मुंबई - अभिनेत्री मौनी रॉयने अक्षय कुमारच्या यूएसए द एन्टरटेनर्स टूरमधून ब्रेक घेतला आहे आणि सध्या ती मियामीमध्ये तिच्या सुट्टीचा निवांत वेळ घालवत आहे. अभिनेत्री मौनी काही काळापासून स्वतःचे आणि तिच्या नवीन बेस्ट फ्रेंड दिशा पटानीचे काही सुंदर फोटो शेअर करत आहे. आता मौनीने तिच्या चाहत्यांना आणि फॉलोअर्सना मियामी बीचवर तिच्या आनंदाची झलक दिली, जिथे ती तिच्या टोन्ड बॉडीची चमक दाखवताना पूर्णपणे फिट दिसत होती. इंस्टाग्रामवर मौनी रॉयने काही फोटो आणि स्वतःचा एक व्हिडिओ शेअर केला ज्यामध्ये ती समुद्रकिनाऱ्यावर पाण्यातून बाहेर फिरताना दिसत आहे. रंगबिरंगी बिकिनी परिधान केलेली मौनी नेहमीप्रमाणेच सुंदर दिसत होती. तिच्या मस्त सनग्लासेस आणि मोकळे केस यामुळे तिच्या एकूणच आकर्षक लुकमध्ये भर पडली. हॅलो मियामी, असे तिने तिच्या पोस्टच्या कॅप्शनमध्ये लिहिले.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
तिने तिची पोस्ट शेअर करताच तिच्या चाहत्यांनी आणि मित्रांनी कमेंट सेक्शनमध्ये प्रेम आणि आपुलकीचा वर्षाव केला. दिशा पटानी, झारा खान आणि दृष्टी धामी यांच्यासह अनेक कलाकारांनी तिच्या पोस्टवर कमेंट केल्या आहेत. अभिनेत्री दिशा पटानीने ‘सो हॉट’ अशी प्रतिक्रिया दिली. झारा खानने कमेंट केली, 'Mouniiiiiii omfg!!!! समुद्रात आग !!!' दुसरीकडे, एका यूजरने लिहिले की, 'गरम लग रही मौनी, समंदर का पानी गरम हो गया होगा.' मौनी रॉय नेहमी आपल्या चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी आपल्या दैनंदिनीतील फोटो शेअर करत असते.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
चाहत्यांकडून मौनी रॉयचे कौतुक कधी मालिका किंवा चित्रपटाच्या सेटवरुन तर कधी लाईव्ह परफॉर्मन्स दरम्यानची अपडेट ती देत असते. तिचे सोशल मीडियावर दोन कोटी पासष्ठ लाख फॉलोअर्स आहेत. कामाच्या आघाडीवर, मौनी रॉयने अलीकडेच अयान मुखर्जी दिग्दर्शित ब्रह्मास्त्रमध्ये दिसली होती. या चित्रपटातील तिच्या अभिनयासाठी मौनीला खूप प्रेम आणि प्रशंसा मिळाली. अमिताभ बच्चन, नागार्जुन, शाहरुख खान आणि इतर उल्लेखनीय कलाकारांसह, ब्रह्मास्त्रमध्ये आलिया भट्ट आणि रणबीर कपूर यांनीही मुख्य भूमिका केल्या होत्या.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">