मुंबई : 'ओएमजी-२' हा चित्रपट सध्या खूप चर्चेत आहे. या चित्रपटात अभिनेता अक्षय कुमार हा भगवान शंकराच्या अवतारात दिसणार आहे. त्यामुळे हा चित्रपट बघण्यासाठी प्रेक्षक फार आतुर आहेत. काही दिवसांपूर्वी 'ओएमजी-२' चित्रपटाचा टीझर रिलीज झाला होता. या चित्रपटाचा टीझर काहीजणाना खूप आवडला तर काहीजणानी हा टीझर खूप खटकला, त्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात या चित्रपटाला विरोध झाला होता. हा चित्रपट ११ ऑगस्ट रोजी प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. मात्र रिलीज होण्याच्या आधी 'ओएमजी-२' चित्रपट वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. चित्रपटातील काही दृष्ये व संवाद याबद्दल प्रेक्षकांनी आक्षेप घेतला आहे. दरम्यान आता 'ओएमजी-२' चित्रपटाचे एक गाणे १८ जुलै २०२३ रोजी प्रदर्शित झाले आहे.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">
गाण्याचे बोल : या गाण्याचे बोल 'ऊॅंची ऊॅंची वादी' आहे. हे गाणे हंसराज रघुवंशी यांनी गायले आहे. या गाण्याला संगीत हंसराज रघुवंशी, राही, डीजेस्ट्रिंग्स यांनी दिले आहे. हे गाणे स्ट्रिंग्स स्टुडिओमध्ये रेकॉर्ड केले गेले आहे. याशिवाय हे गाणे झी म्युझिक कंपनीद्वारे प्रदर्शित करण्यात आले आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन अमित रायने केले आहे. या गाण्यात पंकज त्रिपाठीसह अक्षय कुमार दिसला आहे. याशिवाय या गाण्याच्या शेवटी यामी गौतमीची झलकदेखील दाखविण्यात आली आहे.
वादात अडकाला चित्रपट : मीडिया रिपोर्टनुसार सेन्सॉर बॉर्डाने सर्टिफिकेट देण्याआधी या चित्रपटाचा रिव्ह्यू कमिटीकडे पाठवला आहे. त्यानंतर सेन्सॉर बोर्डानं या चित्रपटातील काही डायलॉग्स आणि सीन्सवर आक्षेप घेतला आहे. त्यामुळे हा चित्रपट पुनर्विचारासाठी समितिकडे पाठविण्यात आला आहे.
चित्रपटाची स्टारकास्ट : 'ओह माय गॉड' या चित्रपटाचा सिक्वेल म्हणजेच 'ओएमजी २' प्रेक्षकांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज झाला आहे. या चित्रपटात अक्षय कुमार व्यतिरिक्त पंकज त्रिपाठी , परेश रावल, यामी गौतम आणि अरुण गोविल हे प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटाकडून अक्षय कुमारला खूप अपेक्षा आहे, कारण यापुर्वी त्याचे अनेक चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप झाले आहेत. या चित्रपटात यामी गौतमची खूप महत्त्वाची भूमिका असणार आहे. ती चित्रपटामध्ये वकील म्हणून दिसणार आहे. मात्र, आतापर्यत टीझरमध्ये यामी दिसलेली नाही. २०१२मध्ये आलेला अक्षय कुमारचा 'ओएमजी' चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरला होता. आता या चित्रपटाकडून देखील प्रेक्षकांच्या भरपूर अपेक्षा आहेत.
हेही वाचा :