ETV Bharat / entertainment

Nayanthara slays in poster from Jawan : 'जवान'च्या पोस्टरमध्ये चमकत आहे नयनतारा, किंग खान म्हणतो, 'वादळापूर्वीची गर्जना'...

author img

By

Published : Jul 17, 2023, 3:50 PM IST

शाहरुख खानने सोशल मीडियावर 'जवान' चित्रपटामधील एक पोस्टर शेअर केले आहे. पोस्टरमध्ये नयनतारा डॅशिंग लूकमध्ये दिसत असून चित्रपटामध्ये ती पोलिस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणार आहे.

Nayanthara
नयनतारा

मुंबई : शाहरुख खानच्या 'जवान' या चित्रपटाची वाट चाहते आतुरतेने पाहत आहेत. चार वर्षांनंतर किंग खान मोठ्या पडद्यावर परतला आहे. 'पठाण' चित्रपटाला मिळालेल्या जबरदस्त यशानंतर आता प्रेक्षक त्याला 'जवान'मध्ये अ‍ॅक्शन करताना पाहण्यासाठी खूप आतुर आहेत. यापूर्वी 'जवान' चित्रपटाचा प्रीव्हयू रिलीज झाला होता. या चित्रपटाच्या प्रीव्हयूला खूप प्रेक्षकांनी पसंत केले होते. प्रीव्हयूमध्ये सर्वांनी शाहरुखला पूर्णपणे वेगळ्या अंदाजात पाहिले होते. दरम्यान चित्रपटात त्याच्यासोबत साऊथची सुपरस्टार नयनताराही दिसणार आहे. सोमवारी शाहरुखने इंस्टाग्रामवर 'जवान' चित्रपटामधील नयनताराचे अत्यंत स्टायलिश पोस्टर शेअर केले. पोस्टरमध्ये नयनतारा ही अ‍ॅक्शन लूकमध्ये दिसत आहे.

डॅशिंग लूक : पोस्टरमधील अ‍ॅक्शन लूकमध्ये नयनतारा कॉपच्या गणवेशात हातात एक बंदूक पकडून आहे. नयनताराचे पोस्टर शेअर करताना शाहरुखने लिहिले, 'ती वादळापूर्वीची गर्जना आहे!' आताच पाहा तिचा लूक! 'जवान' (#Jaawan) ७ सप्टेंबर २०२३ रोजी जगभरात हिंदी, तमिळ आणि तेलगूमध्ये रिलीज होत आहे.,' असे त्याने त्याच्या चाहत्यांना सांगितले. या पोस्टरमध्ये नयनतारा ही खूपच डॅशिंग दिसत आहे. 'जवान' चित्रपटात ती पोलिस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन अ‍ॅटली कुमार यांनी केले आहे. तसेच चित्रपटामध्ये दीपिका पदुकोणही खास भूमिकेत दिसणार आहे.

शाहरुखचे स्टंट : दरम्यान चित्रपटात शाहरुख व्यतिरिक्त प्रियामणी, संजिता भट्टाचार्य, गिरिजा ओक, सान्या मल्होत्रा, लहर खान, रिद्धी डोग्रा आणि आलिया कुरेशी या सुद्धा असणार आहेत. 'जवान' चित्रपट ७ सप्टेंबरला हिंदी, तमिळ आणि तेलगूमध्ये जगभरात प्रदर्शित होणार आहे. यापूर्वी या चित्रपटाचे प्रीमियर होणार आहे. हा चित्रपट खूप मनोरंजक असणार हे या चित्रपटाच्या प्रीव्हयूवरून समजत आहे. चित्रपटामध्ये शाहरुख वेगवेगळे लूक दाखविले गेले आहेत. चित्रपटामध्ये शाहरुखचे वेगवेगळे स्टंट प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत, त्यामुळे प्रेक्षकांसाठी ही एक मेजवाणीच असणार आहे. यापूर्वी अशा अवतारात शाहरुखला रूपेरी पडद्यावर पाहिले गेले नव्हते, त्यामुळे या चित्रपटाच्या प्रदर्शनासाठी प्रेक्षक फार उत्सुक दिसत आहेत.

हेही वाचा :

  1. Ileana D'Cruz : इलियाना डिक्रूझने 'डेट नाईट' फोटोसह तिच्या मिस्ट्री मॅनचा चेहरा चाहत्यांसमोर आणला....
  2. Merry Christmas V/s Yodha : कतरिना कैफच्या 'मेरी ख्रिसमस'चा सिद्धार्थ मल्होत्रा स्टारर 'योद्धा'शी सामना अटळ
  3. Mission Impossible 7 box office collection: 'मिशन इम्पॉसिबल ७' या चित्रपटाने ५व्या दिवशी केली धमाकेदार कमाई....

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.