ETV Bharat / entertainment

ओम - द बॅटल विदीन ट्रेलर रिलीज, आदित्य रॉय कपूरचा अॅक्शन अवतार - ओम द बॅटल विदीनमध्ये संजना संघी

OM: The Battle Within Trailer OUT: अभिनेता आदित्य रॉय कपूरचा नवीन चित्रपट ओम - द बॅटल विदीन चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे.

ओम - द बॅटल विदीन ट्रेलर रिलीज
ओम - द बॅटल विदीन ट्रेलर रिलीज
author img

By

Published : Jun 10, 2022, 5:25 PM IST

मुंबई - अभिनेता आदित्य रॉय कपूरचा अॅक्शन-पॅक चित्रपट 'ओम-द बॅटल विदीन'चा ट्रेलर 10 जून (शुक्रवार) रोजी रिलीज झाला आहे. 'आशिकी 2' फेम अभिनेता आदित्य रॉय कपूरचा अॅक्शन अवतार ट्रेलरमध्ये पाहायला मिळत आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन कपिल वर्मा यांनी केले असून अहमद खान यांनी याची निर्मिती केली आहे. हा चित्रपट यावर्षी 1 जुलै रोजी थिएटरमध्ये रिलीज होणार आहे.

ट्रेलरमध्ये काय आहे? - आदित्य रॉय कपूर ओमच्या भूमिकेत असून आपल्या वडिलांना देशभक्त असल्याचे सिद्ध करण्यासाठी युद्धाच्या तयारीत असल्याचे ट्रेलरमध्ये दाखवण्यात आले आहे. जॅकी श्रॉफने आदित्य रॉय कपूरच्या वडिलांची भूमिका साकारली आहे.

या चित्रपटात जॅकी श्रॉफ एका अणुशास्त्रज्ञाची भूमिका साकारत आहे, ज्याच्यावर पोखरण चाचणी अयशस्वी झाल्याचा आरोप आहे आणि तो देशद्रोही असल्याचे सिद्ध झाले आहे. त्याचवेळी ओम (आदित्य रॉय कपूर) ला या मिशनसाठी बोलावले जाते. एका अपघातात ओमची स्मृती हरवली जाते आणि तो मिशनसोबत आपल्या वडिलांचा शोध घेऊ लागतो. आठवण निघून गेल्यावरही ओमला वडिलांचा चेहरा आठवतो.

या चित्रपटात संजना संघी मुख्य अभिनेत्रीच्या भूमिकेत आहे. त्याचबरोबर आशुतोष राणा चित्रपटातील इतर कलाकारांमध्येही दिसत आहे आदित्य रॉय कपूर सध्या क्वारंटाईनमध्ये आहे. त्याला नुकतीच कोरोनाची लागण झाली होती.

हेही वाचा - अमिरात पॅलेसमध्ये 'राणी'सारखी वावरली हिना खान पाहा फोटो

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.