ETV Bharat / entertainment

Mira Rajput comment on Shahid Kapoor : शाहिद कपूरच्या नव्या फोटोवर पत्नी मीरा राजपूत फिदा - पाहा फोटो - शाहीद आणि मीरा

Mira Rajput comment on Shahid Kapoor :शाहिद कपूरने शुक्रवारी आपले नवीन फोटो शेअर करुन सोशल मीडियावर सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. यावर त्याची पत्नी मीरा राजपूतनेही कमेंट केली आहे.

Mira Rajput comment on Shahid Kapoor
शाहिद कपूरने आपले नवीन फोटो शेअर केले
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 7, 2023, 2:49 PM IST

मुंबई - Mira Rajput comment on Shahid Kapoor : बॉलिवूड अभिनेता शाहिद कपूर आणि त्याची पत्नी मीरा राजपूत हे फिल्म इंडस्ट्रीतील सर्वात आवडत्या सेलिब्रिटी जोडप्यांपैकी एक आहेत. हे सुंदर जोडपं अनेकदा त्यांच्या सोशल मीडियावर एकमेकांची झलक शेअर करत असतात. आपले उद्दीष्ट पूर्ण करण्यासाठी ते कधीच मागे हटत नाहीत. शाहिदने त्याच्या इनस्टाग्रामवर शुक्रवारी फोटोंची एक स्ट्रिंग शेअर केली. हे फोटो पाहून नेटिझन्सनी प्रतिक्रियांचा वर्षाव केला. फोटोंनी केवळ त्याच्या चाहत्यांचेच लक्ष वेधून घेतले नाही तर त्याच्या पत्नीचेही लक्ष वेधले गेलं. मीरा नेहमीच आपल्या पतीचं कौतुक करताना थकत नाही.

फोटो शेअर करताना शाहिदने कॅप्शनमध्ये लिहिलंय की, 'काला शा काला'. या फोटोमध्ये शाहिद कपूर हातात काळा ब्लेझर धरून मॅचिंग पँटसोबत काळ्या रंगाचा बनियान कोट परिधान केलेला दिसत आहे. शाहिद या नवीन फोटोत डार्क सनग्लासेस घातलेला दिसत आहे. त्याच्या या फोटोवर चाहत्यांसह त्याची पत्नीही फिदा झाली आहे. यावर तिनं कमेंट केली. ती म्हणते, 'तू यात फार हॉट दिसतोस नाही का..' मीरानं त्याची ही पोस्ट आपल्या इन्स्टाग्रामवर शेअर केली आणि लिहिलं, 'हा माणूस माझ्या आयुष्यात मला हवाय.'

Mira Rajput comment on Shahid Kapoor
शाहिद कपूरने आपले नवीन फोटो शेअर केले

शाहीद आणि मीरा यांचा 7 जुलै 2015 रोजी दिल्लीत एका छोटेखानी समारंभात विवाह झाला होता. त्यांना मीशा ही 7 वर्षांची मुलगी आणि झैन हा पाच वर्षांचा मुलगा आहे. कामाच्या आघाडीवर शाहिद कपूर सध्या एंटरटेनर नंबर वन या इव्हेन्टसाठी दोहा कतार येथे गेलेला आहे. या ठिकाणी तो डान्स परफॉर्मन्स करणार असून अमिताभ बच्चन यांच्या जुम्मा चुम्मा देदे या गाण्यावर रिहर्सल करताना एक ऑनलाईन व्हिडिओत दिसत आहेत. या गाण्यात त्याच्यासोबत कियारा अडवानीही थिरकताना दिसली आहे. याशिवाय सध्या तो अद्याप शीर्षक न ठरलेल्या चित्रपटात क्रिती सेनॉनसोबत काम करत आहे. हा चित्रपट पुढील वर्षी 9 फेब्रुवारीला थिएटरमध्ये दाखल होणार आहे.

हेही वाचा -

1. Box Office Day 2 : 'मिशन राणीगंज' आणि 'थँक यू फॉर कमिंग' चित्रपटांच्या रिलीजच्या दुसऱ्या दिवशीच्या कमाईवर एक नजर

2. Naal 2 Teaser Released: चैत्या पुन्हा गावी परतला, नागराज मंजुळे देणार प्रेक्षकांना दिवाळी भेट

3. Rubina Dilaik Share Pics : रुबीना दिलैकनं बोल्ड अंदाजातील फोटो शेअर करुन दिलं ट्रोर्सना आमंत्रण

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.