दिले. या शोमध्ये शाहरुखला विचारण्यात आले की, तो त्याच्या पहिल्या चित्रपटाबद्दल काय विसरू शकत नाही आणि त्याचे यश, याशिवाय तो नकारात्मकतेचा कसा सामना करतो, याव्यतिरिक्त या शो दरम्यान त्याला अनेक मनोरंजक प्रश्नांबद्दल विचारण्यात आले.

  • Wow just realised it’s 31 yrs to the day when Deewana hit the screens. It’s been quite a ride mostly a good one. Thanks all and we can do 31minutes of #AskSRK ??

    — Shah Rukh Khan (@iamsrk) June 25, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

किंग खानने ट्विटरवर शो होस्ट केला : रविवारी संध्याकाळी, किंग खानने ट्विटरवर त्याच्या चाहत्यांना आयस्क एसआरके सत्रात सामील होण्यासाठी आमंत्रित केले. साधारणपणे 10 ते 15 मिनिटे चाहत्यांशी संवाद साधणाऱ्या या सुपरस्टारने इंडस्ट्रीमध्ये किती वर्षे वावरत आहेत हे चिन्हांकित करण्यासाठी वेळ मर्यादा 31 मिनिटांपर्यंत वाढवली. किंग खानने ट्विटरवर लिहिले, 'व्वा आत्ताच कळले मला की दिवाना पडद्यावर आला आणि या चित्रपटाला 31 वर्षे पूर्ण झाली आहेत. ही एक राइड होती, बहुतेक चांगली होती. सर्वांचे आभार आणि आम्ही आयस्क एसआरकेची 31 मिनिटे करू शकतो.'

दिवाना चित्रपट : शाहरुखने ट्विट शेअर केल्यानंतर लगेचच मायक्रो-ब्लॉगिंग साइटवर आस्क एसआरके या शो हॅशटॅगने ट्रेंन्ड झाले. त्यानंतर किंग खानला दिवानाच्या सेटवरील एक गोष्ट तो कधीच विसरणार नाही, असे विचारले असता, त्याने म्हटले, 'दिव्याजी आणि राजजी यांच्यासोबत काम करणे तो कधीच विसरू शकत नाही.' किंग खान पुढे अ‍ॅटली कुमारच्या 'जवान' या चित्रपटात दिसणार असून चाहते चित्रपटाच्या टीझर रिलीजची आतुरतेने वाट पाहत आहेत. त्यानंतर शाहरुखला एका चाहत्याने विचारले, 'सर जवान टीझर कधी येणार आहे?' यावर त्याने उत्तर दिले, 'इतर गोष्टी एका जागेवर आणण्यासाठी सर्व काही तयार आहे. काळजी करू नका हे सर्व आनंदाच्या ठिकाणी आहे...#जवान.' त्यानंतर दुसऱ्या चाहत्याने किंग खानला विचारले की तो नकारात्मकतेचा कसा सामना करतो, तेव्हा किंग खानने म्हटले, 'नकारात्मकता आणि सकारात्मकता या दोन सोप्या संज्ञा आहेत. पुढे जा, दोन्हीकडे राहू नका.' किंग खानने एक खुलासा केला की तो मुलांसोबत आपला मोकळा वेळ घालवण्याचा प्रयत्न करतो आणि त्यांच्याबरोबर लुडो खेळतो.

लवकरच किंग खान झळकणार जवान चित्रपटात : सलग चित्रपट फ्लॉप झाल्यानंतर, शाहरुखने आपली ताकद सिद्ध केली आणि पठाणच्या व्यावसायिक यशाने पुन्हा तो शीर्षस्थानी परतला. आता शाहरुखचा जवान चित्रपट नयनतारा आणि विजय सेतुपती यांच्यासोबत येत आहे. तसेच यानंतर तो राजकुमार हिरानीच्या डंकीमध्ये दिसणार आहे ज्यामध्ये तो तापसी पन्नूसोबत रूपेरी पडद्यावर झळकणार आहे.

  • Negativity & Positivity have the simplest two terms to get over. Sorry u didn’t like wot I do…thank u for appreciating wot I do. And then move on don’t dwell on either. https://t.co/AeHHvCIT4B

हेही वाचा :

  1. Sonu Soods Sambhavam : 'संभवम' मार्फत सोनू सूद देणार स्पर्धा परीक्षांसाठी स्कॉलरशिप!
  2. Controvesy On Adipurush: आदिपुरुष चित्रपटाला करणी सेनेचा कडाडून विरोध; निर्माते व दिग्दर्शकाचे पोस्टर जाळले
  3. Adipurush Box Office collection day 9 : आदिपुरुषची बॉक्स ऑफिसवर किती कमाई, जाणून घ्या आकडेवारी

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.