मुंबई - अभिनेत्री प्रियांका चोप्रा आणि गायक निक जोनासने 2018मध्ये भारतीय पद्धतीने लग्न केले होते. त्यानंतर निक हा भारताचा जावाई झाला. तसेच निक हा लग्नानंतर भारतात फार प्रसिद्ध झाला. आता निकचेही भारतात अनेक चाहते झाले. निकला अनेकदा सोशल मीडियावर चाहते 'निक जिजू' म्हणत दिसतात. मुंबईमध्ये देसी पापाराझीने देखील त्याला 'जीजू' म्हणून संबोधले होते. अलीकडे, एका चॅट शोमध्ये, जेव्हा होस्टने निकला विचारले की, तो ही त्याला 'जीजू' म्हणू शकतो का, 'भावोजी' साठी प्रेमाची काही परिभाषा आहे, तेव्हा निक हसला आणि यावर तो म्हणाला, 'बरेच लोक भारतात त्याला जीजू म्हणतात. ' तो पुढे म्हणाला की त्याच्या नुकत्याच झालेल्या भारत भेटीवर, जिथे तो नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटरच्या भव्य लाँच कार्यक्रमात पत्नी प्रियंका चोप्रासोबत गेला होता, तेव्हा त्याला रेड कार्पेटवर सर्व पापाराझी 'जीजू' म्हणत होते.
पापाराझी नकीला म्हटले जीजू : त्यानंतर, तिथेल होस्टने त्याला रेड कार्पेटवरील एक वेगळा व्हिडिओ ऐकायला, त्यानंतर पापाराझींपैकी एकाने त्याला 'ए निकुआ' असे म्हटले होते. त्यावर, निक म्हणाला, 'होय, मी ते ऐकले', आणि पुढे म्हणाला, 'मला परत जाणे खूप छान वाटते. मला भारतावर प्रेम आहे. कोविडमुळे मला तिथे जाऊन काही वर्षे झाली आहेत, खरोखर ही एक मजेदार ट्रिप आहे. मला आता अनेक टोपणनावे ऐकून आनंद होतो. असे त्याने सांगितले
निकला आवडले भारतीय व्यंजन : भारतीय व्यंजन गुलाब जामुन आणि स्प्रिंग रोल्सऐवजी जलेबी आणि समोसे मला खायला आवडते. त्याला भारतीय जेवन खावून आनंद झाला. असे त्याने यावेळी सांगितले. त्याने पुढे सांगितले प्रियांकाशी लग्न होऊन पाच वर्षे झाली. मात्र असूनही, तिचे मित्र आणि कुटुंबातील सदस्य मी जेवणात कितीपर्यत मसालेदार खावू शकतो हे नेहमी बघतात. तसेच, तो म्हणाला की लोणचे त्याच्यासाठी खूप गरम आहे, म्हणून त्याला खाने टाळतो. सध्याला निक जोनास ब्रदर्ससह त्याच्या आगामी अल्बमचे प्रमोशन करत आहे. तसेच प्रियांकाचा हॉलिवूड चित्रपट ‘लव्ह अगेन’मध्ये निकने छोटीशी भूमिका साकारली आहे
हेही वाचा : Mrunal Thakur at Cannes 2023 : मृणाल ठाकूरने कान्स 2023 मध्ये सीक्विन साडीमध्ये केले पदार्पण.