ETV Bharat / entertainment

हनीमूनवरून थेट बेबीमूनला जाणार आलिया आणि रणबीर? - alia bhatt and ranbir kapoor honeymoon

आलिया भट्ट आणि रणबीर कपूर आता त्यांच्या हनीमूनवरून थेट बेबीमूनला जाणार आहेत. कामाच्या व्यग्र शेड्यूलमुळे हे जोडपे हनिमूनला जाऊ शकले नव्हते, पण आता बेबीमूनला जाण्याची तयारी सुरू आहे.

आलिया भट्ट आणि रणबीर कपूर
आलिया भट्ट आणि रणबीर कपूर
author img

By

Published : Jul 1, 2022, 1:26 PM IST

मुंबई - बॉलिवूडचे हिट कपल आलिया भट्ट आणि रणबीर कपूर बॉलिवूड सेलिब्रिटी आणि चाहत्यांसाठी एक मोठी आनंदाची बातमी देणार आहेत. लग्नाच्या अडीच महिन्यांनंतर या जोडप्याने सांगितले की ते आई-वडील होणार आहेत. ही गुड न्यूज समोर येताच सेलेब्स आणि चाहत्यांना नक्कीच आनंद झाला होता पण त्याहीपेक्षा त्यांना धक्का बसला होता की या जोडप्याने त्यांच्या करिअरच्या पीक अवरमध्ये इतका मोठा निर्णय कसा घेतला. आता या जोडप्याबद्दल असे बोलले जात आहे की हे कपल आता बेबीमूनची तयारी करत आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, आलिया भट्ट सध्या तिचा पहिला हॉलिवूड प्रोजेक्ट 'हार्ट ऑफ स्टोन' साठी लंडनमध्ये शुटिंग करीत आहे. हा प्रोजेक्ट पूर्ण करून ती लवकरच मुंबईला परतणार आहे. आलिया आणि रणबीर त्यांच्या व्यस्त शेड्युलमुळे हनीमूनला जाऊ शकले नव्हते. कारण सध्या रणबीर कपूर लव रंजनच्या अनटाइटल्ड चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे आणि आलिया लग्नानंतर लंडनला गेली आहे.

आलियाचा हॉलिवूड प्रोजेक्ट जुलैच्या मध्यात संपेल, त्यानंतर ती पती रणबीर कपूरसोबत बेबीमूनवर जाईल. रिपोर्ट्सनुसार, हे कपल बेबीमूनसाठी युरोपियन देशात एन्जॉय करणार आहे.

आलिया भट्टने सोमवारी (27 जून) लंडनमधून एक पोस्ट शेअर करून स्वतःच्या प्रेग्नंट असल्याची गोड बातमी दिली. या बातमीनंतर चाहत्यांकडून आणि सेलिब्रिटींकडून अभिनंदनाचा ओघ सुरू झाला. नुकताच आलिया भट्टचा सहकलाकार रणवीर सिंगसोबतचा एक फोटो लंडनमधून समोर आला होता, जो करण जोहरने शेअर केला होता.

रणवीर आणि आलिया पुन्हा एकदा एकत्र दिसणार आहेत. करण जोहर दिग्दर्शित 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' या चित्रपटात रणवीर आणि आलिया रोमान्स करताना दिसणार आहेत.

हेही वाचा - तीनवेळा लग्नासाठी सज्ज झालेल्या सुश्मिताने का केले नाही लग्न? केला स्वतःच खुलासा..!!

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.