मुंबई: हॉलिवूड अभिनेता टॉम क्रूझ स्टारर मिशन इम्पॉसिबल - डेड रेकनिंग पार्ट १ हा चित्रपट जगभरातील चित्रपटगृहांमध्ये आश्चर्यकारक कामगिरी करत आहे. या चित्रपटामध्ये टॉम क्रूझने फार धोकादायक स्टंट आणि अॅक्शन केलेली आहे. मिशन इम्पॉसिबल ७ हा चित्रपट १२ जुलै रोजी जगभरात प्रदर्शित झाला होता. आता हा चित्रपट १४ जुलै रोजी रिलीजच्या तिसऱ्या दिवसात प्रवेश करत आहे. या चित्रपटाने पहिल्या दिवशी भारतात १२.५० कोटींची कमाई केली होती. दरम्यान आता या चित्रपटाच्या दुसऱ्या दिवसाच्या कमाईचा रिपोर्ट समोर आला आहे. या चित्रपटाने पहिल्या दिवसाच्या कमाईपेक्षा दुसऱ्या दिवशी कमी कमाई केली आहे. दरम्यान दुसऱ्या दिवशी चित्रपटाच्या कमाईत थोडीशी घसरण नोंदवण्यात आली आहे.
मिशन इम्पॉसिबल ७ एकूण कलेक्शन : मिशन इम्पॉसिबल ७ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर दुसऱ्या दिवशी ९ कोटी रुपयांचा व्यवसाय केला आहे. हा चित्रपट भारतात इंग्रजी, हिंदी, तामिळ आणि तेलगू भाषामध्ये रिलीज झाला होता. भारतात या चित्रपटाचे दोन दिवसांचे एकूण कलेक्शन २१.३० कोटी रुपये झाले आहे. या चित्रपटासाठी २५ हजार अॅडव्हान्स बुकिंग भारतात करण्यात आली होती. दरम्यान आता या चित्रपटाची १२ हजाराहून अधिक तिकिटे विकली गेली आहेत. हा चित्रपट भारतात ५ दिवसात ५० कोटी टप्पा ओलांडणार असे दिसून येत आहे. दरम्यान जगभरात या चित्रपटाने ओपनिंग डेच्या दिवशी २० (US $)दशलक्ष कमावले होते. हा चित्रपट ओपनिंग वीकेंडपर्यंत जगभरात २५० (US $) आकडा पार करेल असे दिसत आहे.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">
चित्रपटाची स्टार कास्ट : मिशन इम्पॉसिबल ७ हा चित्रपट $ २९० दशलक्षच्या बजेटमध्ये बनवण्यात आला आहे. कोविडमुळे चित्रपटाची निर्मिती लांबणीवर पडल्याने या चित्रपटाचा खर्च वाढला. मिशन इम्पॉसिबल ७ या चित्रपटाचे दिग्दर्शन क्रिस्टोफर मॅक्वेरी यांनी केले आहे. या अॅक्शन चित्रपटात टॉम क्रूझ व्यतिरिक्त सायमन पेग, हेली एटवेल, विंग राम्स, रेबेका फर्ग्युसन, एसाई मोरालेस, व्हेनेसा किर्बी, पॉलमे लेमेंटिफ आणि हेन्री जर्न हे देखील मुख्य भूमिकेत आहे. मिशन इम्पॉसिबल या मालिकेत टॉम क्रूझ हंट नावाच्या गुप्तहेर अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसत आहे.
हेही वाचा :