ETV Bharat / entertainment

National Award winner Ritika Singh : रितिका सिंहच्या फर्स्ट लुकनंतर इनकारचा ट्रेलर प्रदर्शित

रितिका सिंहच्या इनकारचा फर्स्ट लुक १६ फेब्रुवारी २०२३ रोजी रिलीज झाला आणि १७ फेब्रुवारी २०२३ रोजी निर्मात्यांनी चित्रपटाचा अत्यंत वेधक आणि विचार करायला लावणारा ट्रेलर प्रदर्शित केला.

National Award winner Ritika Singh
इनकारचा विचार करायला लावणारा ट्रेलर प्रदर्शित
author img

By

Published : Mar 1, 2023, 10:57 AM IST

मुंबई : तमिळ स्पोर्ट्स ड्रामा 'इरुधी सूत्रू' मधील अभिनयासाठी राष्ट्रीय पुरस्कार मिळवणारी अभिनेत्री रितिका सिंह 'इनकार' मधून पुन्हा एकदा तिच्या अभिनयाच्या प्रेमात पडण्यासाठी सज्ज झाली आहे. हर्षवर्धन दिग्दर्शित 'इनकार' मध्ये अपहरण झालेल्या मुलीचा जगण्याचा प्रवास दाखवण्यात आला आहे. रितिका सिंह यांनी ही भूमिका केली आहे. हा चित्रपट संपूर्णपणे हरियाणा राज्यात चालत्या कारमध्ये चित्रित करण्यात आला आहे.

आयुष्य बदलणारा चित्रपट : रितिकाने सांगितले की, 'इनकार' हा तिच्यासाठी 'जीवन बदलणारा' चित्रपट आहे. 'इनकार हा माझ्या कारकिर्दीतील सर्वात महत्त्वाचा चित्रपट आहे. मी म्हणेन की तो चित्रपट माझ्यासाठी आयुष्य बदलणारा ठरला आहे. एक स्त्री म्हणून, मी अपहरण झालेल्या मुलीच्या भूमिकेतून खूप काही शिकले. हे अत्यंत आव्हानात्मक काम होते, असे तिने शेअर केले.

समान लूक राखणे महत्त्वाचे : चित्रपटाच्या शूटिंगसाठी रितिकाला 16 दिवस केस धुण्याची परवानगी नव्हती. याबद्दल खुलासा करताना, रितिका आधी म्हणाली, हर्षवर्धन सर आणि मी आमच्या शूटच्या काही भागांमध्ये माझे केस धुण्याचा निर्णय घेतला नाही, कारण मला ते खूप विस्कळीत दिसायचे होते आणि या चित्रपटातील सातत्य अत्यंत महत्वाचे होते. कारण संपूर्ण चित्रपट ही एका दिवसाची कथा आहे. खरे तर, ही २ तासांची कथा आहे जी रीअल-टाइममध्ये उलघडते, त्यामुळे केस, मेकअप आणि कपड्यांनुसार समान लूक राखणे महत्त्वाचे होते. त्यामुळे आम्ही शूट पूर्ण केल्यानंतर, माझे केस इतके घाणेरडे आणि इतके गुंफलेले होते की ते धुण्यासाठी मला हेअर सलूनमध्ये जावे लागले.

गुन्हेगाराची मानसिकता दर्शवणारा चित्रपट : हर्ष वर्धननेही या चित्रपटाबद्दल तपशील शेअर केला. हर्षवर्धनने सांगितले की, हा चित्रपट गुन्हेगाराची मानसिकता दाखवतो आणि प्रत्यक्षात त्याला गुन्हा करण्यास कशामुळे भाग पाडले जाते हे देखिल दाखवतो.. पीडितेच्या कथेशिवाय, 'इनकार' गुन्हेगाराची मानसिकता देखील दर्शवते. हा एक आवश्‍यक चित्रपट आहे, ती म्हणाली. इनबॉक्स पिक्चर्स प्रस्तुत, अंजुम कुरेशी आणि साजिद कुरेशी निर्मित, हा चित्रपट 3 मार्च 2023 रोजी हिंदी, तेलगू, तामिळ, कन्नड आणि मल्याळम भाषेत चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.

तणावपूर्ण अपहरणाची कथा : या चित्रपटाबद्दल बोलताना रितिका सिंह म्हणाली, इनकार हा एक अनुभव आहे जो या देशातील अनेक महिलांनी अनुभवला आहे. शब्दांचा छळ, विनोद, लालसा आणि कायद्याची सर्रास अवहेलना केली जाते. काही पुरुष इतर स्त्रियांना कसे त्रास घेतात पण त्यांच्या माता-भगिनींच्या इज्जतीचे रक्षण करतात हे या कथेत दाखवले आहे. ही एक मानवी कथा आहे. जिच्याशी सर्व वयोगटातील प्रेक्षक संबंधित असतील. याला जोडून दिग्दर्शक हर्षवर्धन म्हणाले, इनकारही एक वास्तववादी, कठोर आणि तणावपूर्ण अपहरणाची कथा आहे. जी एका वेगवान कारमध्ये घडते. हे एका मुलीचा मानसिक आघात दर्शवते जी अचानक जीवन-मरणाच्या परिस्थितीत सापडते.

हेही वाचा : colorful Saatarcha Salman : सातारचा सलमानमधील गाण्यासाठी गावातील घरे झाली रंगीबेरंगी!

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.