ETV Bharat / entertainment

OMG 2 teaser: ओएमजी २ मध्ये पंकज त्रिपाठीची संकटातून सुटका करण्यासाठी अवतरणार अक्षय कुमार - अक्षय कुमार आणि पंकज त्रिपाठी

अक्षय कुमारचा बहुप्रतीक्षित ओएमजी २ चित्रपटाचा टीझर अखेर रिलीज झाला. आस्तिक असो वा नास्तिक, मनुष्यच इश्वर असल्याचे प्रमाण देत असतो, अशा आशयापासून या टीझरला सुरुवात होते. पंकज त्रिपाठी यात आस्तिक मनुष्याची भूमिका साकारत आहे.

OMG 2 teaser
ओएमजी २
author img

By

Published : Jul 11, 2023, 12:00 PM IST

Updated : Jul 11, 2023, 12:29 PM IST

मुंबई: बहुप्रतीक्षित ओ माय गॉड २ चित्रपटाचा टिझर अखेर रिलीज झाला आहे. अक्षय कुमार आणि पंकज त्रिपाठी यांच्या मुख्य भूमिका असलेला हा चित्रपट ११ ऑगस्ट रोजी रिलीज होणार आहे. ओएमजी या २०११ साली रिलीज झालेल्या चित्रपटाचा हा सीक्वेल आहे.

या चित्रपटात अक्षय कुमार भगवान शिवाच्या रुपात पडद्यावर अवतरणार आहे. अक्षयने चित्रपटाची झलक दाखवणारा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करताना म्हटलं होत की, 'ओएमजी २ चा टीझर ११ जुलै रोजी रिलीज होतोय. त्यानुसार आज हा टीझर प्रेक्षकांच्या भेटीस आला.'

  • " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">

या टीझरची सुरुवात रात्री रोषणाईने सजलेल्या मंदिराच्या शिखरापासून होते. पार्श्वभूमीवर हिंदीमधून व्हाईस ओव्हर सुरू होतो. त्यात म्हटलं जातं की, 'इश्वर है या नही इसकी प्रमाण इन्सान आस्तिक या नास्तिक होकर दे सकता है, पर भगवान अपने बनाये हुए बंधुओ में कभी भेदभाव नही करता. फिर वो नास्तिक कांजीलाल मेहता हो, या आस्तिक कांती शरण मुदगल. और तकलीफ में लगायी हुयी पुकार उसे, हमेशा उसे अपने बंधुओ तक खिंच ही लाती है.'

ओएमजी २ हा चित्रपट अमित राय यांनी दिग्दर्शित केला आहे. पहिल्या भागात परेश रावल यांनी कांजीलाल मेहता ही नास्तिक माणसाची व्यक्तीरेखा साकारली होती. कांजीलालने उपस्थित केलेल्या प्रश्नांनी अनेक मुद्दे उपस्थित केले होते. लोकांनी त्याला भरभरुन प्रतिसाद दिला होता. अखेरीस कांजीलाल इश्वराचे अस्तित्व मान्य करतो, असे दाखवण्यात आले होते. ओएमजीच्या दुसऱ्या भागात पंकज त्रिपाठी आस्तिक दाखवण्यात आलाय. इश्वराची अहोरात्र आराधना करणाऱ्या या आस्तिक व्यक्तीच्या जीवनात संकटाचा डोंगर कोसळतो. आपल्या परीने तो या संकटाचा सामना करण्याचा प्रयत्न करतो. भगवान शिवा त्याच्या मदतीसाठी येतात, असे टीझरमध्ये दिसते. चित्रपटाची कथा रंजक दिसत असून इतर व्यक्तीरेखा अद्याप गुलदस्त्यात आहेत. ओ माय गॉड २ मध्ये अक्षय कुमार, पंकज त्रिपाठी यांच्यासह यामी गौतम आणि अरुण गोविल यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. या चित्रपटाची बॉक्स ऑफिसवर सनी देओलच्या गदर २ चित्रपटाशी टक्कर होणार आहे.

हेही वाचा -

१. Ruslaan Mumtaz gets stuck in Manali : 'तेरे संग अ किडल्‍ट लव्ह स्टोरी' फेम अभिनेता रुस्लान मुमताज मनालीच्या पुरात अडकला...

२. LGM Trailer OUT: कॅप्टन कूल महेंद्र सिंग धोनीच्या 'एलजीएम' या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज...

३. SPKK box office collection day 12 : 'सत्यप्रेम की कथा' हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर करत आहे धमाल...

Last Updated : Jul 11, 2023, 12:29 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.