मुंबई - Box office day 2 : अक्षय कुमार स्टारर 'मिशन राणीगंज: द ग्रेट भारत रेस्क्यू' आणि भूमी पेडणेकरचा 'थँक यू फॉर कमिंग' हे चित्रपट 6 ऑक्टोबर रोजी रुपेरी पडद्यावर दाखल झाले आहेत. 'मिशन राणीगंज' या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर 'थँक यू फॉर कमिंग' हा चित्रपट स्पर्धा देत आहे. अक्षय कुमार 'ओएमजी 2' चित्रपटानंतर पुन्हा रुपेरी पडद्यावर परतला आहे. 'मिशन राणीगंज'मध्ये त्यानं एक धाडसी आणि प्रामाणिक खाण अभियंता जसवंत सिंग गिलची व्यक्तिरेखा साकारली आहे. या चित्रपटामध्ये राणीगंज कोलफिल्ड्स येथे अडकलेल्या 65 खाण कामगारांची सुटका कशी होते हे दाखविण्यात आले आहे. याशिवाय 'थँक यू फॉर कमिंग' हा चित्रपट सेक्स कॉमेडी म्हणून ओळखला जातो.
'मिशन राणीगंज' आणि थँक यू फॉर कमिंग'ची कमाई : या चित्रपटानं पहिल्या दिवशी 2.8 कोटीची कमाई केली. त्यानंतर दुसऱ्या दिवशी हा चित्रपट 4 कोटी कमाई करू शकतो. यासह या चित्रपटाचं एकूण बॉक्स ऑफिस कलेक्शन 6.80 कोटी होईल. दुसरीकडे, भूमी पेडणेकरच्या 'थँक यू फॉर कमिंग' या चित्रपटाची सुरुवात रुपेरी पडद्यावर चांगली झाली नाही. या चित्रपटानं पहिल्या दिवशी 0.8 कोटी रुपयांची कमाई केली. त्यानंतर दुसऱ्या दिवशी हा चित्रपट 0.96 कोटीची कमाई करू शकतो. यासह या चित्रपटाचे एकूण बॉक्स ऑफिस कलेक्शन 1.76 कोटी झाले आहे. 'थँक यू फॉर कमिंग' दुसऱ्या दिवशी थोडी चांगली कमाई करेल अशी अपेक्षा केली जात आहे.
'मिशन राणीगंज' आणि थँक यू फॉर कमिंग' चित्रपटाबद्दल : 'मिशन राणीगंज' चित्रपटामध्ये अक्षय कुमार व्यतिरिक्त परिणीती चोप्रा, कुमुद मिश्रा, दिव्येंदू भट्टाचार्य, राजेश शर्मा, पवन मल्होत्रा, वीरेंद्र सक्सेना आणि शिशिर शर्मा यांच्याही भूमिका आहेत. या चित्रपटाकडून अक्षयला खूप अपेक्षा आहेत. 'मिशन राणीगंज'चे दिग्दर्शन टिनू सुरेश देसाई यांनी केले आहे. तसेच भूमी पेडणेकरच्या 'थँक यू फॉर कमिंग' या चित्रपटामध्ये तिच्यासोबत कुशा कपिला, शहनाज गिल, करण कुंद्रा, शिबानी बेदी, अनिल कपूर आणि नताशा रस्तोगी हे कलाकार आहेत. हा चित्रपट रुपेरी पडद्यावर संथ गतीनं कमाई करेल असं सध्या दिसत आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन करण बुलानी यांनी केलं आहे. बालाजी मोशन पिक्चर्स अंतर्गत एकता कपूर, शोभा कपूर आणि रिया कपूर यांनी हा कॉमेडी-ड्रामा निर्मित केला आहे.
हेही वाचा :