मुंबई - Navya Nanda and Agastya Nanda: दिग्गज अभिनेता अमिताभ बच्चन यांचा नातू अगस्त्य नंदानं हिंदी चित्रपटसृष्टीत पदापर्ण 'द आर्चिज' या चित्रपटातून केलं आहे. आज रात्री मुंबईत या चित्रपटाचे स्पेशल स्क्रिनिंग होणार आहे. अगस्त्यचा हा चित्रपट पाहण्यासाठी अनेकजण खूप उत्सुक आहेत. याशिवाय सध्या अगस्त्यसाठी संपूर्ण बच्चन कुटुंब खूप आनंदी आहे. दरम्यान, अमिताभ बच्चन यांची नात आणि अगस्त्याची बहीण नव्या नवेली नंदानं तिच्या इंस्टाग्राम स्टोरीजवर काही लहानपणीचे सुंदर फोटो शेअर केले आहेत, ज्यात तिचा धाकटा भाऊ आहे. या फोटोंवर तिनं सुंदर कॅप्शन दिलं आहे.

नव्या नंदानं केला भावावर केला प्रेमाचा वर्षाव : नव्या नंदानं तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर भाऊ अगस्त्यसोबतचे बालपणीचे फोटो शेअर करत लिहिलं, 'उद्या आर्चीचा मोठा दिवस आहे' पहिल्या फोटोत नव्या ही अगस्त्यसोबत कॅमेऱ्यासमोर पोझ देताना दिसत आहेत. दुसऱ्या फोटोत अगस्त्य आपल्या बहिणीला मिठी मारत किस घेताना दिसत आहे. याशिवाय तिसऱ्या फोटोत नव्या ही आपल्या भावाला किस करताना दिसत आहे. अगस्त्य नंदाच्या डेब्यू रिलीजपूर्वी, नव्या नंदा तिच्या भावाला प्रोत्साहन देत आहे. अलीकडेच श्वेता बच्चनच्या मुलीनं म्हणजेच नव्या नवेलीनं आणखी एक थ्रोबॅक व्हिडिओ शेअर केले होता. या व्हिडिओद्वारे तिनं अगस्त्य 'रॉक अँड रोल'साठी कसा तयार होतो हे सांगितलं होतं. व्हिडीओमध्ये अगस्त्य हा गिटार वाजवताना दिसत होता.

अगस्त्य नंदा यांचा पहिला चित्रपट कधी प्रदर्शित होईल : अगस्त्य नंदा 'द आर्चीज'मधून आपल्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात करण्यासाठी सज्ज झाला आहे. या चित्रपटामध्ये अगस्त्यच नाही तर, शाहरुख खानची मुलगी सुहाना खान आणि दिवंगत अभिनेत्री श्रीदेवीची धाकटी मुलगी खुशी कपूरही झोया अख्तरच्या या चित्रपटामधून हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण करत आहेत. या चित्रपटात मिहिर आहुजा, वेदांग रैना आणि युवराज मेंडा यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. लोकप्रिय कॉमिक्सचे भारतीय रूपांतर 'द आर्चीज' 7 डिसेंबर रोजी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे.

हेही वाचा :