ETV Bharat / entertainment

Nitin Desai News: कलादिग्दर्शक नितीन देसाई यांचा पोस्टमॉर्टम अहवाल आला समोर, 'या' कारणामुळे झाला मृत्यू - Nitin Desai News

कलादिग्दर्शक नितीन देसाई यांच्या मृतदेहाचा पोस्टमॉर्टम अहवाल समोर आला आहे. त्यात त्यांच्या मृत्यूचे कारण स्पष्ट करण्यात आले आहे. बुधवारी नितीन देसाई यांनी त्यांच्या कर्जत येथील स्टुडिओमध्ये आत्महत्या केली होती. बुधवारी खालापूर पोलिसांनी जेजे रुग्णालयात त्यांचा मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी नेला होता.

कला दिग्दर्शक नितीन देसाई
कला दिग्दर्शक नितीन देसाई
author img

By

Published : Aug 3, 2023, 7:42 AM IST

रायगड: सुप्रसिद्ध कलादिग्दर्शक नितीन देसाई यांच्या आत्महत्येमुळे संपूर्ण सिनेसृष्टीत शोककळा पसरली आहे. नितीन देसाई यांनी आत्महत्या केल्याची बातमी समोर येताच सर्वांनाच धक्का बसला आहे. देसाई यांनी आत्महत्या केली की काही घातपात होता, अशी शंका व्यक्त केली जात आहे. याचदरम्यान देसाई यांचा मृत्यू कशामुळे झाला याचे कारण स्पष्ट झाले आहे. देसाई यांच्या मृतदेहाचा पोस्टमॉर्टम अहवाल आला आहे. या अहवालानुसार नितीन देसाई यांचा मृत्यू हा गळ्याला फास लागून मृत्यू झाला.

तपास सुरू: बुधवारी जेजे रुग्णालयात कला दिग्दर्शक नितीन देसाई यांच्या मृतदेहाचे पोस्टमॉर्टम करण्यात आले. रुग्णालयातील चार डॉक्टरांच्या पथकाने देसाई यांच्या मृतदेहाचे पोस्टमॉर्टम केले. प्राथमिक निष्कर्षानुसार देसाई यांचा मृत्यू गळफास घेतल्यानेच झाला आहे. पोलीस या प्रकरणात पुढील तपास करत असल्याचे रायगड पोलिसांनी सांगितले. रायगडचे पोलीस अधीक्षक घार्गे म्हणाले की, देसाईंच्या आत्महत्येप्रकरणी तपास चालू आहे. घटनेच्या ठिकाणी मोबाईल फोन, इतर सामुग्री तसेच इतर इलेक्ट्रॉनिक उपकरणे जप्त करण्यात आली आहेत. त्यावरून तपास केला जात आहे.

देसाईंच्या कुटुंबीयांनी आम्हाला सांगितले की, एनडी स्टुडिओमध्येच देसाईंच्या पार्थिवावर अंतिमसंस्कार होणार आहेत. त्यांचा मृतदेह जेजे रुग्णालयात पोस्टमॉर्टमसाठी नेण्यात आला होता. -रायगडचे पोलीस अधीक्षक (एसपी) सोमनाथ घार्गे

आर्थिक अडचणीतून आत्महत्या: मुंबईपासून 80 किलोमीटर अंतरावरील कर्जतमध्ये देसाई यांचा स्टुडिओ आहे. याच स्टुडिओमध्ये त्यांनी आत्महत्या केली असल्याची माहिती पोलिसांनी बुधवारी दिली होती. आर्थिक विवंचनेतून देसाई यांनी आत्महत्या केली असल्याचे म्हटले जात आहे. आमदार महेश बालदी हेही या दाव्याशी सहमत आहेत. राज्याचे सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनीही हेच कारण सांगितले आहे. देसाई आर्थिक अडचणीत असल्याचे मंत्री मुनगंटीवार म्हणाले आहेत. मुनगंटीवार म्हणाले की, देसाई हे आर्थिक अडचणीत होते. परंतु त्यांच्यात क्षमता होती. ते त्या आर्थिक अडचणींवर मात करू शकले असते. दरम्यान पोलीस तपासात सत्य समोर येईल.

कामांमुळे झाले होते प्रसिद्ध: देसाई हे त्यांच्या नाविन्यपूर्ण स्टुडिओ डिझाइनसाठी प्रसिद्ध होते. देसाई यांनी आशुतोष गोवारीकर, विधू विनोद चोप्रा, राजकुमार हिरानी आणि संजय लीला भन्साळी यांच्यासोबत काम केले होते. हम दिल दे चुके सनम (2000), लगान (2002), आणि देवदास (2003), जोधा अकबर (2008) आणि प्रेम रतन धन पायो (2015) यांसारख्या चित्रपटांमधील कामामुंळे ते प्रसिद्धीस आले होते. देसाई यांना सर्वोत्कृष्ट कला दिग्दर्शनासाठी तीन फिल्मफेअर पुरस्कार आणि सर्वोत्कृष्ट कला दिग्दर्शनासाठी चार राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाले आहेत.

हेही वाचा-

  1. Nitin Desai Suicide Case : नितीन देसाईंच्या निधनाने कलाविश्वाला धक्का, आशुतोष गोवारीकरांसह दिग्गजांनी वाहिली श्रद्धांजली
  2. Nitin Chandrakant Desai : कलाविश्वातला प्रतिसृष्टीकर्ता 'आधुनिक विश्वामित्र' - नितीन चंद्रकांत देसाई

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.