मुंबई - बॉलिवूड स्टार अजय देवगणची मुलगी न्यासा देवगन सध्या चर्चेत आहे. गेल्या महिन्यात, प्रसिद्ध गायिका कनिका कपूरच्या लग्नाच्या रिसेप्शनमध्ये न्यासा दिसली होती. त्या प्रसंगी न्यासाने तिच्या तिच्या लूकने चाहत्यांना वेड लावले होते. लग्नाच्या रिसेप्शनमध्ये न्यासा बॉडीकॉन ड्रेसमध्ये अवकरली होती व कोणत्याही अभिनेत्रीपेक्षा कमी दिसत नव्हती. आता न्यासाचा आणखी एक फोटो समोर आला आहे, ज्याची सोशल मीडियावर जोरदार चर्चा आहे. हा फोटो लंडनमधील आहे ज्यात न्यासा एका मुलासोबत झाडाखाली बसलेली दिसत आहे.
न्यासा लंडनमध्ये दानिश गांधी नावाच्या मुलासोबत सुट्टी घालवत आहे. पण त्याआधी न्यासा मुंबईहून आई काजोलसोबत प्रवास करताना दिसली होती.
दानिश गांधी कोण आहे? - सध्या न्यासा लंडनमध्ये उन्हाळ्याच्या सुट्टीचा आनंद घेत आहे. सोशल मीडियावर तिचा एक फोटो समोर आला आहे, ज्यामध्ये ती एका झाडाखाली दानिश गांधींसोबत बसलेली आहे. दानिश गांधी हा दुसरा कोणी नसून न्यासाच्या मामाचा मुलगा आहे. न्यासा चुलत बहिणीसोबत लंडनमध्ये हा फोटो एका उद्यानाचे असून ते एका पिकनिकसाठी इथे आले आहेत.
छायाचित्रात न्यासाने पांढरा टी-शर्ट आणि पँट घातली आहे. यावेळी दानिशने नेव्ही ब्लू टी-शर्ट, राखाडी पँट आणि डार्क सनग्लासेस घातले आहेत. दोघांनी पांढऱ्या रंगाचे स्नीकर्स घातले आहेत. फोटोमध्ये दोघेही हसताना दिसत आहेत.
दोघांच्या आजूबाजूला पाण्याची बाटली, एक जॅकेट आणि न्यासाचा फोन इअरफोन दिसत आहे. तर दुसऱ्या फोटोत सूर्यप्रकाशात हिरवाईने वेढलेल्या एका पाण्याच्या तलावाचा फोटो शेअर केला आहे.
हेही वाचा - अभिनेत्री प्रणिता सुभाषने शेअर केला तिच्या 'गर्भधारणा ते प्रसूती'पर्यंतचा प्रवास, पाहा व्हिडिओ