ETV Bharat / entertainment

Priyanka Chopra and Nick jonas : निक जोनासनं पत्नी प्रियांका चोप्रा आणि मुलगी मालती मेरीसह इंस्टाग्रामवर फोटो केले शेअर... - निक जोनासनं शेअर केले फोटो

Priyanka Chopra and Nick jonas : गायक निक जोनासनं पत्नी प्रियांका चोप्रा आणि मुलगी मालती मेरीसोबतचे काही फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. याशिवाय सध्या काही व्हिडिओ देखील समोर आले आहेत. या व्हिडिओमध्ये मालती ही वडिलाच्या कॉन्सर्टमध्ये एन्जॉय करताना दिसत आहे.

Priyanka Chopra and Nick jonas
प्रियांका चोप्रा आणि निक जोनास
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 15, 2023, 3:39 PM IST

मुंबई - Priyanka Chopra and Nick jonas : प्रियांका चोप्रा ही नेहमीच मुलगी मालती मेरीसोबतचे सुंदर फोटो शेअर करत असते. सोशल मीडियावरील तिच्या फोटोवर अनेकजण कमेंट करून मालतीचे कौतुक करत असतात. दरम्यान आता प्रियांकाच्या मुलीचे काही व्हिडिओ आणि फोटो समोर आले आहेत. हे व्हिडिओ चाहत्यांना खूप आवडत आहेत. व्हिडिओमध्ये प्रियांका चोप्रा पती निक जोनासच्या कॉन्सर्टमध्ये आहेत. या फोटोमध्ये तिच्यासोबत मुलगी मालती मेरी देखील दिसत आहे. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये मालती प्रेक्षकांकडे पाहून हात हलविताना दिसत आहे. त्यानंतर हा कॉन्सर्ट सुरूअसताना मालती तिच्या आईच्या मांडीवर बसलेली आहे. या कॉन्सर्टचा आनंद प्रियांका आणि मालती या मायलेकी घेत आहेत.

पापा निकसाठी मालती बनली चीअरलीडर! : दुसर्‍या एका व्हिडिओमध्ये, प्रियांका चोप्रानं मालतीसह कॉन्सर्टमध्ये निकला चीअर अप केले आहे. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये मालती तिच्या वडिलांसाठी टाळ्या वाजवताना आणि स्टेजवर त्याच्या मागे जाण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. निक जोनास जेव्हा तिच्या जवळ येतो तेव्हा ती स्टेजवर त्याच्या मागे जाते. त्यानंतर निक तिच्या कपाळाची किस घेतो आणि प्रियांका ही तिला आपल्या मिठीत घेते. कॉन्सर्टनंतर निक जोनासनं त्याच्या इंस्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत. हे फोटो शेअर करताना त्यानं कॅप्शनमध्ये लिहिलं, 'तुमच्या कुटुंबाला कामाच्या दिवशी आणा'. यानंतर त्यानं हार्ट इमोजी पोस्ट केला आहे. निकनं शेअर केलेल्या पहिल्या फोटोत तो मालतीला कडेवर घेऊन तिच्यावर प्रेमाचा वर्षाव करत आहे. त्यानंतर दुसऱ्या फोटोमध्ये निक हा आपल्या पत्नी आणि मुलीसह दिसत आहे. तिसऱ्या फोटोमध्ये निक हा स्टेजवर परफॉर्म करताना दिसत आहे.

चाहत्यांनी केल्या कमेंट : इंस्टाग्रामवर चाहत्यांनी मालतीच्या फोटोंवर प्रेमळ प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका यूजरनं पोस्टवर कमेंट करत लिहले, 'मालती खूप क्यूट आहे'. दुसऱ्या एकानं पोस्टवर कमेंट करत लिहलं, 'किती छान आहे हे कुटुंब' आणखी एकानं या पोस्टवर कमेंट करत लिहले, 'मला ही जोडी खूप आवडते खूप छान' अशा अनेक कमेंट या व्हिडिओवर येत आहेत. याशिवाय काहीजण या पोस्टवर हार्ट आणि फायर इमोजी पोस्ट करत आहेत. दरम्यान प्रियांका चोप्राच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचं झालं तर ती आता जॉन सीना आणि इद्रिस एल्बा यांच्यासोबत 'हेड्स ऑफ स्टेट' या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन इल्या नैशुलर करत आहे.

हेही वाचा :

  1. Singham Again: दीपिका पदुकोणनं 'सिंघम अगेन'मधील शेअर केला लेडी सिंघमचा लूक, रणवीर सिंगनं 'ही' दिली प्रतिक्रिया
  2. Ind vs pak 2023 : भारतीय क्रिकेट संघाच्या शानदार विजयानंतर सेलिब्रिटींनी केला अभिनंदनाचा वर्षाव; पहा कोण काय म्हणाले...
  3. Khatron Ke Khiladi 13: रॅपर आणि गायक डिनो जेम्सनं अर्जित तनेजाला केले पराभूत; खतरों के खिलाडी 13' सीझनचा ठरला विजेता

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.