वॉशिंग्टन : जगभरातील सुंदरींमध्ये मेट गाला कार्यक्रमात सहभागी होण्याची स्पर्धा लागते. यावर्षी मेट गाला कार्यक्रमात जगभरातील सुंदरी दाखल झाल्या आहेत. भारताची देशी गर्ल प्रियंका चोप्रा तिचा पती निक जोनाससह मेट गाला 2023 कार्यक्रमात सहभागी झाली होती. यावेळी प्रियंका चोप्राने काळ्या रंगाचे कपडे परिधान करुन आपला जलवा दाखवला. दुसरीकडे प्रियंकाचा पती निक जोनासनेही काळ्या रंगाचे कपडे घातल्याने या पती पत्नीवर मेट गाला कार्यक्रमात सगळ्यांच्या नजरा खिळल्या होत्या.
प्रियंका 2017 ला झाली होती पहिल्यांदा सहभागी : बॉलिवूडची देशी गर्ल प्रियंका चोप्रा पहिल्यांदा 2017 मध्ये मेट गाला या कार्यक्रमात सहभागी झाली होती. यावेळी प्रियंकाने पहिल्यांदाच मेट गाला कार्यक्रमात आपल्या सौंदर्याच्या जादूने प्रेक्षकांवर भुरळ घातली होती. त्यामुळे प्रियंका चोप्राचा फोटो या मेट गाला कार्यक्रमात झळकत राहिला होता. त्यानंतर प्रियंका चोप्राने 2019 मध्येही मेट गाला कार्यक्रमात सहभागी होत आपल्या सौंदर्याची जादू कायम राखली होती. सुसान सोंटॅगच्या 1964 च्या निबंध "नोट्स ऑन 'कॅम्प' ला आदरांजली वाहणारा ड्रेस कोड लक्षात घेऊन प्रियंकाने आपला ड्रेस परिधान केला होता.
प्रियंका निकच्या जोडीने घातली प्रेक्षकांना भुरळ : देशी गर्ल प्रियंका चोप्राने तिचा पती निक जोनाससोबत मेट गाला कार्यक्रमात सहभागी होत प्रेक्षकांवर भुरळ घातली. निक जोनासने काळ्या रंगाचे जॅकेट परिधान केले होते. तर प्रियंकाने काळ्या रंगाच्या आकर्षक ड्रेसने उपस्थितांना आपल्या सौंदर्याच्या जादूने भुरळ घातली. त्यामुळे मेट गाला 2023 या कार्यक्रमात प्रियंका चोप्रा आणि तिचा पती निक जोनास यांचा चांगलाच जलवा पाहण्यास मिळाला.
राजकुमारीच्या पोशाखात आलिया : मेट गाला 2023 या कार्यक्रमात यावर्षी आलिया भटनेही आपल्या सौंदर्याने रेड कार्पेटवर चांगलाच जलवा दाखवला आहे. आलिया भटने राजकुमारीच्या पोशाखात उपस्थितांचे लक्ष आपल्याकडे वेधून घेतले. राजकुमारीच्या पोशाखात आलेल्या आलिया भटवर मेट गाला कार्यक्रमात सगळ्यांच्या नजरा खिळल्या होत्या. यावर्षी कार्ल लेजरफेल्ड : ए लाइन ऑफ ब्युटी ही थीम घेऊन सौंदर्यवतींनी आपले पोशाख परिधान केले आहेत.
हेही वाचा - Bipasha Basu wedding anniversary : बिपाशा बसूने शेअर केली करण सिंग ग्रोव्हरसोबत लग्नाच्या वाढदिवसाची झलक