मुंबई Mira Rajput Kapoor birthday : बॉलीवूड अभिनेता शाहिद कपूर हा पत्नी मीरा राजपूतवर प्रेम व्यक्त करण्यास कधीही मागेपुढे पाहत नाही. तो नेहमीच आपलं प्रेम उघडपणे व्यक्त करत असतो. मीरा राजपूत आज तिचा 29 वा वाढदिवस साजरा करत आहे. यानिमित्तानं शाहिद कपूरनं सोशल मीडियावर तिच्यासाठी एक रोमँटिक पोस्ट लिहिली आहे. या पोस्टला शाहिदनं कॅप्शन देत लिहिलं, 'मीरा माझ्या हृदयाची राणी. तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आणि मी खूप भाग्यवान आहे आणि तुझ्यासाठी मी सदैव धन्य आहे. असं लिहून त्यानं आपलं प्रेम व्यक्त केलं आहे. शेअर केलल्या फोटोमध्ये दोघे खूप खास दिसत आहेत. याशिवाय शाहिद कपूरनं त्याच्या इन्स्टास्टोरीवर भगवान कृष्णाचा बासरी धरलेला फोटो शेअर केला आहे. या पोस्टमध्ये त्यानं त्याच्या चाहत्यांना जन्माष्टमीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
शाहिद कपूरने शेअर केली पोस्ट : या पोस्टवर शाहिद कपूरचे चाहते त्याच्या पत्नीला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहेत. शाहिद कपूर आणि मीरा राजपूत यांचा विवाह जुलै 2015 मध्ये झाला होता. या लग्नाला फक्त जवळचे मित्र आणि कुटुंबातील सदस्य उपस्थित होते. या जोडप्यानं दोन समारंभ ठेवले होते. या कार्यक्रमाचं आयोजन मीरा राजपूतच्या घरी दिल्लीत करण्यात आलं होतं. दुसरा कार्यक्रम मुंबईत ठेवण्यात आला होता. या कार्यक्रमात बॉलिवूडमधील अनेक कलाकार उपस्थित होते. मीरा राजपूत ही जरी बॉलिवूडमध्ये काम करत नाही, तरीही तिची फॅन फॉलोइंग एका बॉलिवूड कलाकारप्रमाणे आहे.
युट्युबवर निरोगी राहण्याच्या देते टिप्स : मीरा राजपूतचं युट्युबवर एक चॅनेल आहे. यावरून ती निरोगी जीवनाचा प्रचार करताना दिसते. याशिवाय मीरा राजपूत तिच्या चाहत्यांना तिची योगा, वर्कआउट, फिटनेस आणि स्किन केअर रुटीनबद्दल देखील सांगते. शाहिद कपूर शेवटी 'जर्सी' चित्रपटात दिसला होता. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फार कमाई करू शकला नाही. पण जेव्हा तो ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला तेव्हा त्याची सर्वत्र चर्चा झाली. या चित्रपटाला प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळाले आहे. 'जर्सी' चित्रपटात शाहिद कपूरचे वडील पंकज कपूर आणि अभिनेत्री मृणाल ठाकूर मुख्य भूमिकेत दिसले.
हेही वाचा :