ETV Bharat / entertainment

ओटीटीवर प्रदर्शित झालेले रिअल लाईफ स्टोरीजवर आधारित 2023मधील चित्रपट - रिअल लाईफ स्टोरीज

Year Ender 2023 : हिंदी चित्रपटसृष्टीसाठी 2023 वर्षात हे खूप चांगलं होतं. या चालू वर्षात अनेक वेब सीरीज आणि चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित झाल्या आहेत, ज्या सत्य घटनेवर आधारित आहेत.

Real Life Stories 2023
अल लाईफ स्टोरीज 2023
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 28, 2023, 12:59 PM IST

मुंबई - Year Ender 2023 : हिंदी चित्रपटसृष्टीसाठी 2023 वर्ष उत्तम वर्ष ठरले. 2023 वर्षात अनेक चित्रपट आणि वेब सीरीज ओटीटीवर प्रदर्शित झाले. हे चित्रपट आणि वेब सीरीज खूप लोकप्रिय झाल्या आहेत. इयर एंडरच्या या विशेष लेखात आपण 2023 च्या लोकप्रिय चित्रपट आणि वेब सीरीजबद्दल सांगणार आहोत, ज्या सत्य घटनेवर आधारित आहेत.

  • " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">

ट्वेल्थ फेल: विधू विनोद चोप्रा दिग्दर्शित 'ट्वेल्थ फेल' हा चित्रपट आयपीएएस अधिकारी मनोज कुमार शर्मा आणि श्रद्धा जोशी यांच्या आयुष्यावर आधारित आहे. हा चित्रपट 27 ऑक्टोबर 2023 रोजी बॉक्स ऑफिसवर रिलीज झाला. या चित्रपटानं प्रेक्षकांच्या हृदयावर अमिट छाप सोडली आहे. दरम्यान आता हा चित्रपट 29 डिसेंबर रोजी डिस्ने प्लस हॉटस्टार प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात विक्रांत मॅसी मेधा शंकर, अनंत व्ही जोशी, अंशुमन पुष्कर आणि प्रियांशू चॅटर्जी या कलाकारांनी काम केलं आहे. 20 कोटींच्या बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटानं 62 कोटीची बॉक्स ऑफिसवर कमाई केली.

द रेल्वे मेन : आर. माधवन, केके मेनन, दिव्येंदू आणि बाबिल खान स्टारर 'द रेल्वे मेन' वेब सीरीज ही भोपाळ गॅस दुर्घटनेवर आधारित आहे. 2 डिसेंबर 1984 रोजी भोपाळ गॅस दुर्घटना घडली होती. 'द रेल्वे मेन' ही वेब सीरीज 18 नोव्हेंबर रोजी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाली होती. या वेब सीरीजला प्रेक्षकांची चांगली पसंती मिळाली. 'द रेल्वे मेन' वेब सीरीजचं दिग्दर्शन शिव रवैल यांनी केलं आहे.

सॅम बहादूर : विकी कौशल स्टारर 'सॅम बहादूर' हा चित्रपट 1 डिसेंबर रोजी चित्रपटगृहांमध्ये रिलीज झाला. या चित्रपटाचं दिग्दर्शन मेघना गुलजार यांनी केलं आहे. हा चित्रपट भारताचे पहिले फील्ड मार्शल सॅम माणेकशॉ यांच्यावर आधारित आहे, ज्यांनी 1971 च्या भारत-पाकिस्तान युद्ध आणि बांगलादेशच्या स्वातंत्र्यादरम्यान महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. हा चित्रपट झी5वर 26 जानेवारी 2024 रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटामध्ये विकीशिवाय फातिमा सना शेख आणि सान्या मल्होत्रा प्रमुख भूमिकेत आहेत.

मिशन राणीगंज : अभिनेता अक्षय कुमार आणि परिणीती चोप्रा अभिनीत 'मिशन राणीगंज' चित्रपट 6 ऑक्टोबर रोजी थिएटरमध्ये रिलीज झाला. हा चित्रपट 1989 मध्ये पश्चिम बंगालमधील राणीगंज येथे कोळसा खाणीत कामगारांना वाचवण्यासाठी दिवंगत जयवंत सिंग गिल यांच्या धाडसी मोहिमेवर आधारित आहे. 'मिशन राणीगंज' नेटफ्लिक्सवर 1 डिसेंबर रोजी रिलीज झाला. या चित्रपटाचं दिग्दर्शन टीनू सुरेश देसाई यांनी केलं आहे.

