ETV Bharat / entertainment

National Film Awards 2023: राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारात कंगना रणौतची होणार आलिया भट्टसोबत टक्कर...

६९व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा थोड्याच वेळात होणार आहेत. या पुरस्कारात कंगना रणौत ते आलिया भट्टसह अनेक स्टार्स या शर्यतीत आहेत.

National Film Awards 2023
राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार २०२३
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Aug 24, 2023, 5:00 PM IST

मुंबई : राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार हा भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वात प्रतिष्ठित आणि सर्वात मोठा पुरस्कार आहे. ६९व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार विजेत्यांची नावे आज संध्याकाळी नवी दिल्ली येथे आयोजित पत्रकार परिषदेत जाहीर केली जाणार आहेत. यावेळी नॅशनल अवॉर्डमध्ये साऊथ सिनेमांचा दबदबा पाहायला मिळणार आहे. कंगना रणौत, आलिया भट्ट आणि जोजू जॉर्ज हे देखील राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराच्या शर्यतीत आहेत. कोरोनामुळे २०२१ मधील अवार्ड हे २०२३ मध्ये देण्यात येणार असून यामध्ये २०२१ मधील प्रदर्शित झालेले चित्रपट नॉमिनेट झाले आहेत. विजेत्यांची नावे आज सायंकाळी ५ वाजता जाहीर केली जाणार आहेत. राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार कधी आणि कुठे पाहता येईल याविषयी जाणून घेऊया....

शर्यतीत मल्याळम चित्रपट : यावेळी राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये साऊथचे चित्रपट पाहायला मिळणार आहेत. रिपोर्ट्सनुसार, रामचरण, ज्युनियर एनटीआरसारखे अनेक मोठे साऊथ स्टार्स बेस्ट अ‍ॅक्टरच्या शर्यतीत पुढे आहेत. त्याचबरोबर मल्याळम चित्रपट 'नायट्टू' अभिनेता जोजू जॉर्ज सर्वोत्कृष्ट अभिनेत्याच्या पुरस्काराच्या शर्यतीत आघाडीवर आहे.

हिंदी चित्रपट : हिंदी चित्रपटांबद्दल बोलायचे तर आर माधवन दिग्दर्शित 'रॉकेटरी: द नंबी इफेक्ट'लाही अनेक श्रेणींमध्ये पुरस्कार मिळू शकतात. त्याचबरोबर माधवनही सर्वोत्कृष्ट अभिनेत्याच्या पुरस्काराच्या शर्यतीत आहे. तर आणखी एक साऊथ चित्रपट 'मिनल मुरली' देखील अनेक श्रेणींमध्ये आपले स्थान निर्माण करण्यात यशस्वी झाला आहे.

कोण बनेल सर्वोत्कृष्ट अभिनेत्री : हिंदी चित्रपटसृष्टीतील दोन अभिनेत्रींची नावे सर्वोत्कृष्ट अभिनेत्रींच्या शर्यतीत आहेत. यामध्ये 'गंगूबाई काठियावाड'मधील आलिया भट्ट आणि 'थलाईवी'साठी कंगना राणौतचे नाव पुढे आले आहे. संगीतकार एमएम कीरवाणीचा ऑस्कर विजेत्या चित्रपट 'आरआरआर'ची निर्मितीसाठी सर्वोत्कृष्ट संगीत दिग्दर्शनाचा पुरस्कार जिंकण्याच्या दावेदारीत आहे.

सेलिब्रिटीजचे डान्स : विक्की कौशलपासून टायगर श्रॉफ, जान्हवी कपूर आणि गोविंदापर्यंत, अनेक सेलिब्रिटीज त्यांच्या डान्स नंबरसह फिल्मफेअरच्या मंचावर आपला जादू दाखविणार आहेत. चाहतेही या अवॉर्ड फंक्शनची आतुरतेने वाट पाहत आहेत. आता आलियाच्या नॉमिनेशनमुळे तिच्या चाहत्यांना देखील आनंद झाला आहे. आलिया नुकतीच करण जोहरच्या 'रॉकी और रानी की प्रेम कहानी'मध्ये दिसली होती.

  • लाईव्ह कधी आणि कुठे पाहायचे? : आज संध्याकाळी ५ वाजल्यापासून पीआयबीच्या फेसबुक पेज आणि यूट्यूब चॅनलवर ६९व्या फिल्म अवॉर्ड्स लाईव्ह पाहू शकता. तसेच PIB's Xच्या अधिकृत साइटवर देखील या अवॉर्ड्सचे प्रसारण होणार आहे.

हेही वाचा :

  1. Jawan Movie : अरविंद केजरीवाल यांनी केली ३ दिवसांची सुट्टी जाहीर; शाहरुख खानच्या चाहत्यांना बसला मोठा धक्का...
  2. Seema Deo Death : 'या' प्रसिद्धी व्यक्तींनी वाहिली सीमा देव यांना श्रद्धांजली...
  3. Jailer movie box office collection day 14 : सुपरस्टार रजनीकांतचा 'जेलर' चित्रपट देशांतर्गत लवकरच पार करेल ३०० कोटीचा आकडा...

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.