ETV Bharat / entertainment

Ranbir Kapoor birthday : नीतू सिंग आणि रिद्धिमा साहनीने 'राहाचे पापा' रणबीर कपूरला दिल्या 'वाढदिवसाच्या शुभेच्छा' - पाहा फोटो - हॅपी बर्थडे राहा पप्पा

Ranbir Kapoor birthday : अभिनेता रणबीर कपूर आज त्याचा 41 वा वाढदिवस साजरा केला. यानिमित्तानं मध्यरात्री केके कापण्यात आला व त्याच्या बर्थडेचं सेलेब्रिशनही करण्यात आला. त्याची आई नीतू सिंग आणि त्यांची बहीण रिद्धिमा साहनी यांनी इंस्टाग्रामवर त्याच्यासाठी खास शुभेच्छा दिल्या आहेत.

Ranbir Kapoor birthday
रणबीर कपूरला वाढदिवसाच्या शुभेच्छा
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 28, 2023, 12:00 PM IST

मुंबई - Ranbir Kapoor birthday : बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर आज आपला वाढदिवस साजरा करत आहे. या खास दिवसानिमित्त रणबीरची आई ज्येष्ठ अभिनेत्री नीतू सिंग आणि त्याची बहीण फॅशन डिझायनर रिद्धिमा साहनी यांनी त्यांच्या सोशल मीडिया हँडलवर वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. नीतू सिंगने रणबीरचे यापूर्वी कधीही न प्रसिद्ध झालेले काही फोटो शेअर केले आहेत. तर रिद्धिमाने रणबीरसोबतचा एक थ्रोबॅक फोटो असलेला सुंदर व्हिडिओ शेअर केला आणि त्यांनी केक कापतानाच्या सेलिब्रेशनचे फोटोही शेअर केले.

Ranbir Kapoor birthday
रणबीर कपूरला आईकडून वाढदिवसाच्या शुभेच्छा

इंस्टाग्राम स्टोरीमध्ये, नीतू सिंगने रणबीर कपूरच्या मध्यरात्रीच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनची झलक शेअर केली. फोटोमध्ये लाल गुलाबांच्या पाकळ्या आणि वाढदिवसाचे दोन केक असलेले सुंदर सजवलेले टेबल दिसत आहेत. एका केकवर ‘हॅपी बर्थडे राहा पप्पा’ असे लिहिलंय. टेबलवर रणबीरच्या लग्नाची एक सुंदर छोटी फोटो फ्रेम देखील दिसत आहे.

फोटो शेअर करताना नीतूने लिहिले की, माझ्या सर्वात खास व्यक्तीसोबत वाढदिवसाचं सेलिब्रेशन. तिने दुसऱ्या इन्स्टाग्राम स्टोरीवर रणबीरचा आणखी एकफोटो शेअर केला आणि त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. तिने लिहिले, 'वाढदिवसाच्या शुभेच्छा या खास माणसाबद्दल कृतज्ञ आहे.'

Ranbir Kapoor birthday
रणबीर कपूरला बहिण रिद्धिमाकडून वाढदिवसाच्या शुभेच्छा

दरम्यान, रणबीरची बहीण रिद्धिमाने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर यापूर्वी न पाहिलेल्या दृश्यांसह एक व्हिडिओ टाकला. यातील काही दृष्ये त्यांच्या सुरुवातीच्या दिवसातील आणि काही रणबीर आणि आलियाच्या लग्नातील आहेत. व्हिडिओ टाकत रिद्धिमाने लिहिले, 'वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा रॅन्स! तुझ्या आयुष्यातील हा खास दिवस सुंदर, प्रेम, हशा आणि आनंदाने भरलेला जावो. मी तुला कायम त्रास देण्याचे वचन देते. '

कामाच्या आघाडीवर रणबीर कपूर आगामी क्राईम ड्रामा अ‍ॅनिमल या चित्रपटामध्ये दिसणार आहे. या चित्रपटाचा टीझर आज त्याच्या वाढदिवसानिमित्त रिलीज करण्यात आलाय. यात त्याचा अँग्री लूक त्याच्या चाहत्यांच्या पसंतीस उतरला आहे. संदीप रेड्डी वंगा दिग्दर्शित, या चित्रपटात अनिल कपूर, बॉबी देओल, तृप्ती डिमरी आणि रश्मिका मंदान्ना देखील आहेत. या चित्रपटाच्या रिलीजची प्रतीक्षा चाहते करत आहेत.

हेही वाचा -

1 Buy One Get One Free Ticket For Jawan: ब्लॉकबस्टर चित्रपट 'जवान'च्या निर्मात्यांनी दिली तिकिटांवर ऑफर...

2. Lata Mangeshkar Birth Anniversary: लता मंगेशकर या सात शब्दातच सामावली होती संगीताची जादू

3. Prabhas Wax Statue Removed : बाहुबली फेम प्रभासचा पुतळा हटवणार, म्हैसूर संग्रहालयाने का घेतला निर्णय?

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.