ETV Bharat / entertainment

Happy Birthday Parineeti Chopra: प्रियांका चोप्रासह चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकांरानी परिणीतीला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा... - Parineeti chopra

Happy Birthday Parineeti Chopra: परिणीती चोप्राचा आज 22 ऑक्टोबर रोजी आपला वाढदिवस साजरा करत आहे. परिणीतीच्या वाढदिवशी तिची चुलत बहीण प्रियांका चोप्रानं तिला शुभेच्छा दिल्या आहेत. याशिवाय चित्रपटसृष्टीतील अनेकजणांनी तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला आहे.

Happy Birthday Parineeti Chopra
परिणीती चोप्राचा वाढदिवस
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 22, 2023, 1:09 PM IST

मुंबई - Happy Birthday Parineeti Chopra: बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा ही नेहमीच चर्चेत असते. दरम्यान आज ती आज, 22 ऑक्टोबर रोजी आपला 35 वा वाढदिवस साजरा करत आहे. या खास प्रसंगी अनेकजण तिला अनेकजण वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहेत. आता 'देसी गर्ल' प्रियांका चोप्रानं इंस्टाग्रामवर परिणीतीचे काही खास फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये परी आणि प्रियांका खूप खास दिसत आहेत. पोस्टला कॅप्शन देत प्रियांकानं लिहलं, वाढदिवसाच्या शुभेच्छा! मला आशा आहे की तू नेहमी आनंदी राहशील. याशिवाय परिणीतीला इंडस्ट्रीतील अनेक सेलिब्रिटींनी वाढदिवसाच्या खास प्रसंगी शुभेच्छा दिल्या आहेत.

परिणीती चोप्राला अनेक मुले दत्तक घ्यायची आहेत : परिणीती चोप्राची एक इच्छा आहे की तिला अनेक मुले दत्तक घ्यायची आहेत. एका मुलाखतीत तिनं याबाबत खुलासा केला होता. एका झालेल्या संवादात परिणीतीनं ही इच्छा व्यक्त केली होती. या मुलाखतीत तिला दत्तक मुल घेण्याबाबत विचारण्यात आले, ज्याच्या उत्तरात तिनं म्हटलं, 'मला एक मूल दत्तक घ्यायचे आहे. मला बरीच मुले हवी आहेत, आता मी गरोदर राहू शकत नाही. म्हणून मी काही मुलं दत्तक घेईन. असं तिनं यावेळी सांगितलं होतं. याशिवाय तिला पती कसा हवा आहे याबद्दलदेखील तिनं खुलासा केला होता. परीनं स्वबळावर इंडस्ट्रीत मोठे स्थान मिळवले आहे. अनेक चित्रपटांमध्ये तिनं जबरदस्त अभिनय केला आहे.

परिणीतीने आप खासदार राघव चड्डासोबत लग्न केले : परिणीती चोप्राननं 24 सप्टेंबरला आपचे खासदार राघव चड्ढा यांच्यासोबत लग्न केले. बराच काळ एकमेकांना डेट केल्यानंतर दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. परिणीतीच्या लग्नात ग्लोबल स्टार प्रियांका चोप्रा काही कारणास्तव या लग्नाला उपस्थित राहू शकली नाही. परिणीती आणि राघव चड्ढा यांचे भव्य लग्न उदयपूरच्या लीला पॅलेस हॉटेलमध्ये पार पडले. यात त्यांचे कुटुंबीय आणि मित्रपरिवार उपस्थितीत होता. परिणितीच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचं झालं तर, ती अक्षय कुमारसोबत 'मिशन राणीगंज' या चित्रपटात दिसली आहे. हा चित्रपट 6 ऑक्टोबर रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. याशिवाय ती 'अ‍ॅनिमल' चित्रपटामध्ये दिसणार आहे

हेही वाचा :

  1. Mandali Censor Board : ट्रेलर मंजूर करण्याकडे दुर्लक्ष केल्याबद्दल 'मंडली' निर्मात्यांकडून सेन्सॉर बोर्डावर टीका
  2. Bigg Boss 17 : 'बिग बॉस 17'मध्ये सलमान खानसोबत दिसणार टायगर श्रॉफ आणि क्रिती सेनॉन..
  3. Tiger 3 New Song : 'लेके प्रभु का नाम' गाण्यातील कतरिनाच्या लूकवर सलमान खान फिदा...

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.