मुंबई - OMG 2 and Gadar 2 : अक्षय कुमार 'ओमएजी 2' आणि सनी देओलचा 'गदर 2' हे चित्रपट 11 ऑगस्टला रिलीज झालेल्या दोन बॉलिवूड चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर खळबळ उडवून दिली. 'ओमएजी 2' नं 150 कोटींहून अधिक कमाई केली होती. याशिवाय 'गदर 2' नं 500 कोटींहून अधिक व्यवसाय बॉक्स ऑफिसवर केला होता. आता 'ओमएजी 2' आणि 'गदर 2' हे दोन चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित होण्यासाठी सज्ज आहेत. 'ओमएजी 2' हा चित्रपट 8 ऑक्टोबर रोजी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे. याशिवाय 'गदर 2' हा चित्रपट 6 ऑक्टोबर रोजी ZEE5 वर प्रसारित होणार आहे. 11 ऑगस्ट रोजी, 'ओमएजी 2' आणि गदर 2 बॉक्स ऑफिसवर एकाच वेळी प्रदर्शित झाले होते आणि आता 'ओमएजी 2'आणि 'गदर 2' ओटीटीवर देखील आमनेसामने येत आहेत. याशिवाय या महिन्यात ऑक्टोबरमध्ये काही वेब सीरीज रिलीज होणार आहे.
खूफिया : विशाल भारद्वाजचा 'खूफिया' हा सिनेमा नेटफ्लिक्सवर ५ ऑक्टोबरला प्रदर्शित होणार आहे. यामध्ये तब्बू, अली फजल आणि वामिका गब्बी हे कलाकार मुख्य भूमिकेत आहेत. ही एक मनोरंजक ड्रामा थ्रिलर वेब सीरीज आहे, जी अमर भूषण यांच्या 'एस्केप टू नोव्हेअर' या गुप्तचर कादंबरीवर आधारित आहे.
सुल्तान ऑफ दिल्ली : 'सुलतान ऑफ दिल्ली' ही अॅक्शन-थ्रिलर वेब सीरीज डिस्ने प्लस हॉटस्टारवर 13 ऑक्टोबर रोजी प्रसारित होणार आहे. ही वेब सीरीज 1960 च्या दशकावर आधारित आहे. या वेब सीरीज कहाणी अर्णब रे यांच्या 'सुलतान ऑफ दिल्ली: असेंशन' मधून घेतली आहे. 'सुल्तान ऑफ दिल्ली'वेब सीरीजचे दिग्दर्शन मिलन लुथरिया यांनी केले असून सुपरण वर्मा यांनी लिहिले आहे. या वेब सीरीजत अभिनेता ताहिर राज भसीन, मौनी रॉय, विनय पाठक आणि मेहरीन पिरजादा महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत.
काला पानी : 'जस्सी जैसी कोई नहीं' फेम मोना सिंग स्टारर थ्रिलर 'काला पानी' 18 ऑक्टोबर रोजी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होईल, ही वेब सीरीज अंदमान आणि निकोबार बेटांवर आधारित आहे, या वेब सीरीजमध्ये येथील जीवन एका आजारामुळे धोक्यात येते. या वेब सीरीजमध्ये आशुतोष गोवारीकर देखील दिसणार आहे.
हेही वाचा :
Shahid Kapoor and Kriti Sanon : शाहिद कपूर आणि क्रिती सेनॉन स्टारर चित्रपटाची रिलीज डेट आली समोर...