मुंबई : अक्षय कुमार आणि परेश रावल स्टारर 'ओह माय गॉड'च्या एका दशकानंतर, या सुपरहिट चित्रपटाचा सीक्वल ११ ऑगस्ट रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. थिएटरमध्ये 'ओह माय गॉड २' ची थेट टक्कर सनी देओलच्या 'गदर २'शी झाली होती. मात्र, अक्षय कुमार, यामी गौतम आणि पंकज त्रिपाठी यांच्या दमदार अभिनयाने बनलेल्या 'ओह माय गॉड २'ने बॉक्सवर आपली पकड कायम राखली आहे. यासोबतच चित्रपटाने पहिल्या वीकेंडला तब्बल ४३ कोटींची कमाई केली आहे. दरम्यान आता, चित्रपटाचे चौथ्या दिवशी म्हणजेच सोमवारच्या कमाईचे अंदाजे आकडेही समोर आले आहेत.
'ओह माय गॉड २' : अक्षय कुमारचा 'ओह माय गॉड २' हा चित्रपट या वर्षातील बहुप्रतीक्षित चित्रपटांपैकी एक होता. 'ओह माय गॉड २' चित्रपटला देखील वादाला सामोरी जावे लागले होते. शेवटी या चित्रपटला 'ए' प्रमाणपत्रही देण्यात आले. दरम्यान थिएटरमध्ये प्रदर्शित झाल्यानंतर, प्रेक्षकांनी या चित्रपटाला चांगला प्रतिसाद दिला आणि यासोबत 'ओह माय गॉड २' चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली. या सगळ्या दरम्यान, आता चित्रपटाच्या चौथ्या दिवसाच्या कमाईचे अंदाजे आकडे देखील आले आहेत. रिपोर्टनुसार, या चित्रपटाने १४ ऑगस्ट रोजी ११.५० कोटीची कमाई केली आहे. 'ओह माय गॉड २' चित्रपटाने आतापर्यत एकूण ५४.६१ कोटीचा व्यवसाय बॉक्स ऑफिसवर केला आहे.
'ओह माय गॉड २'मध्ये अक्षय कुमार शिवदूतच्या भूमिकेत : अमित रायच्या दिग्दर्शनाखाली बनलेल्या या चित्रपटात अक्षय कुमार भगवान शिवाच्या दूताच्या अवतारात आहे. यामी गौतम, पंकज त्रिपाठी यांच्यासोबत रामायण फेम अरुण गोविलनेही 'ओह माय गॉड २' मध्ये महत्त्वाची भूमिका साकारली आहे. २०१२मध्ये 'ओह माय गॉड' हा हिट चित्रपट आला होता, या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई केली होती. आता 'ओह माय गॉड २' देखील बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी करत आहे. या चित्रपटाने चांगला सामाजिक संदेश दिला आहे.
हेही वाचा :