स्कूप : करिष्मा तन्ना स्टारर 'स्कूप'चं दिग्दर्शन हंसल मेहता यांनी केलं आहे. या सीरीजमध्ये करिष्मा जागृती नामक जर्नलिस्टच्या भूमिकेत आहे. ही वेब सीरीज जिग्ना व्होरा यांच्या 'माय डेज इन प्रिझन' यांच्या पुस्तकावर आधारित आहे. 2011 मध्ये ज्येष्ठ पत्रकार ज्योतिर्मय डे यांच्या हत्येचा कट रचल्याच्या आरोपावरून जिग्नाला मुंबई पोलिसांनी अटक केली होती. ही वेब सीरीज 2 जून 2023 रोजी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाली होती.

मिसेस चॅटर्जी व्हर्सेस नॉर्वे : राणी मुखर्जी स्टारर 'मिसेस चॅटर्जी व्हर्सेस नॉर्वे' हा चित्रपट आशिमा छिब्बर यांनी दिग्दर्शित केला आहे. या चित्रपटामध्ये राणी मुखर्जीशिवाय अनिर्बन भट्टाचार्य, नीना गुप्ता आणि जिम सरभ यांच्या प्रमुख भूमिकेत आहेत. या चित्रपटामध्ये मिसेस चॅटर्जी ज्या पद्धतीनं तिच्या मुलांचं संगोपन करते ती पद्धत नॉर्वेतील सरकारी अधिकाऱ्यांना चुकीची वाटते, त्यामुळं नॉर्वेजियन फोस्टर केअर सिस्टम हे मिसेस चॅटर्जीच्या मुलांवर ताबा घेतात. त्यानंतर आपल्या दोन मुलांना मिळविण्यासाठी एक आई किती प्रयत्न करते हे या चित्रपटामध्ये दाखविलं गेलं आहे. ही कहाणी सत्य घटनेवर आधारित आहे. हा चित्रपट 17 मार्च 2023 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता. यानंतर 'मिसेस चॅटर्जी व्हर्सेस नॉर्वे' नेटफ्लिक्सवर 12 मे रोजी प्रदर्शित झाला.

महाराष्ट्र शाहीर : महाराष्ट्र शाहीर हा एक मराठी चित्रपट आहे, जो महाराष्ट्रीय गायक, नाटककार, लोकनाट्य निर्माते आणि दिग्दर्शक शाहीर साबळे यांच्या जीवनावर आधारित आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शिन केदार शिंदे यांनी केल असून याची निर्मिती संजय छाबरिया आणि बेला शिंदे यांनी केली आहे. या चित्रपटामध्ये प्रमुख भूमिकेत अंकुश चौधरी आणि सना केदार-शिंदे आहेत. हा चित्रपट 28 एप्रिल, 2023 अ‍ॅमेझॉन प्राईमवर प्रदर्शित झाला.

'तरला' : अभिनेत्री हुमा कुरेशीचा बायोपिक चित्रपट 'तरला' हा चित्रपट प्रचंड लोकप्रिय झाला होता. हा चित्रपट खाद्य लेखक, शेफ आणि कुकबुक लेखिका तरला दलाल यांच्या जीवनावर आधारित आहे. या चित्रपटामध्ये हुमानं तरला देवीची भूमिका साकारली आहे. हा चित्रपट 7 जुलै रोजी झी5वर प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाचं दिग्दर्शन पियुष गुप्ता यांनी केलं आहे.

घूमर : अभिषेक बच्चन आणि सैयामी खेर स्टारर 'घूमर' हा चित्रपट 12 ऑगस्ट, 2023 रोजी रुपेरी पडद्यावर दाखल झाला होता. या चित्रपटाचं दिग्दर्शन आर. बाल्की यांनी केलं आहे. 'घूमर' चित्रपटामध्ये अभिषेक बच्चन आणि सैयामी खेरशिवाय शबाना आझमी, अभिषेक बच्चन, सैयामी खेर आणि अंगद बेदी यांच्या भूमिका आहेत. या चित्रपटाची कहाणी अपघातात हात गमावलेल्या क्रिकेटरच्या प्रेरणादायी सत्त कथेवर आधारित आहे. हा चित्रपट झी5 वर 10 नोव्हेंबर रोजी प्रदर्शित झाला.

पिप्पा : ईशान खट्टरची प्रमुख भूमिका असलेला 'पिप्पा' हा चित्रपट 10 नोव्हेंबर, 2023 अ‍ॅमेझॉन प्राईमवर प्रदर्शित झाला होता. 'पिप्पा' चित्रपट 1971 च्या भारत-पाकिस्तान युद्धावर आधारित आहे.

हेही वाचा :

  1. बिग बॉसचा 74 वा दिवस : अंकिता आणि विकी जैनमधील तणाव वाढला, अभिषेकने मन्नाराला मुनावरबद्दल बोलण्यास भाग पाडले
  2. 'डंकी'मधील 'मैं तेरा रास्ता देखूंगा' हे हृदयस्पर्शी गाणं रिलीज, पाहा व्हिडिओ
  3. 2023 वर्षात 'या' पाच चित्रपटांचा होता रुपेरी पडद्यावर दबदबा

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.